Sunday, September 4, 2022

आता लवकरच होणार वीज दरवाढ...!

वेध माझा ऑनलाइन - विकासाचा आनाभाका घेऊन सत्तेत आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकार पुन्हा एकदा सर्वसामान्य ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देणार आहे. वीजेच्या इंधन समायोजन शुल्काच्या दरात पुन्हा एकदा 60 ते 70 पैशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला पुन्हा कात्री लागणार आहे.

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकार पुन्हा एकदा झटका देणार आहे. राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. सध्या हे शुल्क १.३० रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे
महानिर्मितीकडून वीज खरेदी दरात वाढ झाल्यामुळे इंधन समायोजन शुल्कावर त्याचे परिणाम झाले आहे, मात्र तूर्तास अशी ही दरवाढ होणार नाही, सध्याचे इंधन समायोजन शुल्क नोव्हेंबरपर्यंत लागू होणार आहे, अशी माहिती महावितरणचे वाणिज्य संचालक डॉ. मुरहरी केळे यांनी काही माध्यमांशी बोलताना दिली.
याआधी महाराष्ट्र वीज नियंत्रण मंडळाने 1 जून 2022 पासून वीज कंपन्यांना फ्यूल एडजस्टमेंट चार्ज (एफएसी) लावण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाच्या काळात मागील दोन वर्षांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. तसंच कोणतीही दर आकारण्यात आले नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील बेस्ट वीजच्या 10.5 लाख, 7 लाख टाटा पॉवर, 29 लाख अदानी इलेक्ट्रिसिटी आणि एमएसईडीसीएलच्या 2.8 कोटी ग्राहकांना फटका बसला आहे.

No comments:

Post a Comment