कराड
लहान मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तीन वर्षांवरील सर्व मुलांसाठी कोरोनाची कोवाव्हॅक्स ही लस येणार आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया पुढील सहा महिन्यांत मुलांसाठी लस कोवाव्हॅक्स लाँच करेल, अशी माहिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे.
अदर पुनावाला मंगळवारी सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्या तीन आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी ची चाचणी सुरू आहे. ही यूएस-आधारित नोव्हावॅक्सच्या कोविड लसीचे व्हर्जन आहे. अशी माहितीही पुनावाला यांनी दिली.
“सध्या कोवाव्हॅक्सीनची चाचणी सुरू असून कोवाव्हॅक्स मुलांचे कोरोना विषाणूपासून पूर्णपणे संरक्षण करेल. ओमाक्रॉनचा मुलांवर कसा परिणाम होईल हे अद्याप माहित नाही. परंतु, कोरोनापासून मुलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे,” असे पूनावाला यावेळी म्हणाले.
पूनावाला पुढे म्हणाले की, "आजपर्यंत लहान मुलांमध्ये कोरोनाचे फारसे गंभीर रुग्ण आढळून आलेले नाहीत. शिवाय मुलांमध्ये कोरोनाची कोणतीही भीती निर्माण झालेली नाही ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आता आम्ही लवकरच मुलांसाठी कोविड-19 लस लाँच करणार आहोत. "
देशातील सर्वात मोठी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट, पुणे यांनी कोवाव्हॅक्सच्या पहिल्या बॅचचे उत्पादन आधीच सुरू केले आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ट्विट करून ही माहिती दिली होती आणि एक नवीन यश प्राप्त केल्याचे सांगितले होते. आम्ही नोव्हावॅक्सने तयार केलेल्या कोविड-19 लसीची पहिली खेप तयार करण्यास सुरुवात केली आहे, ज्याला कोवाव्हॅक्स नाव देण्यात आले आहे. अशी माहिती इन्स्टिट्यूटने दिली आहे. ही लस सुरुवातीच्या टप्प्यात फक्त वयस्करांना देण्याची शक्यता आहे. 'जाइकोव्ह-डी' लशीचे एक कोटी डोस दरमहा उपलब्ध होतील अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरकारला दिली.
No comments:
Post a Comment