वेध माझा ऑनलाइन - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबादमधील सभेसाठी अंगणवाडी सेविकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “गर्दी जमवण्यासाठी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे,” असं म्हणत अजित पवारांनी हल्लाबोल केला. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) विधानभवनातील वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “८ सप्टेंबर २०२२ ला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या औरंगाबादमधील अधिकाऱ्यांनी खुशाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १२ सप्टेंबरच्या पैठण मतदारसंघातील सभेला प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका, ४२ गावांमधील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अशी पद्धत कधीच नव्हती.”
“राजकीय सभेला सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्याचं काहीच कारण नाही”
“ही एकनाथ शिंदेंची राजकीय सभा असेल तर अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडत आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस सभेला गेल्या तर तेथील मुलांनी काय करायचं, ते कुठे जाणार? त्या मुलांकडे लक्ष कोण देणार? गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
“
No comments:
Post a Comment