Monday, September 12, 2022

शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी निवडली दुसरी जागा? ती जागा कोणती?

वेध माझा ऑनलाईन - शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा घेण्यावरूनही शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गट शिवतीर्थावर तयारीत आहे, जर तिथे जागा मिळाली नाहीतर बीकेसी मैदानावर करू, अशी माहिती शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. तर शिंदे गटाने सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मात्र दसरा मेळाव्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
'दसरा मेळावा संदर्भात आम्ही तयारीला लागलो आहे. शिवाजी पार्क किंवा बिकेसी मैदानावर करू, या संदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. यामध्ये ठरेल. पण प्रथम प्राधान्य शिवाजी पार्कमध्ये असणार आहे, असं गोगावले यांनी सांगितलं.
'आम्हाला जिथे जागा मिळेल तिथे आम्ही मेळावा करू, बाळासाहेब यांचे विचार दाखवून देऊ, कोणाला बोलवायचं हे उद्याच्या बैठकीत ठरेल, असंही गोगावले यांनी स्पष्ट केलं.


No comments:

Post a Comment