Thursday, January 16, 2025

चोर लिफ्ट ने सैफच्या घरात आला; मात्र...लिफ्ट चा एक्सेस फक्त घरच्या लोकांना माहीत होता, मग चोराला अक्सीस कसा मिळाला; पोलिसांचा त्या ड्रीष्टीने तपास सुरू :

वेध माझा ऑनलाइन
अभिनेता सैफ अली खानच्या घरात आलेला चोर हा इमारतीतील प्रायव्हेट लिफ्टच्या माध्यमातून आत आला असल्याचं समोर आलं आहे. प्रायव्हेट लिफ्टचा अॅक्सेस हा फक्त सैफच्या घरातील व्यक्तींनाच माहीत आहे. अॅक्सेसशिवाय ही लिफ्ट ऑपरेट होत नाही. त्यामुळे घरातीलच व्यक्तीने हा हल्ला केला की काय असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. सैफ अली खानच्या घरी चोराने प्रवेश केला आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली असून त्यांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. 

सैफ अली खानच्या इमारतीमध्ये दोन लिफ्ट असल्याची माहिती आहे. एक कॉमन लिफ्ट आहे तर एक सैफच्या परिवारासाठीची प्रायव्हेट लिफ्ट आहे. प्रायव्हेट लिफ्टमधून थेट सैफच्या घरामध्ये प्रवेश मिळतो.  पण या प्रायव्हेट लिफ्टमध्ये प्रवेश करण्यासाठी अॅक्सेस कार्डची गरज असते. त्याशिवाय ही लिफ्ट ऑपरेट होत नाही. 
चोराने या प्रायव्हेट लिफ्टच्या माध्यमातून सैफच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरीनीशी त्याचा सामना झाला. या प्रायव्हेट लिफ्टचा अॅक्सेस चोराला कसा मिळाला हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. त्यामुळे चोराला घरातीलच कोणत्या व्यक्तीने मदत केली की काय असाही संशय व्यक्त केला जात आहे.

Wednesday, January 15, 2025

वाल्मिक कराड चे सिमकार्ड विदेशात रजिस्टर !धक्कादायक माहिती आली समोर;

वेध माझा ऑनलाइन
सुदर्शन घुले व त्याचे साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांच खून केला आहे. याकाळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मीक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर का घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआरवरुन दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचे सीडीआरवरुन दिसून येत आहे, असे मुद्दे एसआयटीने न्यायालयात मांडले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

 सिमकार्ड अमेरिकेत रजिस्टर झाले!...

वाल्मिक कराडचे जे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यामधील काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या विशिष्ट काळामध्ये याच सिमकार्डवरुन काही लोकांना फोन केले गेले, असा एसआयटीला संशय आहे. त्यामुळे हे फोन का केले गेले, कोणती कारणं होती, याबाबत एसआयटीला तपास करायचा आहे.

सुप्रिया सुळे यांचा फोन,...म्हणाल्या । बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता...काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा,

वेध माझा ऑनलाइन
सैफ अली खानवर रात्री अडीच वाजता हल्ला झाल्याचा प्रकार घडला या घटनेची माहिती समोर आली तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात होत्या. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सैफच्या कुटुंबीयांना फोन केला.
सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले की, बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता. काय होतंय, ते मला सांगत राहा. काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा, असे सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले. हा फोन ठेवल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याबाबत फार बोलण्यास नकार दिला. मात्र, सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले

सैफ अली खान च्या मानेवर 10 सेमी ची जखम ;

वेध माझा ऑनलाइन
वांद्रे येथील राहत्या घरात अभिनेता सैफ आली खानवर काल रात्री मध्यरात्री चाकू हल्ला झाला. अज्ञाता व्यक्तीनं चाकू हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या व्यक्तीनं तब्बल दोन ते तीनवेळा सैफवर वार केल्याची माहिती मिळत आहे. चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या व्यक्तीनं दोन ते तीनवेळा वार केल्याची माहिती मिळत आहे. 

सैफ अली खान आणि करिना कपूर वांद्रे येथे राहतात. याच घरात रात्री अडीचच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती घुसली. धक्कादायक बाब म्हणजे, सैफची लहान मुलं ज्या रुममध्ये झोपलेली, त्याच रुमच्या बाल्कनीमधून त्या अज्ञात व्यक्तीनं सैफच्या रुममध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. सैफच्या घरात काम करणाऱ्यांनी त्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर घरातील सर्वांना जाग आली. सैफ अली खान तातडीनं उठून रुममधून बाहेर येत होता. त्यावेळी घरात घुसलेली व्यक्ती आणि सैफ आमने-सामने आले. त्यानंतर त्या व्यक्तीनं हातातल्या धारदार शस्त्रानं सैफवर वार केला. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. सैफच्या मानेवर तब्बल 10 सेमीची जखम झाली आहे. सैफ अली खानच्या पाठीवरही घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीनं वार केले. सैफच्या पाठीत त्या व्यक्तीनं धारदार शस्त्र खुपसलं. सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया करुन त्याच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यात आलं. पाठीत घुपसलेलं शस्त्र धारदार आणि टोकेरी होतं. सैफच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

सैफ अली खानवर शस्त्राने हल्ला ; पोलिसांना महिलेवर संशय ; कोण आहे ही महिला ?

वेध माझा ऑनलाइन
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री 2.30 (16 डिसेंबर) एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हा प्राणघातक हल्ला केला. अज्ञाताच्या चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार झाला. तसेच सैफ अली खानचा हात आणि पाठीवरही जखम झाली. या हल्ल्यात सैफ अली खानच्या पाठीत शस्त्र रुतलेलं होतं. रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी लिलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 

सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम कामाला लागली आहे. क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करत आहे. याचदरम्यान पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सैफ अली खानच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे. घराकाम करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेबद्दल पोलिसांना संशय आहे.  घरकाम करणाऱ्या महिलेच्या वैद्यकीय उपचारानंतर जबाब नोंदवला जाईल. याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांमधील 3 जणांचे जबाब नोंदवले जात आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात व्यक्ती घरात आल्याचं सांगण्यात येत आहे. सैफ अली खानच्या घरात असणाऱ्या महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एन्ट्री दिली. तसेच या अज्ञात व्यक्तीने सदर महिला मदतनीसावर हल्ला केला. या वादात सैफ अली खान पडल्याने अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला.

खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली; एसआयटीचा न्यायालयात दावा ; बातमी;

वेध माझा ऑनलाइन
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशामुळे झाली, या हत्येमागे कोणाचा हात आहे, गेल्या महिनाभरापासून राज्यातील जनेतला हा प्रश्न पडला आहे. मात्र, या घटनेचा तपास ज्या सीआयडीकडे देण्यात आला आहे, त्या एसआयटीने आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केले असता महत्त्वाची माहिती दिली. खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगत खंडणीप्रकरणामुळेच ही हत्या झाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. अवादा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या खंडणीला अडथळा ठरत असल्यानेच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने न्यायालयात माहिती देताना सांगितले. त्यामुळे, याप्रकरणाच्या आणखी तपासासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचं सांगत आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार, वाल्मिक कराडला 7 दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीने बीड न्यायालयात दिलेल्या माहितीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. वारंवार अवादा कंपनीकडे आरोपींकडून खंडणी मागण्यात येत होते, पण कंपनीने दिली नाही. त्यावेळी, संतोष देशमुख हेच खंडणीसाठी अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं एसआयटीने न्यायालयात म्हटलं आहे. एसआयटीने आज न्यायालयात 7 दावे केले आहेत. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला आहे.

धंनजय मुंडे अचानक मुंबईहून परळीला का रवाना झाले ;मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार मागणी;

वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला चांगलीच गती आली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयाखाली वाल्मिक कराड यांच्यावर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाल्मिक कराड हे राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. 

वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर मंगळवार संध्याकाळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. अवघ्या 10 मिनिटांची चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडे या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर धनंजय मुंडे थेट परळीच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे इतका महत्त्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे परळीला का गेले, यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.