Monday, December 12, 2022

शरद पवारांना फोनवरून धमकी ; फोन करणाराची ओळख पटली...

वेध माझा ऑनलाइन - मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली असून, कॉल करणाऱ्याची ओळख पटवण्यात आली आहे. तर दुसरीकडे फोन करणारा व्यक्ती हा वेडा असल्याचा दावा शरद पवार यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना  जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार याच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या वृत्ताने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी धमकीचा कॉल करणाऱ्यांची ओळख पटवली आहे. तर दुसरीकडे  हा व्यक्ती वेडा असल्याचा दावा शरद पवार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्ह उद्या पुणे बंद ...

वेध माझा ऑनलाइन -  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शहरातील विविध संघटनांच्या वतीने पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला आहे. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या मंगळवार दि 13 डिसेंबर 2022 रोजी पुणे बंद आयोजित करण्यात आला आहे.

राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून लाल महाल या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे. डेक्कन जिमखाना, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने बेलबाग मार्गे लाल महाल येथे मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चाची सांगता झाल्यानंतर जाहीर सभाही होणार आहे. खासदार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. शहर आणि जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, विविध सामाजिक संघटना, संस्था, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.
वाचा - मंत्री काय फक्त तुम्हीच झाला का? शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना फटकारलं
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आजपर्यंत भाजपच्या नेत्याकडून अनेक वेळा अपमान करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांबाबत विधान केले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्यावर भाजप नेतृत्वाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. ही गंभीर बाब असल्याचे सांगत विविध संघटनांनी मंगळवारी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करावी आणि कोश्यारी यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

विविध पक्षाचेही नेते या मोर्चात सहभागी होणार
अरविंद शिंदे, दीपक मानकर, संतोष शिंदे, बाळासाहेब धाबेकर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे, अंजुम इनामदार, संजय बालगुडे संगीता तिवारी आदींनी पत्रकार परिषदेमध्ये सर्व पुणेकरांना जास्तीत जास्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे व पुणे बंद साठी सर्वांनी स्वतःहून पाठिंबा द्यावा आणि मूक मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शाईफेक प्रकरणातील कारवाया मागे घेण्याच्या चंद्रकांतदादांनी दिल्या सूचना

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाईफेक प्रकरणातील कारवाया मागे घेण्याच्या सूचना केल्या आहे. प्रसिद्धीपत्र काढत त्यांनी या सूचना केल्या आहेत. 

'सगळ्यांच्या कारवाया मागे घ्या'
घडलेल्या प्रकरणात कोणाविषयी काहीही तक्रार नाही. ज्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल केले, पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवरची निलंबनाची कारवाई केली होती आणि ज्या पत्रकारावरदेखील कारवाई करण्यात आली त्या सगळ्यांवरच्या कारवाया मागे घ्याव्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. तोंडावर शाईफेक झालेल्या प्रकरणावर काहीही मत नाही. या वादावर पडदा टाकत आहे. त्यामुळे हा वाद थांबवावा, अशीदेखील विनंती त्यांनी केली आहे. 

'पुन्हा एकदा माफी मागतो'
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मी कायम मान राखत आलो आहेत. त्यांच्या कार्याचं अनुकरण केलं आहे. त्यांच्याविषयी मनापासून आदर आहे. त्यांच्या विषयी बोलताना भाषणात बोली भाषेतील शब्द अनावधानाने निघाले. यात कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. घडलेल्या या प्रकाराबाबत या आधीही दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र त्यावरुन घडलेल्या घटना मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले याचं वाईट वाटत आहे. याच मुद्द्यांवरुन महाराष्ट्र अशांत होऊ नये. या सगळ्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते, ; काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वादग्रस्त वक्तव्य;

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. कुणबी समाजाने खऱ्या अर्थाने राज्याला नेतृत्व दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते, त्यांनी नेतृत्व व राज्य कसे असावे, याची दिशा राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिली. महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण कार्य करीत आहोत, असे पटोले म्हणाले. अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नानांनी शिवरायांबाबत केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद उसळण्याची शक्यता आहे.

अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपले नेतृत्व मोठे व्हावे, असे अपेक्षित असते. समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी हा अन्नदाता समाज आहे. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. आत्महत्या करू नका, ज्या व्यवस्थेकडून आत्महत्या करायला बाध्य केले जात आहे, त्यांना आत्महत्या करायला लावा, असे आवाहन पटोले यांनी केले. कुणबी समाजात माझ्यापेक्षाही अनेक मोठे नेते आहेत. प्रत्येकाला समाजाचे देणे लागते. समाजासाठी सातत्याने कार्य करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते. त्यानुसार मी कार्य करीत असल्याचे पटोले यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरही पटोले यांनी टीका केली. मोदींच्या दौऱ्यामुळे कुठलाच फायदा झाला नाही, उलट निराशा झाली. जनतेला वेठीस धरण्यात आले. समृद्धी महामार्गामुळे फक्त काही नेते व अधिकाऱ्यांचीच समृद्धी झाली. लवकरच त्याचे पुरावे बाहेर काढू, असा इशारा पटोले यांनी दिला. भाजपला सत्तेची गुर्मी आल्याची टीकाही त्यांनी केली.

यशवंत बँकेच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात ; १५० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ;

वेध माझा ऑनलाइन ; यशवंत बँकेच्या वतीने दिनांक १० व ११ डिसेंबर रोजी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा १५० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. बँकेच्या कराड शाखा व कोयना वसाहत येथील ग्राहक सेवा केंद्रावर हे शिबीर उत्साहात पार पडले. 

ज्येष्ठ सभासद कीसनराव पाटील व नेत्रतज्ञ डॉ.मुकुंद देशपांडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी बँकेचे संचालक प्रसाद देशपांडे, गोपीनाथ कुलकर्णी, माजी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वैशाली मोकाशी, उद्योजक श्री पेंढारकर, नितीन वास्के, उमेश कुलकर्णी, विनायक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती

पुणे येथील डॉ.मनोहर डोळे मेडिकल फौंडेशनच्या अथर्व नेत्रालय सुपर स्पेशालिटी आय केअर सेंटरचे सदर शिबिरास सहकार्य लाभले शिबीर यशस्वी होण्यासाठी अथर्व नेत्रालयाचे डॉ.विजय गायकवाड, बँकेचे मार्केटिंग ऑफिसर दिलीप तगारे, शाखा व्यवस्थापक सौ.श्रद्धा पंढरपुरे व मार्केटिंग विभागातील अधिकारी वर्गाने प्रयत्न केले.

Sunday, December 11, 2022

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजा पटेरिया यांचे धक्कादायक विधान : म्हणाले...मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा ; नवा वाद उफाळण्याची शक्यता;

वेध माझा ऑनलाइन - केंद्रातील काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन एकमेकांवर कुरघोडी सुरु असते. यादरम्यान अनेक नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जातात. अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल धक्कादायक विधान केलं आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस कार्यकर्त्यांना मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा असा सल्लाच देऊन टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी काँग्रेस नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस नेते राजा पटेरिया यांनी या बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजा पटेरिया नेमकं काय म्हणाले ?
जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे असं राजा पटेरिया म्हणाले आहेत.“नरेंद्र मोदी निवडणूक संपवतील; धर्म, जात, भाषेच्या आधारे सर्वाचं विभाजन करतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना धोका आहे. जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे,” असं ते म्हणाले. दरम्यान यानंतर त्यांनी हत्या म्हणजे पराभव असं सांगत सावरण्याचाही प्रयत्न केला.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर : देशमुख यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे कोर्टाने नोंदवलं मत ; देशमुख 13 महिन्यानंतर येणार जेलबाहेर ;

वेध माझा ऑनलाइन - 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयने या प्रकरणात जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालय निकाल दिला आहे. देशमुख यांच्याविरोधात पुरावे नसल्याची मत कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे देशमुख आता 13 महिन्यानंतर जेलबाहेर येणार आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.

सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीनासाठी युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आज याबद्दल निकाला दिला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयनं विरोध केला असला तरी देशमुखांच्या वकिलांनीही कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवाद दरम्यान तपास यंत्रणेकडे कुठला ठोस पुरावा नसल्याचा जोरदार दावा केला होता.या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेनी दिलेला जबाब विश्वासहार्य नाही, अनिल देशमुख यांचे वाढतं वय, त्यांना असलेले आजार, सुनावणी दरम्यान अनेक वेळा ते चक्कर येऊन पडले. हे सर्व लक्षात त्यांना जामीन देण्यात यावा अशीही विनंती कोर्टाला केली आहे. ईडीकडे दाखल गुन्ह्यात अनिल देशमुख यांना आधीच जामीन मिळाला आहे. अखेर आज हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला आहे. सीबीआयने या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे. यासाठी 10 दिवसांचा अवधी मागितला आहे. कोर्टाने सीबीआयची ही मागणी मान्य केली आहे. जामिनावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे 10 दिवस देशमुख यांना जेलमध्येच थांबावे लागणार आहे.