वेध माझा ऑनलाइन ; यशवंत बँकेच्या वतीने दिनांक १० व ११ डिसेंबर रोजी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा १५० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. बँकेच्या कराड शाखा व कोयना वसाहत येथील ग्राहक सेवा केंद्रावर हे शिबीर उत्साहात पार पडले.
ज्येष्ठ सभासद कीसनराव पाटील व नेत्रतज्ञ डॉ.मुकुंद देशपांडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी बँकेचे संचालक प्रसाद देशपांडे, गोपीनाथ कुलकर्णी, माजी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वैशाली मोकाशी, उद्योजक श्री पेंढारकर, नितीन वास्के, उमेश कुलकर्णी, विनायक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती
पुणे येथील डॉ.मनोहर डोळे मेडिकल फौंडेशनच्या अथर्व नेत्रालय सुपर स्पेशालिटी आय केअर सेंटरचे सदर शिबिरास सहकार्य लाभले शिबीर यशस्वी होण्यासाठी अथर्व नेत्रालयाचे डॉ.विजय गायकवाड, बँकेचे मार्केटिंग ऑफिसर दिलीप तगारे, शाखा व्यवस्थापक सौ.श्रद्धा पंढरपुरे व मार्केटिंग विभागातील अधिकारी वर्गाने प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment