Tuesday, September 13, 2022

रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन...

वेध माझा ऑनलाइन -  विद्यार्थी अवस्थेतच जर मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे मिळाले तर भविष्यात त्यांना त्याचा भरपूर उपयोग होईल. काळाची हीच गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ कराडने विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाची चळवळ सुरु करण्याचे ठरविले आहे. याचेच पहिले पाऊल म्हणून रोटरी क्लब ऑफ कराडने न्यु इंग्लिश स्कूल, सदाशिवगड येथे विद्यार्थ्यांसाठी दर सोमवारी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे हा उपक्रम 4 महिने चालणार आहे

आज या कार्यशाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ कराड च्या माजी अध्यक्षा अनघा बर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले “स्वतःला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या वागण्या-बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा. तुमच्या बॉडिलॅंग्वेजवर भर द्या. त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता.. आत्मपरिक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्यातून तुमच्या चांगल्या वाईट बाबी समोर येत असतात. आत्मविश्वास असायलाच हवा. आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच. पण ओव्हर कॉन्फिडन्ट राहू नका.”असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ कराडचे प्रेसिडेंट प्रबोध पुरोहित, संचालक अनघा बर्डे, गजानन माने, बद्रीनाथ धस्के, न्यु इंग्लिश स्कूल, सदाशिवगड चे मुख्याध्यापक डुबल सर, तसेच शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment