Thursday, September 30, 2021

राहुल खराडे मित्र परिवाराच्या वतीने कराड पालिकेच्या माध्यमातून मोफत कोविड लसीकरण मोहीम...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील नगरसेविका व नियोजन सभापती सौ सुप्रिया तुषार खराडे यांच्या पुढाकाराने तसेच युवा नेते राहुल खराडे मित्रपरिवार यांचे प्रयत्नाने व येथील पालिकेच्या सहकार्याने कार्वे नाका येथील गणेश मंदिर याठिकाणी मोफत कोविड लसीकरण मोहीम नुकतीच आयोजित करण्यात आली होती त्याठिकाणी मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळाला सुमारे 300 हुन अधिक लोकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला
 
मधल्या कोविड काळात नगरसेविका सौ सुप्रिया खराडे व युवा नेते राहुल खराडे मित्र परिवाराने  मोठं काम केलं आहे त्यांनी जीवनावश्यक वस्तुंसह सॅनिटायझर मास्कचे वाटप करत त्यावेळी आपली बांधीलकी जपली आहे त्यांनी  कोविड काळात गरजूंना धान्य व किराणा वाटप देखील केले आहे  काही दिवसांपूर्वी वृक्षारोपण सारखे कार्यक्रम घेऊन पर्यावरणसंबंधी आपली आस्था त्यानी दाखवली आहे गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जीवन आवश्यक वस्तूचे वाटप नुकतेच केले आहे राहुल खराडे हे सातत्याने लोकांच्यात मिसळून सामाजिक कार्यात व्यग्र असतात त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक होत असते नुकतेच त्यांनी पालिकेच्या सहकार्याने कोवीड लसीकरण मोहीम राबवून आपल्या सामाजिक बांधिलकीला आणखी घट्ट केले असल्याच्या प्रतिक्रिया आता येवू लागल्या आहेत 

दरम्यान या लसीकरण प्रसंगी युवानेते  राहुल खराडे, बंडा शिंदे, सागर जोशी, किरण जाधव, धनंजय पवार, रियाज मुल्ला साहेब, मनोज जगताप, सुभाष शिंदे, नितीन शिंदे, मोहिते काका, सुदर्शन देवाडीका, जोशीकाका, नागरी आरोग्य केंद्रातर्फे शुभांगी थोरात मॅडम,पल्लवी देसाई मॅडम व इतर स्टाफ उपस्थित होता. 

सातारा जिल्ह्यात सात ऑक्टोबर पासून धामिक स्थळे उघडण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश

वेध माझा ऑनलाइन
सातारा
 जिल्ह्यात कोषिड-१९ ची दुसरी लाट आटोक्यात येत असून अद्यापही कोविड ताण आढळून येत असल्याने साथरोग अधिनियम, १८५७ च्या खंड २ नुसार प्राप्त अधिकार व आपत्ती निवारण कायदा, २००५ नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून अध्यक्ष, राज्य व्यवस्थापन समिती ने संपूर्ण राज्यासाठी निर्देश पारित केलेले आहेत. त्या प्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ पासुन खुली करण्यासाठी खाली नमुद मानक कार्यप्रणाली  व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून शेखर सिंह जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  यांनी परवानगी दिली आहे.
 
  प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी निर्णय घ्यावा. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असतात, अशा ठिकाणी आवारात काहीच -१९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. या आदेशामध्ये कोकोड -१९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपायासोबतच या विशिष्ट ठिकाणी करावयाच्या विशिष्ट उपाययोजनांचा ही समावेश करण्यात आलेला आहे. कन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. फक्त कंन्टेनमेंट झोनच्या बाहेरील स्थळे, प्रार्थना स्थळे सुरु करण्यातस परवानगी असेल.  मास्क परिधान करणे, शारिरिक आंतराचे पालन करणे, धर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना -
 
६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि १० वर्षाखालील लहान मुले यांनी  घरीच राहावे, धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोविड  विषाणू संसर्गाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना बरोबरच साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी सर्व कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांचेकडून पूर्ण वेळ पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये खालील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असेल.  
 
या सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी ६ फूट शारिरिक अंतर राखणे आवश्यक असेल. चेहरापट्टी, मास्क यांचा वापर करणे बंधनकारक असेल. हात अस्वच्छ नसले तरी साबणाने वारंवार हात धुणे ( किमान – ४० ते ६० सेंकदापर्यंत) बंधनकारक असेल, त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हण्ड सॅनिटायझर चा वापर ( किमान २० सेंकदापर्यत) करावा. श्वसनसंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरूमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे तसेच वापरलेल्या टिश्यू पेपरची योग्य त्या पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिक,कामगार, भाविक, सेवेकरी यांनी स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण करणे तसेच आजारी असल्यास स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनास कळविणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. तसेच याचे उल्लघन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वांनी आरोग्य सेतु अॅपचा वापर करावा.

सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी खालील प्रमाणे उपाययोजना करतील.
 
सर्व धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेशव्दारावर हात स्वच्छतेसाठी सनिटायझर डिस्मेंसर तसेच थर्मल सिक्रनिंगची सोय करणे बंधनकारक असेल. धार्मिक/ प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. सर्व व्यक्तींना चेहरा पट्टी , मास्कचा वापर केला असेल तरच या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. (NoMask-No Entry). सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी कोविड विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायोजना पोस्टर्स च्या माध्यामातून दर्शनी भागात लावण्यात याव्यात. तसेच या ठिकाणी कोहीड -१९ विषाणू संसर्ग रोखण्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ऑडीओ व व्हिडीओ च्या माध्यमातून जनजागृतीसाठी वारंवार ऐकवल्या व प्रसारित केल्या जाव्यात. धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेश देण्याबाबत अभ्यागत, भाविकांबाबत निश्चित धोरण ठरवावे, त्या ठिकाणी निश्चित केलेल्या वेळेमध्ये किती लोकांना प्रवेश दिला जावा, याबाबतचा निर्णय धार्मिक व प्रार्थना स्थळांचा आकार, वायुविजन इत्यादी बाबी विचारात घेवून त्या स्थळांचे नियमन करणारे विश्वस्त, मंडळ,अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करावे. चप्पल, बुट, पादत्राणे स्वत:च्या गाडीतच ठेवणेबाबत भाविकांना प्रवृत्त करावे. गरज असेल तर भाविकांनी वैयक्तिक, कुटुंबांची पादत्राणे एकत्र नेमून दिलेल्या ठिकाणी ठेवावीत.  वाहन पाकिंगच्या ठिकाणी तसेच परिसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे.  धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या परिसरातील तसेच आवारा बाहेरील सर्व दुकाने स्टॉल, कैफेटेरिया या ठिकाणी पूर्णवेळ सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. धार्मिक व  प्रार्थना स्थळाच्या परिसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करणेसाठी योग्य मार्किंग करावे.  भाविक, अभ्यागतासांठी धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था करणे. धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या परिसरातील भाविकांच्या अभ्यागातांच्या प्रवेशासाठीच्या रांगामध्ये किमान ६ फुटाचे शारिरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे. यासाठी धामिक प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारी संस्था जबाबदार असेल. धार्मिक - प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी योणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रवेश करण्याअगोदर हात व पाय साबण व पाण्याने
धुवावेत. धार्मिक - प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी अभ्यागत, भाविकांना बसण्याची व्यवस्था करत असताना योग्य सामाजिक अंतर राखावे. वातानुकूल यंत्र, वायुविजनसाठी CPWD च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात यावे. वातानुकुलित यंत्रणांचे तापमान २४° C ते ३०" C पर्वत राखले जाईल तसेच सापेक्ष आर्द्रता ४०-70% पर्यत असेल. शक्यतोवर पुरेसी ताजी हवा,क्रॉस व्हेंन्टीलेशन याची पुरेसी व्यवस्था करावी. पुतळे, मुर्ती, पवित्र पुस्तके यांना सर्श करण्यास परवानगी असणार नाही. धार्मिक-प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास परवानगी असणार नाही. संसर्गाचा विचार करता शक्य त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेले भक्ति संगीत, गाणी वाजविली जावीत. परंतु कोणत्याही परिस्थितीत गाण्यासाठी एकत्र येणा-या व्यक्तींना परवानगी देणेत येवू नये,  एकमेकांना अभिवादन करताना शारिरिक संपर्क टाळण्यात यावा.  धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई, जमखाना वापर करणेस परवानगी नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा जमखाना आणावा जो कि प्रार्थनेनंतर ते परत घेवून जातील.धार्मिक - प्रार्थना स्थळांच्या आत मध्ये प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या शारिरिक अर्पणांना परवानगी असणार नाही. धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रभावी स्वच्छता व निर्जतुकीकरण करावे. विशेषत: शौचालय, हात-पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे, धार्मिक - प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापकान्दारे या परिसरामध्ये वारंवार साफसफाई व निर्जतुकीकरण केले जावे, धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या परिसरातील इमारतीतील जमिन, फरशी व इतर आवारात वारंवार स्वच्छता केली जावी. अभ्यागत, भाविक, सेवेकरी,कर्मचारी यांनी वापरलेले मास्क, चेहरा पट्टी, हातमोजे यांची योग्य विल्लेवाट लावली जात आहे याची दक्षता घेण्यात याबी. धार्मिक- प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, सेवेकरी यांना कोविड-19 सुरक्षा प्रोटोकॉल गरजेचा आहे. त्याचबरोबर कामावर येणे अगोदर तसे आठवड्यातून एकदा कोहीड-१९ चाचणी करणे आवश्यक असेल. खाण्याच्या तसेच शौचालयाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रण करणे आवश्यक असेल. प्रत्येक धार्मिक - प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याबाबत संबंधीत पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना हमीपत्र देणे बंधनकारक असेल,

आवारात बाधित किंवा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत खालीलपमाणे कार्यवाही करावी

आजारी व्यक्तीला इतरापासून दूर असे स्वंतत्र खोलीन किंवा जागेत ठेवावे. डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मास्क,  चेहरा पट्टी वापर करणे बंधनकारक असेल. तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल, क्लिनिक) केंद्रात कळवावे, तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनास कळवावे. नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाव्दारे (जिल्हा RRT, उपचार करणारे तज्ञ) सदर रुग्णाबाबत जोखीम मूल्याकंन केले जाईल. त्यानुसार रुग्ण, त्याचे संपर्क आणि निर्जंतुकीकरण याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. 

 रुग्ण कोविड-१९ विषाणू बाधित (पॉझिटिव्ह) आल्यास सर्व परिसर निर्जतुकीकरण करण्यात यावा. 
 
सर्व सबंधीत प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांचेकडून वर नमुद मानक कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबत तपासणी करण्याचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देणेत येत आहेत.कोविड -१९ व्यवस्थापनासाठी शारिरिक अंतराचे व संसर्ग न पसरणेबाबत यापूर्वी विहित केलेले व वेळोवेळी देणेत आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
 
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहोता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
000000

214 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 137 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 214 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 5 (9957), कराड 17 (38856), खंडाळा 8 (14069), खटाव 20 (25476), कोरेगांव 8 (21761), माण 24 (17680), महाबळेश्वर 1 (4668), पाटण 4 (10088), फलटण 52 (36898), सातारा 66 (51153), वाई 3 (15658) व इतर 3 (2098) असे  आज अखेर एकूण 248365 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 137 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 2078545*
*एकूण बाधित – 248365*
*घरी सोडण्यात आलेले – 239304*
*मृत्यू –6084*
*उपचारार्थ रुग्ण– 5423*
                                                
                                         0000000

आजपासून सलग तीन दिवस नगरसेवक सौरभ पाटील व नगरसेविका सौ अनिता पवार यांच्या माध्यमातून व पालिकेच्या सहकार्याने कोविड लसीकरण सुरू ; अधिकाधिक लोकांनी लाभ घ्या ; आवाहन...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील नगरसेवक व विरोधी लोकशाही गटाचे नेते सौरभ पाटील व नगरसेविका सौ अनिता सुहास पवार यांच्या पुढाकाराने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने आज दिनांक 30 रोजी रूक्मिणी नगर येथे व उद्या शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी आदरणीय पी डी पाटील पाणीपुरवठा संस्था वाखान रोड याठिकाणी तर परवा दिनांक 2 रोजी स्विमिंग पूल रूक्मिणी नगर या परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सलग तीन दिवस मोफत कोविड लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे अधिकाधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक सौरभ पाटील मित्र परिवार व युवा नेते सुहास पवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे

शहराच्या हितासाठी कोणतेही निमित्त असो... सौरभ तात्या तिथे असतातच...नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवासाठी अगदी सुरुवातीपासून त्यांनी ग्राउंड वरती राहून शहरातील गणेश मंडळांसाठी केलेले प्रयत्न असोत किंवा झालेल्या मोठ्या पावसाळ्यातील पुरासारख्या आपत्तीप्रसंगी तात्याची तत्परता पहायला मिळाल्याचे प्रसंग असोत...अशावेळी तात्या शहरासाठी पुढे असतातच...पहिल्यांदाच निवडून येऊन देखील जुन्या जाणत्या अनुभवी नगरसेवकाची प्रगल्भता त्यांच्यात आहे... तात्या शहराच्या कोणत्याही प्रभागाची समस्या सोडवण्यासाठी पुढे असतात...नगरसेवक शहराचा असतो केवळ आपल्या वार्डासाठी नव्हे अशी त्यांची वैचारिकता आहे...त्यांच्या एकूणच कामाची पद्धत व शहरासाठी झटण्याची प्रवृत्ती त्यांच्या भविष्यातील उत्तुंग नेतृत्वाची चुणूक नक्कीच दाखवते...

 नगरसेविका सौ अनिता पवार यांचे पती व ना बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक युवा नेते सुहास पवार यांचे देखील वार्डात वाखाणन्याजोगे काम आहे कार्यकर्त्याला ताकद कशी द्यायची हे शिकण्यासाठी सुहास पवार यांचे उदाहरण पुरेसे आहे त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे लोकांच्यात मिसळून काम करण्याची त्यांची वृत्ती त्यांना नेतृत्वाची संधी देत असल्याने त्यांच्या कामाचे नेहमीच शहरातून कौतुक होत असते सौरभ तात्यांना त्यांची नेहमीच खंबीर साथ असते नगरसेविका सौ अनिता पवार व पती सुहास पवार यांनी लोकसेवेसाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे आज उद्या आणि परवा असे सलग तीन दिवस कोविड लसीकरण मोहीम पालिकेच्या मदतीने याठिकाणी होत असल्याने लोकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन सौरभ तात्या व सुहास पवार मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे

Wednesday, September 29, 2021

207 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 2 बाधितांचा मृत्यू 264 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 207 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 2 (9952), कराड 24 (38839), खंडाळा 11 (14061), खटाव 20 (25456), कोरेगांव 14 (21753), माण 17 (17656), महाबळेश्वर 2 (4667), पाटण 2 (10084), फलटण 46 (36846), सातारा 64 (51090), वाई 3 (15655) व इतर 3 (2092) असे  आज अखेर एकूण 248151 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या (कोरेगांव 1 व वाई 1) असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6084 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 264 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 2070874*
*एकूण बाधित – 248151*
*घरी सोडण्यात आलेले – 239167*
*मृत्यू –6084*
*उपचारार्थ रुग्ण– 5346*
                                                
                                         0000000

Tuesday, September 28, 2021

150 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यू 241 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 150 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर एका बाधिताचा मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली  6  (9950), कराड 13  (38815), खंडाळा  5 (14050), खटाव 19   (25437), कोरेगांव  26 (21739), माण 20  (17639), महाबळेश्वर  0  (4665), पाटण  1 (10082), फलटण 22  (36800), सातारा  29 (51027), वाई  5 (15652) व इतर  4 (2092) असे आज अखेर एकूण 247948 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या (कोरेगांव 1) असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6082 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 241 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 2063368*
*एकूण बाधित – 247948*
*घरी सोडण्यात आलेले – 238903*
*मृत्यू –6082*
*उपचारार्थ रुग्ण– 5403*
                                                
                                         0000000

Monday, September 27, 2021

रोटरी क्लब ऑफ कराडचा नेशन बिल्डर अवॉर्ड सोहळा उत्साहात

बंध माझा ऑनलाइन
कराड
रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा नेशन बिल्डर अवॉर्ड सोहळा याहीवर्षी उत्साहात पार पडला
सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील  यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कराड शहर व परिसरातील एकूण बारा शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा पुढील प्रमाणे

सौ. अबोली निलेश फणसळकर, सरस्वती विद्या मंदिर कराड. 
श्री. संतोष किसन बाबर, 
जिल्हा परिषद, केंद्र शाळा, शिंदे मळा, मलकापूर. 
सौ. स्वाती केशवराव पाटील, 
कै.काशिनाथ नारायण पालकर, आदर्श विद्यामंदिर, कराड.
सौ  ज्योती राजेश ननवरे, 
टिळक हायस्कूल, कराड.
सौ. राधिका राजीव जोशी, 
होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल, कराड. 
श्रीमती वर्षा झीमरे बनसोडे, 
अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालय, वाहगाव. 
सौ. अपर्णा संजय देसाई,
 कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा स्कूल, कराड. 
सौ. सविता दिलीप कुंभार,
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुली शेनोली.
सौ. ज्योती राजेंद्र कुमार राऊत, कै. श्री. शेठ रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड. 
सौ. अश्विनी अनिल हनमसागर 
डॉ. द.शी. एरम मूकबधिर विद्यालय, विद्यानगर, कराड.
,.श्री. अशोक राजाराम गुरव, 
यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर. 
श्री. भिकोबा बाबुराव साळुंखे, श्री शिवाजी विद्यालय कराड.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सर्व शिक्षक व उपस्थितांना मार्गदर्शन केले. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर  डॉ. राहूल फासे यांची प्रमुख उपस्थिती होती. क्लबचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे यांनी श्रीनिवास पाटील साहेब यांचं स्वागत केलं. लिटरसी डायरेक्टर राहुल पुरोहित यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. सूत्रसंचालन किरण जाधव यांनी केले.  यावेळी शशांक पालकर यांची रोटरी सातारा कॉप्स च्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. क्लब सेक्रेटरी अभय पवार यांनी आभार मानले. यावेळी शिक्षकांचे कुटुंबीय तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी क्लब सदस्य अनघा बर्डे, प्रबोध पुरोहित, राजेंद्र कुंडले, वैभव कांबळे, अभय नांगरे,प्रवीण परमार, गजानन माने, डॉ.संतोष टकले, चंद्रशेखर पाटील, बद्रीनाथ धस्के,आदित्य कुलकर्णी, अनिल कलबुर्गी,मुकुंद कदम, रवींद्र देशमुख आदी उपस्थित होते.

147 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 493 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 27 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 147 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली  0  (9944), कराड 11  (38802), खंडाळा  2 (14045), खटाव 29   (25418), कोरेगांव  7 (21713), माण 6  (17619), महाबळेश्वर  4  (4665), पाटण  3 (10081), फलटण 44  (36778), सातारा  35 (50998), वाई  5 (15647) व इतर  1 (2088) असे आज अखेर एकूण 247798 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 493 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 2056156*
*एकूण बाधित – 247798*
*घरी सोडण्यात आलेले – 238662*
*मृत्यू –6081*
*उपचारार्थ रुग्ण– 5494*
                                                
                                         0000000

सभापती हणमंतराव पवार कराडात चौथ्यांदा राबवणार कोविड लसीकरण मोहीम...अधिकाधिक लोकांनी लाभ घेण्याचे सभापती पवारांचे आवाहन...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार यांच्या पुढाकाराने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने काल रविवार दिनांक 26 रोजी येथील दिवटे गल्लीतील चौंडेशवरी मंदिर याठिकाणी मोफत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती उद्या मंगळवार दिनांक 28 रोजी देखील सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पुन्हा कोरोना लसीकरण मोहीम शहरातील नागरिकांसाठी दिवटे गल्ली येथे राबवली जाणार आहे अशी माहिती बांधकाम सभापती हणमंतराव पवार यांनी दिली आत्तापर्यंत एकूण तीन वेळा पवार मेहेरबान यांनी ही लसीकरण मोहीम पालिकेच्या सहकार्याने राबवली आहे आता चौथ्यांदा ही मोहीम ते उद्या (मंगळवारी) राबवणार आहेत अधिकाधिक लोकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे

नगरसेवक हणमंतराव पवार यांनी कोरोना काळात रस्त्यावर उतरून लोकांना सगळ्या प्रकारे मदत केली आहे  स्वतः घरोघरी जाऊन लोकांचे टेम्प्रेचर चेक करणे, रुग्णांना ऍडमिट करून बेड मिळवून देणे अशी लोकोपयोगी कामेही त्यांनी कोरोना काळात केली आहेत  स्मशानभूमीत जाऊन कोविड योध्याचे मनोधैर्य वाढण्याचे काम देखील त्यांनी वारंवार केले आहे
शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्यांनी पाटण कॉलनीतील लोकांची सर्वतोपरी सहकार्य व सोय करून देण्यासाठी धडपड केली होती सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेऊन काम करणारे पवार मेहेरबान आता चौथ्यांदा कोविड लसीकरण मोहीम पालिकेच्या सहकार्याने राबवत आहेत शहरात त्यांच्या कामाचे कौतुक होते आहे

 

नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर यांच्या पुढाकाराने शुक्रवार पेठेत कोविड लसीकरण मोहीम ; 250 हुन अधिक लोकांनी घेतला लाभ...लसीकरण यशस्वी करण्यासाठी नामदेव शिंपी समाजाने दिले मोठे योगदान...


वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील पालिकेचे आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर यांच्या पुढाकाराने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने शहरातील शुक्रवार पेठेतील नामदेव मंदिर येथे आज मोफत कोविड लसीकरण मोहीम राबवण्यात आली ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्याकरिता येथील नामदेव शिंपी समाज संस्थेचे मोठे योगदान मिळाले आहे

शहराच्या स्वच्छतेसह अनेक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेणारे मेहेरबान वाटेगावकर यांनी शहरातून होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामधून आपला सहभाग नोंदवत आपले समाज्याप्रति असणारे कर्तव्य वेळोवेळी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नियमित नगरपालिकेत उपस्थित राहून कोणत्याही प्रभागातील लोकांना काहीही अडचण आल्यास पुढे होऊन ती सोडवताना त्यांना अनेकांनी पाहिल आहे. विशेष म्हणजे शहरातील असणाऱ्या प्रत्येक राजकीय पार्टीमध्ये त्यांचे एक विशेष स्थान आहे.   शहरातील या राजकीय पार्ट्यांमधील सदस्यामध्ये  ते असे काहीवेळा मिक्स झालेले दिसतात,जणू त्याच पार्टीचे सदस्य वाटू लागतात, हे त्यांचे वैशिष्ठय म्हणावे लागेल. त्यांनी मधल्या लॉक डाऊन काळात गरिबांच्या भावना ओळखून दिलेल्या योगदानाचे सर्वत्र कौतुक झाले.आज त्यांनी पुढाकार घेवून नामदेव शिंपी समाजाच्या मोठ्या सहकार्याने कोविड लसीकरण मोहिम राबऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहेएकूण 250 हुन अधिक लोकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतल्याचे वाटेगावकर यांनी सांगितले. नामदेव शिंपी समाज संस्थेचे ही मोहीम यशस्वी करण्याकरिता सर्व सहकार्य मिळाल्याचेही वाटेगावकर म्हणाले यावेळी डॉ शीतल कुलकर्णी  नामदेव शिंपी समाजाचे  संचालक  संजय माळवदे, अतुल बारटक्के .बाळासाहेब माळवदे. संदीप  कालेकर,  संदीप खांडके, अनिल भांबुरे, सागर मिरजकर  तसेच स्वयंसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते  
 

Sunday, September 26, 2021

141 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 146 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली  1  (9944), कराड 14  (38791), खंडाळा  2 (14043), खटाव 27   (25389), कोरेगांव  10 (21706), माण 15  (17613), महाबळेश्वर  0  (4661), पाटण  2 (10078), फलटण 35  (36734), सातारा  27 (50963), वाई  5 (15642) व इतर  3 (2087) असे आज अखेर एकूण 247651 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 146 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 2049565*
*एकूण बाधित – 247651*
*घरी सोडण्यात आलेले – 238169*
*मृत्यू –6081*
*उपचारार्थ रुग्ण– 5840*

Saturday, September 25, 2021

जनकल्याण’ची सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी ; नितीन गडकरी

वेध माझा ऑनलाइन

कराड

सहकार क्षेत्रात सर्व चांगल्या लोकांनी एकत्रित येऊन निस्वार्थी भावाने काम केल्यास उदिष्ट्पुर्ती होते. त्यासाठी समर्पित भावनेने काम करणे गरजेचे असून ते  जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी करीत आहेत. सहकार क्षेत्रात जनकल्याण चे अत्यंत चांगले काम केले आहे असे गौरोवोद्गार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी काढले.

 येथील हॉटेल पंकज येथे आज शनिवारी २५ रोजी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा द्वितीय 'जनकल्याण गौरव पुरस्कार' केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एहसास मतीमंद मुलांचे वसतिगृह, वळसे जि. सातारा या संस्थेस प्रदान करण्यात आला. एक लाख रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. एहसासचे अधीक्षक संजय कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी मंत्री गडकरी बोलत होते.

 यावेळी जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अनिरुध्द देशपांडे, संस्थेचे संचालक सीए. शिरीष गोडबोले, डॉ. अविनाश गरगटे, डॉ. प्रकाश सप्रे, एहसासचे अधीक्षक संजय कांबळे, निवड समितीचे सदस्य रवींद्र कर्वे, प्रमोद कुलकर्णी, गोविंद मोकाशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 

महाविद्यालये सुरू करण्याबावत लवकरच निर्णय ; ना उदय सामंत यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील काही महाविद्यालयांच्या संकुलात करोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष असल्याने, महाविद्यालय सुरू करण्यास अडचणी येत आहेत. याबाबत येत्या आठवड्यात आढावा घेउन महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. त्याचप्रमाणे तासिकातत्वावरील प्राध्यापकांच्या (सीएचबी) वेतनात २५ टक्के वेतनवाढ होणार असून, त्याचा निर्णय लवकर जाहीर होईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

खासगी कार्यक्रमानिमित्त सामंत पुण्यात आले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरू करण्याबाबत विचारल्यावर सामंत म्हणाले की, विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत नुकतीच बैठक झाली आहे. त्यामध्ये विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचा अहवाल काही दिवसांत सादर करण्यात येईल.

अहवाल मिळाल्यानंतर साधारण दिवाळी झाल्यानंतर महाविद्यालय सुरू करण्यात येतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले. टीचर्स ट्रेंनिग ऍकॅडमीच्या बांधकाम ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. याचा आढावा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. या ऍकॅडमीचा फायदा उच्च व तंत्रशिक्षण विभागासोबतच शालेय शिक्षण विभागालाही होणार आहे. येत्या काही दिवसात ऍकॅडमीचे उद्घाटन होईल, असे सामंत यांनी सांगितले.

राज्यात कॉलेजांमधील रिक्त प्राचार्यांची पदे लवकर भरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कॉलेजांमध्ये कोणत्या विषयांसाठी प्राध्यापक नाहीत, याची माहिती गोळा करण्यात येत आहे. या पदांचा विचारही प्राध्यापक भरतीत करण्यात येईल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

सीएचबीच्या प्राध्यापकांना २५ टक्के वेतनवाढ
राज्यात तासिकातत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या वेतनात २५ टक्के वेतनवाढ होणार आहे. ही वेतनवाढ शासकीय, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना लागू राहणार आहे. त्याबाबत निर्णय येत्या दोन ते दिवसांत प्रसिद्ध होईल. या निर्णयामुळे प्राध्यापकाला दरमहा साधारण २५ ते ३० हजार रुपये वेतन मिळणार आहे. राज्यात प्राध्यापक भरती होणार आहे. एकदा अर्थ विभागाची मान्यता मिळाली की, भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.




178 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 122 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 25 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 178 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 122 जण डिस्चार्ज झाले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 0 (9943), कराड 13 (38777), खंडाळा 3 (14041), खटाव 11  (25362), कोरेगांव 11 (21696), माण 14 (17598), महाबळेश्वर 7  (4661), पाटण 4 (10076), फलटण 59 (36699), सातारा 45 (50936), वाई 2 (15637) व इतर 9 (2084) असे आज अखेर एकूण 247510 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 122 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 2042799*
*एकूण बाधित – 247510*
*घरी सोडण्यात आलेले – 238023*
*मृत्यू –6081*
*उपचारार्थ रुग्ण– 5845*
                                                                 0000

कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटलचे कार्य उत्तुंगच - ना नितीन गडकरींचे गौरवोद्गार...

वेध माझा ऑनलाइन
कराड
एकूणच सम्पूर्ण देश कोरोना काळात मोठ्या संकटातून जात असताना येथील कृष्णा हॉस्पिटलचे त्याकाळातील योगदान व कार्य उत्तुंगच होते हे विसरून चालणार नाही असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे काढले. आज येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना योद्ध्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. प्रशांत परिचारक, माजी आ. आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, भाजपाचे नेते मकरंद देशपांडे, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदी उपस्थित होते

 ते पुढे म्हणाले, सरकारी यंत्रणेला जे शक्य नाही, त्यापेक्षा जास्त सेवा कृष्णाने दिल्या आहेत. सद्य:स्थितीला देशात ६०० मेडिकल कॉलेज, ‘एम्स’सारख्या ५० वैद्यकीय संस्था आणि २०० सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची आवश्यकता आहे मात्र तितकीच डॉक्टरांचीही कमतरता जाणवते  वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी मेडिकल आणि इंजिनियरिंग कॉलेज उभे केले. लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने उभे राहिलेल्या या संस्थांचं योगदान मोठं आहे. शाळेंची सध्या अवस्था बिकट आहे. विद्यार्थी आहेत तर शिक्षक नाहीत, शिक्षक आहेत तर इमारत नाही तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागात, आर्थिक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कामाची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. 
महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना विनंती आहे साखर उत्पादन कमी करा, इथेनॉल निर्मितीवर भर द्या असेही ते यावेळी म्हणाले

श्रीकृष्ण व्हॅली प्रकल्पाच्या विविध उपक्रमांचा ना गडकरींच्या हस्ते शुभारंभ...

वेध माझा ऑनलाइन
कराड
चरेगांवकर ब्रदर्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने आगाशिव डोंगराच्या पायथ्याला विकसित होत असलेल्या श्रीकृष्ण व्हॅली या प्रकल्पातील विविध उपक्रमांचा शुभारंभ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा सन्मान यावेळी चरेगांवकर बंधूंच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शेखर चरेगांवकर यांनी कार्यक्रमाचे स्वरूप सांगून या प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली. ग्रामीण भागात नवे व्यवसाय सुरु व्हावेत, तरुण वर्गास रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, शेतीमध्ये प्रक्रिया उद्योग सुरु व्हावेत, यासाठी त्यांना या प्रकल्पात घरे व जागा उपलब्ध करून दिली गेली आहे. देशातील प्रत्येकाला स्वतःचे परवडणारे घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने केलेली एक कृती म्हणजे हा प्रकल्प आहे, असे चरेगांवकर म्हणाले.
६ लाखांमध्ये घर या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ६० घरांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ५ घरांच्या चाव्या श्रीकांत कांबळे, संजय पाटील, रामेश्वर रोडे, व्यंकेश वाघमारे व भगवान वरेकर या घरमालकांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. 

ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी सर्व सोयींनी युक्त अशी जागा व उत्पादित मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी यासाठी श्रीकृष्ण व्हॅली या प्रकल्पात व्यावसायिक जागा असणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन यावेळी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण भागातील युवकांकडे उत्तम क्रीडा कौशल्य असते, पण त्यांना ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी सरावास आवश्यक सुविधा उपलब्ध नसतात. याचीच दखल घेवून या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे टर्फची निर्मिती करण्यात आली आहे. याचेही उद्घाटन यावेळी गडकरी यांनी केले. याठिकाणी सराव करून हे खेळाडू नक्कीच जागतिक स्पर्धेतील पदकांना गवसणी घालू शकतील.

कृषी पर्यटन, कृषी विभाग, रिसॉर्ट, लॉन, चिल्ड्रेन पार्क, ओपन जीम, रेन डान्स, ट्रेनिंग हॉल, मॅजिक गार्डन, धबधबा यासारख्या सोयींमुळे श्रीकृष्ण व्हॅली हा प्रकल्प ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रोल मॉडेल ठरेल असा विश्वास यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर आ.चंद्रकांतदादा पाटील, खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आ.शिवेंद्रराजे भोसले, आ.जयकुमार गोरे, डॉ.अतुल भोसले, सुभाषराव जोशी, विक्रम पावसकर, मकरंद देशपांडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


#%कोल्हापूर नाका, कराड येथे भराव पुलाच्या ऐवजी उड्डाण पूल करणे तसेच जुना कोयना पूल ते नवीन कृष्णा पूल यांना जोडणारा नवीन रस्ता (रिव्हर लिंक रोड) करणे या कामाची मागणी यावेळी चरेगांवकर यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली...%#



कराड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या प्रवेश फॉर्म्सचे गटनेते सौरभ तात्यांच्या हस्ते वाटप...

वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड प्रीमियर लीग (के पी एल) क्रिकेट स्पर्धा मागील वर्षी यशस्वी पार पडली होती यंदाही कराड प्रीमियर लीग सीजन 2 लवकरच पार पडणार आहे या स्पर्धेच्या प्रवेश फॉर्मचे वाटप लोकशाही आघाडीचे गटनेते,नगरसेवक सौरभ पाटील (तात्या) यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कराड शहरातील खेळाडूंच्या पाठीशी तात्या नेहमीच असतात त्यांना क्रिकेतसह प्रत्येक खेळाविषयी आस्था आहे वेगवेगळ्या खेळाबद्दल  चांगली माहितीही आहे विशेषतः शहरातील तरुणांना हॉर्स रायडिंग बद्दल निरनिराळे प्रशिक्षण देण्यासाठी भविष्यात त्यांचे प्रयत्न राहणार आहेत असे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवले आहे दरम्यान  या कराड प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या प्रवेश फॉर्मचे वाटप आज त्यांच्या हस्ते करण्यात आले कराड प्रीमियर लीगचे शमनजीत आत्तार (सर).हणमंत घाडगे, मेहबुब शेख, जगदीश हिपलगर(जटाप्पा) संतोष तोडकर, नामदेव सावंत, अब्दुल आगा, लाला बागवान तसेच इतर अनेक खेळाडू यावेळी उपस्थित होते.

आजपासून कराडातील दिवटे गल्लीतील चौंडेश्वरी मंदिर येथे कोविड लसीकरण सुरू ; पालिकेच्या सहकार्याने नगरसेवक हणमंतराव पवार यांचा उपक्रम... अधिकाधिक लोकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा ; हणमंतराव पवार यांचे आवाहन...


वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार यांच्या पुढाकाराने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने येथील दिवटे गल्लीतील चौंडेशवरी मंदिर याठिकाणी मोफत कोविड 19 लसीकरण केंद्र शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे यापूर्वीही त्यांनी ही सेवा पालिकेच्या माध्यमातून शहरातील लोकांना दिली होती आता पुन्हा पवार मेहेरबान यांनी ही मोहीम सुरू केली आहे शहर व परिसरातील अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हणमंतराव पवार यांनी केले आहे

नगरसेवक हणमंतराव पवार यांनी शहरात कोरोनाचा कहर चालू असताना रस्त्यावर उतरून लोकांना कोरोना बद्दल प्रबोधन करत मास्क आणि सॅनिटायझर चे शहर व परिसरातून वाटप केले होते स्वतः घरोघरी जाऊन लोकांचे टेम्प्रेचर चेक करत रुग्णांना ऍडमिट करून बेड मिळवून देण्याचे कामही केल्याचे शहराला माहीत आहे कोरोना पेशंटच्या  मृत्यूनंतर त्यांनी स्मशानभूमीत जाऊन कोविड योध्याचे मनोधैर्य वाढण्याचे काम देखील वारंवार केले आहे

शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा तेथील पाटण कॉलनी येथील रहेवाश्यांची गैरसोय होते त्यांना अनेक अडचणी ना सामोरे जावे लागते याचे भान ठेवून काही दिवसापूर्वी झालेल्या मोठ्या पावसाने शहरात काही दिवसांपूर्वी दाणादाण उडवून दिली होती तेव्हा स्वतः बांधकाम सभापती रस्त्यावर आले होते त्यांनी त्या कॉलनीतील लोकांची त्यावेळी सर्वतोपरी सोय करून देण्यासाठी धडपड केली होती व प्रशासनाला योग्य त्या सूचनाही केल्या होत्या प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारे पवार मेहेरबान वेळ पडली की जनतेसाठी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य कसे  पेलतात याचे उदाहरण यानिमित्ताने लोकांसमोर आले होते

 हणमंतराव पवार यांनी नुकतेच येथील दिवटे गल्ली येथील चौडेश्वरी मंदिरं येथे मोफत कोविड 19 लसीकरण सेंटर सुरू केले आहे त्याठिकाणी शहरातील अधिकाधिक लोकांनी येऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यांच्या वतीने करण्यात आले आहे

Friday, September 24, 2021

कराडच्या प्रीतिसंगम बागेतील प्राचीन गणेशाची गटनेते सौरभ पाटील यांच्या हस्ते आरती...जेष्ठ नागरिकांचा तात्यांशी संवाद...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील प्रीतिसंगम बाग येथे स्व चव्हाण साहेबांच्या समाधी परिसरात असलेल्या प्राचीन मंदिरातील गणपतीची  आरती आज संकष्टी चतीर्थीनिमित्त नगरसेवक गटनेते सौरभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी त्याठिकाणी उपस्थित अनेक भाविकांशी व जेष्ठ नागरिकांशी सौरभ तात्यांनी आपुलकीचा संवाद साधला
 
त्याठिकाणी उपस्थित जेष्ठ नागरिकांनी सदर प्राचीन मंदिराच्या जिर्णोधार झाल्यापासून ते आजपर्यंत त्याठिकाणी होणाऱ्या विधिवत पूजा अर्चनेबाबतची विस्तृत माहितीही यावेळी दिली

यावेळी श्री मुकुंदराव कुलकर्णी (काका), नगरसेविका सौ. विद्या पावसकर, प्रसाद पावसकर,  रामचंद्र जोशी, बाळासाहेब हादीमनी, मेघराज पाटील, अविनाश एकांडे, प्रसाद हसबणीस, प्रकाश तांबवेकर,  पालकर काका, श्रीधन बलकुंदिकर, विजय कुलकर्णी, नवाज बाबा सुतार, सौ.पंडित मॅडम तसेच इतर जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

186 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यू 257 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 186 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
 तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 3 (9943), कराड 25 (38764), खंडाळा 5 (14038), खटाव 21  (25351), कोरेगांव 19 (21685), माण 15 (17584), महाबळेश्वर 4  (4654), पाटण 3 (10072), फलटण 42 (36640), सातारा 38 (50891), वाई 6 (15635) व इतर 5 (2075) असे आज अखेर एकूण 247332नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच कोरोना उपचारादरम्यान कराड तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 257 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 2034079*

*एकूण बाधित – 247332*

*घरी सोडण्यात आलेले – 237901*

*मृत्यू –6081*

*उपचारार्थ रुग्ण– 5789*

                                                                 0000

पुणे सातारा महामार्गावरील टोल रद्द करणार ; नामदार गडकरींची पुण्यात मोठी घोषणा

वेध माझा ऑनलाइन
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करून रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५० कोटींचा निधी देण्यात येईल
तसेच या रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांचा एक खाजगी संस्था अभ्यास करत असून, लवकरच अहवाल सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात दिली.

राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात तब्बल १३४ कोटी रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डाॅ.निलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व आमदार व अधिकारी उपस्थित होते.


कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमध्ये ना गडकरींच्या उपस्थितीत होणार कोरोना वॊरिअर्सचा सत्कार...

वेध माझा ऑनलाइन
कराड
केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरीसाहेब यांचे शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमध्ये आगमन होत आहे. याठिकाणी त्यांच्या उपस्थितीत कोरोना वॊरिअर्सचा प्रातिनिधिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

 विविध रस्ते कामांचा शुभारंभ आणि कोनशीला अनावरण समारंभ रस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता येथील फर्न हाॅटेल येथे होणार आहे.सुमारे 400 कि.मी.लांबीच्या रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान ना गडकरी सकाळी ठीक 10 वाजता कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमध्ये कोरोना वॊरिअर्सच्या  प्रातिनिधिक सत्कार करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे 

चरेगावकर ब्रदर्स यांच्या विंग येथील श्रीकृष्ण व्हॅली प्रकल्पास नामदार नितीन गडकरी देणार भेट...

वेध माझा ऑनलाइन
कराड
चरेगांवकर ब्रदर्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे विकसित केले गेलेल्या विंग येथील श्रीकृष्ण व्हॅली या बहुउद्देशीय प्रकल्पास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी भेट देणार आहेत. 
यावेळी प्रकल्पातील सामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या योजनेतील पूर्ण झालेल्या घरांचा चावी प्रदान कार्यक्रम, लघु उद्योजकांना मालकी तत्वावर द्यावयाच्या कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या टर्फचे उदघाटन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे देखील उपस्थित असणार आहेत.

कोरोना नियमांमुळे मोजक्या निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.  नागरिकांना हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे पाहता येणार आहे.

Thursday, September 23, 2021

हिदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील यांनी दिल्या शुभेच्छा...

वेध माझा ऑनलाइन
कराड
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांचे समर्थक, सुर्ली गावचे सुपुत्र हिदकेसरी पैलवान संतोष वेताळ (आबा) यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कराड उत्तरचे युवा नेते मा.जशराज पाटील(बाबा) यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी सिध्दार्थ चव्हाण, सरपंच दत्तात्रय वेताळ, नवनाथ पाटील, अमोल भोगे, कृष्णत मदने, सोनू मदने, हणमंत पवार, सतिश वेताळ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

227 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; एका बाधिताचा मृत्यू 396 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 227 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 6 (9940), कराड 27 (38739), खंडाळा 6 (14033), खटाव 44  (25330), कोरेगांव 8 (21666), माण 22 (17569), महाबळेश्वर 8  (4650), पाटण 3 (10069), फलटण 51 (36598), सातारा 42 (50853), वाई 8 (15629) व इतर 2 (2070) असे आज अखेर एकूण 247146 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच कोरोना उपचारादरम्यान सातारा तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. 
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 396 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 2025885*
*एकूण बाधित – 247146*
*घरी सोडण्यात आलेले – 237644*
*मृत्यू –6074*
*उपचारार्थ रुग्ण– 5860*
                                                                 0000

Wednesday, September 22, 2021

कराडात डेंग्यू, चिकन गुनीयाचे पेशंट वाढू लागले...पालिकेकडून काहीच उपाययोजना होताना दिसत नाही...शहरात चर्चा


वेध माझा ऑनलाइन
कराड
शहरात डेंग्यू चिकन गुनीया चे पेशंट वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे शहरातून  औषध फवारणी किंवा इतर उपाययोजना होताना दिसत नाहीत लोकांच्या याबाबत तक्रारी वाढल्या आहेत शहरात दिवसेंदिवस पेशंट वाढत आहेत शहरातील नगरसेवक चिकन गुनियाने बाधीत झाल्याची माहिती मिळत आहे आरोग्य सभापतींनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे दरम्यान शहरात औषध फवारणी व इतर आवश्यक उपाययोजना सुरू आहेत असे वाटेगावकर याविषयी बोलताना म्हणाले आहेत तर पालिकेतील विरोधी लोकशाही गटाचे नेते सौरभ पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना कामकाजाबाबतीत शहरात आरोग्य खात्याच्या नियोजनाचा अभाव असल्याचे सांगितले 

 शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी काही दिवसापूर्वी शहरात डेंग्यू मलेरिया चिकन गुनीया चे रुग्ण वाढत असल्याचे दाखवून देत येथील पालिकेला त्याबाबत काही उपाययोजना करा असे निवेदन देऊन सुचित केले होते मात्र अद्याप  परिणामकारक अशा काहीही उपाययोजना पालिकेकडून झाल्या नाहीत हि वस्तुस्थिती आहे केवळ वेळ मारून नेण्याचं काम सुरू असल्याचे दिसते आहे खरतर पाऊस अधून मधून सुरू आहे त्यामुळे डास हे होणारच हे समजून घेऊन डेंग्यू आणि चिकन गुनीयाबाबत नियोजनबद्ध काम होणे शहराला अपेक्षित होतेमात्र तसे झाले नाही त्यामुळे पेशंट वाढू लागले आहेत ही वस्तूस्थिती आहे 

येथील दवाखान्यातून शहरातील पेशंट ऍडमिट आहेत की आसपासच्या गावातील आहेत हे पाहण्यातच वेळ घालवण्याचे काम येथील पालिकेकडून चालू आहे... कारण शहरातील पेशंट ऍडमिट नाहीत...  बाहेरचे लोक ऍडमिट आहेत... असे कोणी विचारले तर सांगायला बरे पडते...पण शहरातील रुग्णांचे काय...असे विचारले तर त्यांचे उत्तर काहीच नसते...खरतर शहरात धुरंडी फिरवणे,औषध फवारणी करणे पावडर फवारणी किंवा तत्सम घटक वापरून डासांचा बंदोबस्त करणे तसेच शहरातील लोकवस्तीमध्ये पालिकेकडून ठिकठिकाणी डेंग्यू किंवा चिकन गुनीया सदृश्य एरियामध्ये त्याबाबतचा सर्व्हे होणे गरजेचे असताना अद्याप यापैकी काहीच होताना का दिसत नाही हाच मोठा प्रश्न आहे...शहरात ठिकठिकाणी वाढलेली अनावश्यक झाडी काढा त्यामुळे डासांचा त्रास होतोय असे लोकांनी पालिकेत येऊन तक्रार देऊन देखील ती झाडी अद्यापही काढली जात नाही... असे का ?... हेही लोकांना आता कळेना झालंय...

 कामानिमित्त काढून ठेवलेले खड्डे आणि त्यातून झालेला चिखल काही ठिकाणी तसाच आहे तुंबलेले नाले स्वच्छ केलेले अद्यापही दिसत नाहीत या सर्व प्रकारामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे त्याचे काय ? डेंग्यू पासून बचाव करण्यासाठी लोकानी काय करायचे हे सांगणारा व्हीडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर  फिरत होता खरतर  लोकांनी काळजी घेतलीच पाहिजे त्यांबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही पण केवळ लोक अमुक अमुक पाळत नाहीत... अमुक अमुक करत नाहीत... असे बोलून लोकांच्या माथ्यावर सगळा दोष देऊन याविषयाचा तोडगा निघणार नाही,तर आरोग्य विभागाच्या चोख व जबाबदारीच्या कारभाराची जनतेला आता अपेक्षा आहे लोकांनी अमुक करा...तमुक करा...हे सांगणारी कराड पालिका डासांच्याबंदोबस्तासाठी स्वतः काय उपाययोजना करणार आहे... हा देखील खुलासा लोकांना आता हवा आहे...कारण पेशंट वाढत आहेत...सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्तही केल्या आहेत 


आरोग्य खात्याने नियोजनबद्ध काम करणे गरजेचे - नगरसेवक सौरभ पाटील

फाईट द बाईट हा उपक्रम केवळ कागदावरच आहे का ? याबाबतची अमलबजावणी प्रॉपर होताना दिसत नाही...
डासांचा बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य खात्याने औषध फवारणी तसेच इतर आवश्यक उपाययोजनांची व्यवस्था करण्याची गरज आहे... डेंग्यू किंवा चिकन गुनीयाबाबत शहरातून नियोजनबद्धपणे काम होणे अपेक्षित आहे त्यासाठी प्रत्येक एरियासाठी कामाचे शेड्यूल्ड आखणे गरजेचे आहे... बाधीत परिसराचा सर्व्हे करून त्यानंतर तेथे उपाय करणे सहज शक्यही आहे... मात्र हे सगळं करण्यासाठी इच्छाशक्ती हवी... अशी मार्मिक प्रतिक्रिया विरोधी लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांनी याविषयी बोलताना दिली



उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन सातारा नगरपालिका निवडणूक लढणार नसल्याचे दिले संकेत...

वेध माझा ऑनलाइन 
साताऱ्यातील विकासकामांबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सोबत घेऊन काम करणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी जनता माझ्या पाठीशी असल्याचे उत्तर देत शिवेंद्रराजे यांना सोबत घेऊन सातारा नगरपालिका निवडणूक लढणार नसल्याचे पुन्हा संकेत दिले आहेत. उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांमधील मतभेद नगरपालिकेच्या निवडणुकी आधीच दिसू लागले आहेत. उदयनराजे भोसले हे सातारा नगरपालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटन करत आहेत. उदयनराजे पत्रकारांना विकास कामांची माहिती देत असताना पत्रकारांनी राजेंना आमदार शिवेंद्रराजे यांना सोबत घेऊन काम करणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयाला बगल देत जनता माझ्या पाठीशी असल्याचे विधान केल आहे. यावरून दोन्ही राज्यांमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत आहे. उदयनराजे भोसलेंच्या या भूमिकेमुळं साताऱ्याच्या राजकारणाची पुढील दिशा कशी असेल हे स्पष्ट होतं आहे.

दीपक पाटील मित्रपरिवाराच्या वतीने येत्या शुक्रवारी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 दीपक (दादा) पाटील मित्रपरिवार व सोमवार पेठ पाण्याची टाकी येथील बाल गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 रोजी म्हणजेच येत्या शुक्रवारी जागतिक हृदयविकार जागरूकता दिनाचे औचित्य साधून आरोग्य चिकित्सा मोफत शिबीर आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संयोजकांकडून नुकतीच देण्यात आली सदर शिबिरास येणाऱ्या प्रत्येकाने मास्क घालून येणे बंधनकारक आहे हे शिबिर कोरोनाचे सर्व नियम पाळून होणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले

 या शिबिरामधून रक्तदाब मधुमेह याबाबतची तपासणी ज्यांना करून घ्यायची आहे त्यांची तपासणी याठिकाणी मोफत होणार आहे 
तसेच मोफत इ सी जी टेस्टदेखील यावेळी करण्यात येणार आहेत दात व डोळ्यांच्या तक्रारीबाबतची तपासणी किंवा चिकित्सा ज्यांना करून घ्यायची आहे त्याचीही मोफत डोळ्यांची व दातांची तपासणी त्याठिकाणी होणार आहे

दीपक पाटील मित्रपरिवाराच्या वतीने गेल्या कोविड काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना रक्तदान शिबिर आयोजित करून आपली सामाजिक बांधिलकी जपली होती या होणाऱ्या मोफत शिबिराच्या माध्यमातूनदेखील जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दीपक पाटील मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे 

 ज्या लोकाना या शिबिरातून तपासणी करून घ्यायची आहे त्यांनी येत्या शुक्रवार दिनांक 24 रोजी येथील मंगळवार पेठ येथील कन्याशाळा येथे सकाळी 10 ते 3 या वेळेत हजर रहायचे आहे 

या शिबिराबाबत अधिक माहितीसाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे...

मदन कुंभार 7020740688
मंदार अष्टेकर  9975652456
संकेत गोवेकर 7276050666
चैतन्य देशपांडे 9028898979

कराडच्या जैन युवा फोरमच्या मेडिकल कॅम्पला गटनेते सौरभ तात्यांनी दिली भेट...


वेध माझा ऑनलाइन
कराड
आज येथील जैन युवा फोरमच्या वतीने मोफत मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील(तात्या) यांनी त्याठीकाणी भेट दिली 

जैन युवा फोरमच्या वतीने नेहमीच अनेक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवले जातात.या उपक्रमांचा लाभ कराड शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत असतो असे सांगत यावेळी सौरभ तात्यांनी जैन युवा फोरमच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
यावेळी जैन युवा फोरमचे सर्व सक्रिय सदस्य उपस्थित होते.

ओबीसींचं आरक्षण घालवण्याचं भाजपाचे प्लानिंग आहे -विजय वडेट्टीवार यांचा आरोप...

वेध माझा ऑनलाइन
राज्यपाल भगतसिंग कोशय्यारी यांनी ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश परत पाठवला आहे. त्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ओबीसींचं आरक्षण घालवण्याचं भाजपचं हे प्लानिंग आहे. ओबीसींनी खड्ड्यात घालण्याचा कटकारस्थान सल्लागारांचा हा प्रयत्न असावा त्यातून हा अध्यादेश परत पाठवला असावा असा माझा स्पष्ट आरोप आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद 
साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपची ही एकूण भूमिका जी आहे ती ओबीसींचं रिझर्व्हेशन डावलण्यासाठी केलेल्या कटकारस्थानाचा भाग आहे. ओबीसींनी खड्ड्यात घालण्याचा कटकारस्थानाच सल्लागारांचा हा प्रयत्न असावा त्यातून हा अध्यादेश परत पाठवला असावा असा माझा स्पष्ट आरोप आहे, असं सांगतानाच विरोधी पक्षाला विचारात घेऊन आणि त्यांनी दिलेल्या सूचना घेऊन अध्यादेश काढला आहे. अध्यादेश काढताना केवळ सरकारची भूमिका नव्हती तर सर्वसमावेशक भूमिका होती. हाच एक पर्याय होता. त्याशिवाय दुसरा पर्याय राज्यासमोर नव्हता. त्यातही खोडा घालण्याचं काम होत असेल तर हा ओबीसींवरचा मोठा अन्याय आहे. उद्या जर त्यासाठी ओबीसी रस्त्यावर उतरला तर त्याला भाजप जबाबदार राहील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

तोपर्यंत भाजप झोपले होते का?

जनगणनेचा डाटा केंद्राकडे आहे. तो डाटा केंद्राने राज्याला द्यावा, तशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला द्यावे, एवढी विनंती करणारी आमची याचिका आहे. आता हा विषय मांडू उद्या. उद्या वकिलासोबत चर्चा करू. 2011मध्ये जनगणना झाली. त्यानंतर 2015मध्ये जातनिहाय जनगणना झाली. तो डेटा आम्हाला द्यावा. फडणवीसांच्या काळात इम्पिरिकल डेटा का जमा केला नाही. 2019पर्यंत भाजप का झोपले होते? कोविडमुळे आम्ही इम्पिरिकल डेटा गोळा करू शकलो नाही. दारादारात जाऊन डेटा गोळा करणं अशक्य आहे. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळेच आम्ही अध्यादेश काढला आहे, असं त्यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटलांनी उपकार केले नाहीत...

आम्ही ओबीसींच्या जागेवर ओबीसी उमेदवार देणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यालाही वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे. आरक्षण देणं आणि उमेदवार देणं यात फरक आहे. पुढच्यावेळी झिरो टक्के आरक्षण असल्यावर चंद्रकांत पाटील 100 टक्के उमेदवार देणार आहेत का? आज ओबीसीचे उमेदवार का दिले? कारण जागाच ओबीसींच्या होत्या. चंद्रकांत पाटलांनी काही उपकार केले नाहीत? काहीही बोलत आहेत. त्या काही दुसऱ्यांच्या जागा होत्या म्हणून ओबीसींना दिल्या आहेत. ओबीसींच्या जागा सर्वच पक्ष ओबीसींना देत आहेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीही देत आहे. तसेच पाटलांच्या पक्षांनीही दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

सातारा जिल्ह्यातील अपशिंगे गावाच्या विकासासाठी समिती स्थापन होणार

मुंबई दि.२२ : - सातारा जिल्ह्यातील सैनिकी परंपरा लाभलेल्या अपशिंगे (मिलिटरी) गावाचा इतिहास संपूर्ण जगासमोर आणण्याच्या दृष्टीने संग्रहालय निर्मिती व त्या अनुषंगाने प्रस्तावित पायाभूत सुधारणा सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार अपशिंगे (मिलिटरी) गावाचा विकास करण्यात येईल असे माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात माजी सैनिक कल्याण विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.

पहिल्या महायुद्धाच्या काळात अपशिंगे या गावातील ९० टक्के लोक सैन्यात सहभागी झाले होते.या गावाने अनेक वीर सैनिक दिले.त्याचा इतिहास जतन करण्याची गरज आहे.त्या अनुषंगाने संग्रहालयाची निर्मिती,ग्रंथालय,स्टेडियम,प्रशिक्षण संस्था व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात.त्यासाठी जागेची पाहणी करावी.कृषी विभागाच्या वतीने तेथील शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा असे निर्देशही भुसे यांनी दिले.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे सैन्यभरती बंद होती.ती पुन्हा सुरू करावी .त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
           

नगरपालिकां निवडणुकांसाठी दोन सदस्य प्रभाग पद्धती...राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय...

वेध माझा ऑनलाइन
कराड
राज्यात होणाऱ्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांसाठी बहुसदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच नगर पंचायतींमध्ये एक तर नगर परिषद, नगर पालिकांमध्ये दोन सदस्यांचे प्रभाग असतील. 

महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन सदस्यांची रचना असावी, असा आग्रह धरला होता. तर शिवसेनेची 4 सदस्यांची मागणी होती. याचा सुवर्णमध्य काढण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवण्यासाठी सरकारनं ही खेळी खेळल्याचं बोललं जातं आहे. 2017 च्या मनपा निवडणुकीत पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपुरात भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. पण यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच कायद्यात बदल करून पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धत आणली. पण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी कराडात....


वेध माझा ऑनलाइन
कराड
विविध रस्ते कामांचा शुभारंभ आणि कोनशीला अनावरण समारंभ रस्ते वाहतुक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता येथील फर्न हाॅटेल येथे होणार आहे.सुमारे 400 कि.मी.लांबीच्या रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे.

सदर समारंभास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, खा.संभाजीराजे छत्रपती, खा. उदयनराजे भोसले,मंत्री शंभूराज देसाई, खा. संजय मंडलिक खा.संजय पाटील,खा. श्रीनिवास पाटील,आ. शशिकांत शिंदे आ.मोहनराव कदम, खा.धैर्यशील माने,आ. अरुण लाड,आ. गोपीचंद पडळकर,आ. सदाभाऊ खोत, आ.शिवेंद्रराजे भोसले, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. जयंत आसगावकर, आ.पी एन पाटील, आ. दीपक चव्हाण, आ.सुरेश खाडे, आ.प्रकाश आबिटकर, आ. मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, आ. राजू आवळे, आ. महेश शिंदे, आ.विक्रमसिंह सावंत, आ. ऋतुराज पाटील, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे उपस्थिती राहणार आहेत.


252 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यू 244 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 252 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 10 (9934), कराड 28  (38712), खंडाळा 4 (14027), खटाव 45 (25286), कोरेगांव 11 (21658), माण 20 (17547), महाबळेश्वर 0 (4642), पाटण 1 (10066), फलटण 65 (36547), सातारा 58 (50811), वाई 7 (15621) व इतर 3 (2068) असे  आज अखेर एकूण 246919 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच खटाव तालुक्यातील एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 244 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 2017013*
*एकूण बाधित – 246919*
*घरी सोडण्यात आलेले – 237248*
*मृत्यू –6061 *
*उपचारार्थ रुग्ण– 6629*
                                                                 0000

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता...हवामान खात्याचा अंदाज

वेध माझा ऑनलाइन
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसाची संततधार कायम राहणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज आणि उद्या सुद्धा पाऊस होईल. 24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, हवामान विभागानं आज रायगड, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला असून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पालघरमध्ये संततधार

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार कायम असून पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणक्षेत्रात पाणी साठ्यात वाढ झाली आहे. पालघर ,  मनोर , बोईसर ,  डहाणू , तलासरी भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने सुर्या नदीवरील धामणी धरण 100 टक्के भरले असून धरणाचे 5 वक्रीदरवाजे 60 सेमी ने उघडण्यात आले आहे.तर धरणाखालोखाल असलेला कवडास उन्नती बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. यामुळे सुर्या नदीत 12 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून सुर्या नदीला पूर आला आहे. पावसाची संततधार कायम असून पावसामुळे भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हाती आलेले भात पिकांना मुसळधार पावसाने पाण्यात खराब होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

वसई विरारमध्ये रिमझिम पाऊस

वसई विरार नालासोपारा मध्ये रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. परिसरामध्ये पूर्णपणे काळेकुट्ट आभाळ झाले असून वातावरण ढगाळ झाले आहे. आज दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील सखल भागात कुठेही पाणी साचलेले नाही.


.

ओबीसी आरक्षणावरुन गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल...

वेध माझा ऑनलाइन
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षणावरुन पडळकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे .

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?...

या प्रस्थापितांच्या सरकारला मुळात ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही. हे राज्यापालांना पाठवलेल्या प्रस्तावरून सिद्ध होते. कारण की माझ्या माहितीप्रमाणे शासनाच्या मूळ प्रस्तावात विधी आणि न्याय विभागाने स्पष्ट नमूद केले आहे की अध्यादेश काढण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.

मला सगळ्या खात्याचे प्रमुख म्हणून मुखमंत्र्यांना हे विचारायचे आहे की त्यांना त्यांच्या शासनात काय घडते याचा खरोखर सुगावा नसतो का? की त्यांना संबंधित विभागप्रमुखांशी संवाद साधायला वेळ नसतो? , असे प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांना अटक केली जाते हेही त्यांना माहित नसते आणि समस्त ओबीसींच्या राजकीय आस्तित्वाठी आवश्यक असलेला राजयकीय आरक्षणाच्या अध्यादेशाच्या प्रस्तावात त्रुटी आहेत हेही त्यांना माहित नसते का ? असाही प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी विचारला.

यांच्याच विभागाने यात नकारात्मक भूमिका घेतली असताना, यावर कुठलाही उपाय न शोधता या अध्यादेशाचा प्रस्ताव राज्यपालांकडे कोणत्या हेतूने पाठवला जातो? मुख्यमंत्री हतबल आहेत की त्यांनी प्रस्थापितांच्या पुढे नांगी टाकली आहे? हे बहुजन जनतेला त्यांनी स्वत: सांगावे, ही मी त्यांना विनंती करतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

ठाकरे सरकारचा अध्यादेश..

राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय पाच जिल्हा परिषदेतील निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या असतानाच राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यादेश काढल्यानंतर ओबीसींना काही ठिकाणी 27 टक्के, काही ठिकाणी 20 टक्के आणि काही ठिकाणी 4 टक्के आरक्षण मिळेल, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं.

अध्यादेश राज्यपालांनी रोखला...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार आणखी एका मुद्यावरुन आमने सामने येण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारनं ओबीसी आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाला राज्यपालांनी रेड सिग्नल दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानपरिषदेच्या 12 जागांवरील नियुक्तीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्यापही मंजुरी दिलेला नाही.ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला राज्यपालांनी ब्रेक लावत ठाकरे सरकारला काही प्रश्न देखील विचारले आहेत. आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना अध्यादेश कसा? असा प्रश्न भगतसिंह कोश्यारींनी ठाकरे सरकारला विचारला असल्याची सूत्रांची माहिती आहे

Tuesday, September 21, 2021

264 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 445 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 264 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 2 (9924), कराड 24 (38684), खंडाळा 3 (14023), खटाव 43 (25241), कोरेगांव 17 (21647), माण 24 (17527), महाबळेश्वर 2 (4642), पाटण 4 (10065), फलटण 78 (36482), सातारा 52 (50753), वाई 7 (15614) व इतर 8 (2068) असे  आज अखेर एकूण 246670 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6049 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 445 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 2007883*
*एकूण बाधित – 246670*
*घरी सोडण्यात आलेले – 237004*
*मृत्यू –6049*
*उपचारार्थ रुग्ण– 6621*
                                                                 0000

Monday, September 20, 2021

169 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 465 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 169 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 1(9934), कराड 12(38614), खंडाळा 7(14023), खटाव 20(25194), कोरेगांव 5(21628), माण 15 (17481), महाबळेश्वर 0(4646), पाटण 2 (10147), फलटण 42 (36391), सातारा 51 (50699), वाई 7 (15639) व इतर 7 (2037) असे  आज अखेर एकूण 246433 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6043 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 465 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 1998311*
*एकूण बाधित – 247936*
*घरी सोडण्यात आलेले – 236559*
*मृत्यू –6043*
*उपचारार्थ रुग्ण– 6802 *
 
                                                                0000

राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक 14 मध्ये जीवनावश्यक वस्तुंचे वाटप ...

वेध माझा ऑनलाइन
कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव  यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 14 मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले 
त्याप्रसंगी विजयसिंह यादव (भाऊ) माजी नगराध्यक्ष सौ संगीता देसाई मॅडम, नगरसेविका सौ स्मिता हुलवान मॅडम युवा नेते श्री राहुल खराडे,* तुषार खराडे, नईम पठान, अमोल बनसोडे, राहुल काळे, सागर गवळी, विशाल भाऊ बनसोडे,परेश माने, गणेश आवळे, रामभाऊ काळे, प्रशांत कर्वे, आकाश कदम, गणेश खराडे, निखील जगताप, सुभाष शिंदे, दत्ता शिंदे, प्रकाश आडवी, आकाश घेवारी, अजित धुमाळ, अजित पटन, अमोल चौगुले, सचिन कदम, सचिन आवळे, आकाश घोडके,संतोष भिसे, अनिकेत दुपटे, विजय खडतरे, विठ्ठल भिसे मिस्त्री, विशाल वायदंडे, माणिक खराडे, शुभम कदम,शाहरुख मुजावर, शुभम माने, बाळू गवळी, कुंडलिक धुमाळ, वकील श्री दिग्विजय जाधव, विनोद शिंदे व विजयसिंह यादव मित्रपरिवार उपस्थित होता विठ्ठल नगर,डवरी वस्त कार्वे नाका व झोपडपट्टी याठिकाणी या जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले सदरच्या मदतीबद्दल नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त ओंकार मुळे मित्रपरिवराचे धान्य वाटप...

वेध माझा ऑनलाइन
कराड
गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय ओंकार मुळे मित्र परिवाराच्या वतीने जिजाऊ वस्तीग्रह कोळेवाडी या संस्थेस धान्य वाटप विजयसिंह यादव यांच्या हस्ते करण्यात आले 
याप्रसंगी नगरसेविका स्मिता हुलवान माजी नगराध्यक्षा संगीता देसाई ओमकार मुळे संदीप मुंढेंकर शहानवाज मोमिन कौस्तुभ कोरडे, विनोद पवार ढेब श्रीकांत मुळे फिरोज कागदी सागर कांबळे संजय मगरे सागर यादव दिग्विजय डांगे सागर भोकरे हाजी कच्ची अडव्होकेट दिग्विजय जाधव आदी उपस्थित होते

 राजेंद्रसिंह यादव गटनेते कराड नगर परिषद कराड यांच्या वाढदिवसानिमित्त वीर महाराणा प्रताप गणेश नवरात्र उत्सव मंडळ बुधवार पेठ यांच्यातर्फे जिलेबी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला 
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल साळुंखे मा.अमोल भोसले(आप्पा ) आबा गावडे शुभम साळुंखे विनायक चव्हाण विजय चव्हाण  कुणाल चव्हाण सचिन साळुंखे मान्यवर उपस्थित होते

राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण कॉलनी येथे रक्तदान शिबीर...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 राजेंद्रसिंह यादव गटनेते कराड नगरपरिषद कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मा ऋषीकेश कुंभार   मित्र परिवार व शिवाजी गणेश मंडळ पाटण कॉलनी याच्या मार्फत भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबीर कराड नगरपरिषद शाळा क्र 3 येते मोठया उत्सहात करण्यात आला या हे उदघाटन मा.विजयसिह यादव (भाऊ) याच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक विजय वाटेगावकर , हणमंतराव पवार, स्मिता हुलवान , गजेंद्र कांबळे  किरण पाटील प्रीतम यादव, राहुल खराडे, निशांत ढेकळे,हा.मझहर कागदी.बापु  देसाई ,सर अर्जुन कोळी सर . रत्नाकर शानबाग .जावेद नायकवडी,अप्पा गायकवाड . गिरीश शहा. चंद्रकांत कुंभार ,मुकुंद माने  सचिन पाटील सर ,जयंत गुजर,संजय भोसले,  मा राजेंद्रसिह यादव मित्र परिवार व मा विजयसिह यादव मित्र परिवार यदी मान्यवर उपस्थित होते.आरोग्य शिबिरासाठी शारदा क्लिनिक, एरम हॉस्पिटल, यांनी मदत केली

राजेंद्रसिंह यादव गटनेते कराड नगरपरिषद यांच्या वाढदिवसानिमित्त सयाजी यादव संचालक यांनी येरवळे  येथे धान्य वाटप केले त्यावेळी सयाजी यादव सागर यादव युवराज यादव सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

Sunday, September 19, 2021

किरीट सोमय्यांवरील कराडमधील कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

वेध माझा ऑनलाइन
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील  पोलिसांनी कराडमध्ये केलेल्या कारवाई नंतर त्यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आणि अनेक गंभीर आरोप केले. किरीट सोमय्यांच्या या आरोपांना आणि टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे..
 केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

मुश्रीफ यांचा 100 कोटीचा घोटाळा ; सोमय्या यांचा कराडात पत्रकार परिषदेत आरोप...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगीतले . यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या यावेळी म्हणाले

दरम्यान भाजप माजी खासदार किरीट सोमय्या  त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर देखील निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांच्या इशारा वर माझ्यावर कारवाई झाली असून शरद पवारांचा सहभाग त्यासाठी महत्वाचा आहे असेही ते म्हणाले ठाकरे सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने मला संरक्षण दिलं. राष्ट्रवादीच्या भाई लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे असंही सोमय्या यांनी म्हंटल आहे