Tuesday, September 13, 2022

राज्यात कोरोनामुक्ती अधिक ; 5513 सक्रिय रुग्ण ; 1075 रुग्ण कोरोनामुक्त ; संपूर्ण देशातील कोरोना स्थिती पहा...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्क्यांवर आले आहे.. तर राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज  730 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर  1075 रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहेत. 

राज्यात  1075 रुग्ण कोरोनामुक्त 
राज्यात गुरूवारी 730 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1075 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

राज्यात एकूण 5513 सक्रिय रुग्ण  
राज्यात एकूण 7082 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 1574 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1072  सक्रिय रुग्ण आहेत.

 देशात 5 हजारांहून कमी रुग्णांची नोंद 
गेल्या 24 तासांत 4 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 45 लाख 4 हजार 949 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं  जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 46 हजार 347 वर पोहोचली आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 3 लाख 50 हजार 468 चाचण्या झाल्या आहेत. जर आपण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण आकडेवारी पाहिली तर ही संख्या 5 लाख 28 हजार 185 वर पोहोचली आहे. तसेच, देशात नोंदवलेल्या एकूण आकडेवारीपैकी 4 कोटी 39 लाख 30 हजार 417 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

No comments:

Post a Comment