Tuesday, May 7, 2024

शरद पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ ; म्हणाले...प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात ; पवारांनी आणखी काय टाकले बॉम्ब ? वाचा बातमी ...

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रत्येक विधान अगदी बारकाईने बघावं लागते… पवार कधी काय बोलतील? त्याचा अर्थ काय निघतो याचा थांगपत्ता मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा लागत नाही. आताही शरद पवारांनी असच एक मोठं विधान करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं भाकीत पवारांनी वर्तवलं आहे. काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय प्रादेशिक पक्षांना सर्वोत्तम आहे असं पवारांनी म्हंटल. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शरद पवारांनी हा राजकीय बॉम्ब टाकला आहे.

शरद पवार म्हणाले, 2024 च्या निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होऊ शकतो का? असा उलट सवाल केला असता काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. .परंतु त्यावर आत्ताच काही बोलणं योग्य नाही . सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही, याबाबतचा कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल असं म्हणत शरद पवारांनी चर्चाना उधाण आणलं आहे. महत्वाचे म्हणजे काही महिन्यापूर्वीच शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या, मात्र त्यावेळी त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

शरद पवारांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत सुद्धा भाष्य केलं. उद्धव (ठाकरे) देखील (समविचारी पक्षांसोबत) एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. “मी त्याची विचारसरणी पाहिली आहे… ती आमच्यासारखीच आहे असं शरद पवारांनी म्हंटल. पवारांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरेंची अडचण होण्याची शक्यता आहे, कारण भाजप आधीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचत असते, त्यातच आता पवारांनी ठाकरेंचे आणि आमचे विचार एकसारखं असल्याचे बोलल्याने ठाकरेंची राजकीय अडचण होण्याची शक्यता आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात सरासरी 63 टक्के मतदान ; जिल्ह्यात तुतारी वाजणार की कमळ फुलणार ? जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा लोकसभा मतदारसंघात आज एकूण  63.7 % टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे... त्यामुळे आता जिल्ह्यात तुतारी वाजणार की कमळ फुलणार ?याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे

दरम्यान जिल्ह्यातील पाटण तालुक्यात 56.50 तसेच सातारा 62.77कराड उत्तर  65.33 कराड दक्षिण 65.68 वाई 60.78
आणि कोरेगाव तालुक्यात 67.51टक्के इतके मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे
गेले महिनाभर संपूर्ण जिल्ह्यात या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत चालले होते कोणाला तिकीट मिळणार ?कोण जिंकणार?मतदार संघ कोणत्या पक्षाला मिळणार? याबाबत तर्क लावले जात होते अखेर शरद पवारांचे निकटवर्तीय कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे हे तुतारी घेऊन तर उदयनराजे कमळ चिन्हावर उभे राहिले त्यानंतर प्रचाराचा धुरळा प्रचंड प्रमाणात उडाला या निवडणुकीबाबत अनेक पैजा लागल्या पंतप्रधान मोदींची सभा या निवडणुकीच्या चर्चेचा प्लस पॉईंट ठरला त्यानंतर शरद पवार यांच्या देखील सभा झाल्या दोन्ही नेत्यांनी आपापल्या उमेदवारांना लोकांसमोर आणून मते मागितली दरम्यान शशिकांत शिंदे यांच्यावरील मुंबईतील तथाकथीत मुतारी घोटाळा दरम्यानच्या चर्चेने चांगलाच रंगला  इतर अनेक उमेदवार देखील या रिंगणात आले दरम्यान खऱ्या अर्थाने आज शिंदे - विरुद्ध राजे यांच्यात थेट लढत झाली त्यात 63 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली त्यामुळे आता साताऱ्यात तुतारी वाजणार की कमळ फुलणार याचीच चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे




Breaking...

सातारा लोकसभा मतदार संघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 43 टक्के मतदान ; मतदानाचे अजून दोन तास बाकी...

वेध माझा ऑनलाइन।
सातारा लोकसभा मतदारसंघात आज दुपारी 3 पर्यंत 43.83 % टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे
 
तसेच जिल्ह्यातील कराड उत्तर 43.45, वाई 41.88,कोरेगाव, 45.62 कराड दक्षिण 46.38, पाटण 41.74, आणि सातारा या ठिकाणी 44.07टक्के मतदान पार पडल्याची माहिती मिळाली आहे...

BREAKING...

Saturday, May 4, 2024

अजित पवारांची साताऱ्यात डरकाळी ; म्हणाले,... नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही ; का म्हणाले असे अजित पवार ; वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाईन।

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अजित पवारांना महायुतीत अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागल्याने राष्ट्रवादीच्या नाराजांची मनधरणी करावी लागत आहे. यापूर्वी परभणीचे हक्काची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे इच्छुक असलेल्या राजेश विटेकर यांना आमदारकीचा शब्द देऊन अजितदादांनी कार्यकर्त्यांचे समाधान केले होते. आता, साताऱ्यातूनही अजित पवार यांनी असेच एक आश्वासन दिले आहे. साताऱ्यातून नितीन पाटलांना मी खासदार करेन नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही असं अजितदादानी म्हंटल आहे.

खरं तर महायुतीमध्ये साताऱ्याच्या जागेवरून तिढा पडला होता. हि जागा भाजपचे उदयनराजे लढवणार कि अजित पवार गटाकडून नितीन पाटील लढवणार अशा चर्चा मागील महिनाभर सुरु होत्या. मात्र महायुतीत हि जागा भाजपला सुटली आणि उदयनराजे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज वाई येथे अजित पवारांची सभा पार पडली. या सभेतच अजित पवारांनी नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द दिला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक मोठी अटही घातली आहे. साताऱ्यातील महायुतीच्या उमेदवाराला 1 लाखाच्या फरकाने निवडून द्या, मग नितिन काकाला खासदार करणार, नाही केले तर पवारांची औलाद सांगणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी वाईच्या जनतेला दिले.