Tuesday, December 14, 2021

पुण्यात 16 तारखेपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार...

वेध माझा ऑनलाइन
कराड
मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरातील शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत उद्यापासून महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुणे महापालिका क्षेत्रातील परवापासून म्हणजे 16 तारखेपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. तिकडे औरंगाबादेत पुढील आठवड्यात म्हणजे 20 डिसेंबर पासून  महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू होणार आहेत

पुणे महापालिका हद्दतील शाळा येत्या गुरुवारपासून सुरु होणार आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतलाय. कोरोना नियमांचं पालन करत शाळा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment