Friday, November 29, 2024

मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्रीपद घेण्यास एकनाथ शिंदे यांचा नकार ; काय घडली घडामोड ;

वेध माझा ऑनलाइन।
 राज्यात सध्या महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली होती. यावेळी भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर मुख्यमंत्रीपद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे हेदेखील मुख्यमंत्रि‍पदासाठी इच्छूक होते. मात्र, भाजपन नकार दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीमधून माघार घेतली होती. यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे  मुख्यमंत्री पदानंतर खालच्या पायरीवर असणारे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. आपल्याऐवजी शिवसेनेतील अन्य एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्री पद द्यावे आणि मी सरकारमधून बाहेर राहीन, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मात्र, भाजपला एकनाथ शिंदे यांची ही भूमिका मान्य नसल्याचे समजते. यामागे अनेक राजकीय कारणं असल्याचे समजते.


सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी केल्याची माहिती आहे. मात्र, भाजप ही मागणी मान्य करेल, असे दिसत नाही. कारण श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री केल्यास ते थेट अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या पंक्तीला येऊन बसतील. श्रीकांत शिंदे यांचा राजकीय अनुभव हा अजित पवारांपेक्षा बराच कमी आहे. याशिवाय, श्रीकांत शिंदे हे आक्रमक आहेत. उपमुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या व्यक्तीने सरकारमध्ये कोणतेही निर्णय घेताना आक्रमक भूमिका घेतल्यास समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून श्रीकांत शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बसवल्यास घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात भाजपकडे गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्त्वाची खाती मागितली आहेत. त्यांच्या या मागण्या मान्य होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

जितेंद्र आव्हाड अचानक एकनाथ शिंदेंच्या भेटीला ;

वेध माझा ऑनलाइन।
 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पण या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात महायुती सरकार पुन्हा आले. त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची बदली मात्र झालं असून ते भाजपच्या वाट्याला जाणार हे नक्की झालं आहे. त्यामुळे राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्ममंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत. आता त्यांच्या भेटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनियुक्त आमदार जितेंद्र आव्हाड पोहोचले आहेत.त्यांच्यात चर्चा काय झाली हे अद्याप समजले नाही

एकनाथ शिंदेंनी अमित शाह याना काय केली मागणी ; अजितदादा आणि फडणवीसांसमोर शिंदेंनी केली मागणी;

वेध माझा ऑनलाइन ।राज्याच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली.  अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रि‍पदाबाबत देखील चर्चा झाली. मात्र या अमित शाह यांच्यासोबतच्या झालेल्या कालच्या दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर गुगली टाकत अमित शाह यांच्याकडे केली एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली आहे. त्यामुळे गृह खातं भाजप एकनाथ शिंदेंना देणार का?, हे आगामी दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

बैठकीत ठरलं!! मुख्यमंत्री होणार फडणवीसच ; फडणविस आणि अजितदादांनी बैठकीचे फोटो केले शेअर, एकनाथ शिंदे यांनी मात्र फोटो शेअर केले नाहीत ;

वेध माझा ऑनलाइन।
महायुती सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री साडेदहा ते 12 वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस अजित पवार, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, प्रुफल पटेल आणि जे.पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये राज्याचा पुढील मुख्यमंत्री  आणि खातेवाटपाच्यादृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे नेहमीपेक्षा वेगळ्या पेहरावात आले होते. राज्याचा नवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. काल दिल्लीतील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि हास्य बरेच काही सांगून जाणारे होते. यावेळी अजित पवार यांचा चेहराही उत्साहाने ओसंडून वाहत होता. याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेची काजळी दाटल्याचे दिसून आले. या गोष्टीची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरु आहे. 
या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या हताश बॉडी लँग्वेजसोबत आणखी एक गोष्ट अनेकांच्या नजरेत भरणारी ठरली. ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला तत्परतेने अमित शाह यांच्याकडून पुष्पगुच्छ घेतानाचा फोटो शेअर केला. पण एकनाथ शिंदे यांनी अद्याप अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचा एकही फोटो सोशल मीडियावर टाकलेला नाही. एरवी एकनाथ शिंदे त्यांचा कार्यक्रम, सभा आणि गाठीभेटींचे फोटो तत्परतेने सोशल मीडियावर टाकतात. मात्र, संपूर्ण रात्र उलटून गेल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील बैठकीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. या गोष्टीचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Thursday, November 28, 2024

मंत्रिमंडळात 4 महिला आमदार मंत्री होणार !

वेध माझा ऑनलाइन
राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठं यश मिळवलं. मोठ्या प्रमाणावर जागा जिंकून पुन्हा एकदा ते राज्यात सत्ता स्थापन करणार आहे. त्यासाठीच्या हालचाली देखील सुरू आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीपदे यांच्याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी देणार महायुती सरकार आता महिलांना सत्तेत वाटा देणार आहे. नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणारअसल्याची माहिती आहे. महायुती सरकारमध्ये मंत्री मंडळात लाडक्या आमदार बहिणींची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून यंदा विधान सभेवर 14 महिला आमदार निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या 4 तर शिवसेनाकडून 2 आमदार विधानसभेवर निवडून आल्या आहेत. दरम्यान भाजपचा गड राखून ठेवलेल्या महिला आमदारांची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. मंत्री पदे देण्याच्या अनुषंगाने महिला आमदारांचे प्रोफाइल दिल्लीत मागविले असल्याची माहिती आहे. यामध्ये अदिती तटकरे यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. याआधी देखील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महिला व बालविकास खात राहिलं आहे, तर दुसरीकडे देवयानी फरांदे भाजपच्या आमदार आहेत, त्यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर श्वेता महाले या देखील भाजपाच्या आमदार आहेत. त्यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखी एका महिला आमदाराचं नाव चर्चेत आहे. तर शिवसेनेकडून एक महिला आमदार नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.

Wednesday, November 27, 2024

मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचा कोणताही उमेदवार असेल, त्याला आपला पाठिंबा असेल ; एकनाथ शिंदे ;

वेध माझा ऑनलाइन
मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलं. त्यांनी गेल्या अडिच वर्षा केलेल्या कामामुळं लोकांची सेवा करता आली हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, असं सांगितलं. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मोदी साहेबांनी दिली, त्यांचे आभार  शिंदे यांनी मानले. यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचा कोणताही उमेदवार असेल, त्याला आपला पाठिंबा असेल असं सांगून एकनाथ शिंदे हे बॅक फुटावर आल्याचे दिसले तसंच उद्या दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर बैठक होईल, त्यावेळी निर्णय होईल असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं जो निर्णय घेईल त्याला पूर्णपणे शिवसेनेचं पूर्णपणे समर्थन असेल असेही ते  म्हणाले

एकनाथ शिंदे नाराज ; गाठीभेटी टाळल्या;

वेध माझा ऑनलाइन ।
विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, त्या यशानंतर आता मुख्यमंत्री पदाचा आणि नाराजीनाट्याचा सुर राज्यभरात दिसून येत आहे. अशातच महायुतीच्या यशानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, अशातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात असतानाच एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

यादरम्यान त्यांनी बोलणं आणि भेटणं देखील टाळलं आहे. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या आमदार, खासदार यांच्या भेटी देखील त्यांनी टाळल्या आहेत, त्यांनी भेटी का टाळल्या त्याचबरोबर त्यांनी मौन का बाळगलं आहे, याचं नेमके कारण समजू शकलं नसलं तरीदेखील एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.

महाआघाडीत बिघाडी ; उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील लोकसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, या यशामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचा आत्मविश्वास बळावला. त्यातच, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीही आणि मजबूत महाविकास आघाडी बनल्याचे चित्रही दिसून आले. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावेळी काही मतभेद काँग्रेस आणि शिवसेना पक्षात पाहायला मिळाले. मात्र, निवडणूक निकालानंतर अनेकांच्या भुवया उंचावतील असेच चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत तब्बल 30 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतील विधानसभेला 288 पैकी केवळ 49 जागांवरच विजय मिळाला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी पुढील निवडणुकांना कसे सामोरे जाते हे पाहावे लागेल. त्यातच, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या उमेदवारांच्या बैठकीत अनेकांनी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत शिवसेना युबीटी नेते आणि माजी  विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनीही माहिती दिली.

एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद, मात्र मोदींकडून फडणवीस मुख्यमंत्री म्हणून फायनल!

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन चौथा दिवस उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत नाही. त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असा सवाल मविआच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि स्वत: एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्रीपदासाठी  आग्रही आहेत. मात्र, महायुतीमध्ये भाजपला मिळालेलं 132 जागांचं संख्याबळ पाहता मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, हे दिसून येते. त्यातच, भाजप आमदारांकडूनही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी दबावगट तयार केला जात आहे. राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असतानाच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती आहे.  

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुका लढवल्या असून मोठ्या संख्येने बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपने 132 जागांवर यश मिळवल्याने भाजप समर्थकांचा उत्साह वाढला आहे. तर, महायुतीला तब्बल 237 जागांवर जय मिळालं असून भाजप 132, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला 41 जागा जिंकता आल्या आहेत. त्यातच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती देत मुख्यमंत्रीपदासाठी आपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदेंची नाराजी जास्त काळ राहिल असं दिसत नाही. कारण, अजित पवार व भाजप यांची एकूण जुळवाजुळव केल्यास बहुमताचा आकडा सहजच पार होत आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन काय भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.दरम्यान एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन याबाबत काय भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्लीत जाऊन सुनील तटकरे मोदी,अमित शाह आणि फडणवीसांना भेटले;

वेध माझा ऑनलाइन।
सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली. अमित शाह यांच्या भेटीबाबत सुनील तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. या बातमीमुळे पुन्हा राजकारणात खळबळ उडाली आहे

दिल्ली येथे महायुतीचे शिल्पकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी प्रफुल पटेलही सोबत उपस्थित होते, अस सुनील तटकरे म्हणाले. विशेष म्हणजे अमित शाह यांच्याभेटीआधी सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भेटीगाठी सुरु केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

आता राज ठाकरें ईव्हीएमच्या विरोधात ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं. महाविकास आघाडीसह इतर पक्षांना विधानसभेला मोठा फटका बसला. तर राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेण्यात आले आहेत, त्याबाबत अनेक उमेदवारांनी तक्रारी निवडणूक आयोगाकडे दिल्या आहेत, तर मोठ्या जोमाने निवडणुकीला सामोरं गेलेल्या मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. मनसेने देखील आता ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव  यांनी मागच्या काही दिवसापासून जे व्हिडिओ समोर येत आहेत, ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

Tuesday, November 26, 2024

निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय ; पुन्हा होणार मतमोजणी ; कोणत्या मतदारसंघात? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी मागणी केली होती. ती मागणी मान्य झाली आहे. 

सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी  केली होती. बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे.

एकनाथ शिंदे भाजप ला बाहेरून पाठिंबा देणार : सध्याची जोरदार चर्चा: मात्र या चर्चेत किती तथ्य? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन ।
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेंच सुरु आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रि‍पदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 

एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही. मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार आहे, असा निरोप एकनाथ शिंदेंनी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहचवला असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या दाव्यात किती तथ्य आहे, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव भाजपला मान्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावे अशी भाजपची इच्छा आहे. याबाबत एकनाथ शिंदे आणि भाजप हायकमांडची चर्चा देखील सुरु असल्याचं बोललं जात आहे.

फडणविसच मुख्यमंत्री! शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री :

वेध माझा ऑनलाइन।
निकाल लागल्यापासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून भाजपचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर नाराज एकनाथ शिंदेंची समजूतही काढण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. 


ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह ; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला झापलं

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापलं असून महायुतीकडून जल्लोष व आनंद व्यक्त केला जात असताना महाविकास आघाडीचे नेते पराभवाचं चिंतन करत आहेत. त्यातच, विजयी आमदारांची व पराभूत आमदारांची बैठक घेऊनही सूचना केल्या जात आहेत. पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमच्या घोळावर संशय व्यक्त होत असून आता शरद पवारांनीही ईव्हीएम संदर्भातील घोळावर कायदेशीर लढाई लढण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यानुसार, यंदाच्या निवडणूक निकालानंतर संशयास्पद वाटणारे सर्वते पुरावे गोळा करण्याचे आवाहनही उमेदवारांना केले आहे. दरम्यान, राज्यातील निकालानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित झाल्याने, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात  करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच, याचिकाकर्त्यांना खडे बोलही सुनावले आहेत. 

विधानसभा निवडणुकानंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. तसेच, जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात आणि निवडणूक हरलं की तुम्हाला ईव्हीएममध्ये छेडछाड दिसते, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना झापलं आहे.  

डॉ. के.ए. पॉल यांनी ही याचिका केल होती. मात्र, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे, ईव्हीएमच्या घोळावरुन संशय व्यक्त केला जात असल्याच्या आरोपांना आता काहीही अर्थ उरला नाही.

राज्यात थंडी वाढणार? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रात हळूहळू गारठा जाणवू लागला आहे. कारण आता उत्तर महाराष्ट्रात चांगलीच हुडहुडी जाणवत आहे. अशातच गेल्या आठ दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील गारठा वाढू लागला आहे.

राज्यात थंडी वाढणार? 
मात्र आता भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान देखील 10 अंशांखाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात यावर्षी कडाक्याची थंडी राहणार असून नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तापमान देखील कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळे आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागातील किमान तापमान 10 अंशांखाली जाण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

भाजप, शिंदे गट व अजितदादा पवार गटातील संभाव्य मंत्रीपदाच्या दावेदार आमदारांची नावे... साताऱ्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले होणार?

वेध माझा ऑनलाइन।
मंत्रीपदासाठी भाजपकडून तसेच शिंदे व अजित पवार गटाकडून कोणकोणती नावे चर्चेत आहेत
याचीही वेगळी चर्चा सध्या महाराष्ट्रात होताना दिसते आहे...तसेच साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साताऱ्याचे पालकमंत्री पदी वर्णी लागेल अशीही वरिष्ठ पातळीवर चर्चा असल्याचे समजते पाहूया कोण कोण आहेत ते चर्चेतील मंत्री...

भाजप कडून चर्चेतील नावे... 
राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड अशा 11 जणांची नावं सध्या समोर आली आहेत.

शिंदे गटाकडून कुणाची चर्चा?
शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे या 11 जणांच्या नावाची चर्चा आहे.

अजित पवार गटाकडून कोण चर्चेत?
राष्ट्रवादीकडून अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे या 13 जणांची चर्चा आहे. 

एकनाथ शिंदे झाले नाराज ! काय आहे बातमी ...?

वेध माझा ऑनलाइन। विधानसभेच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आजच (26 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. यानंतर सर्वांचं लक्ष हे शपथविधीच्या कार्यक्रमाकडे लागलं आहे. महायुतीमध्ये अद्यापही मुख्यमंत्री पदाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे आघाडीवर आहेत. अशातच फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर थेट दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय.

यासंदर्भातील निरोप हा एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे नाराज असल्याचंही बोललं जातंय. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांनाच संधी मिळावी म्हणून आग्रही मागणी केली जात आहे. तर, दिल्लीत फडणविसांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार?
देवेंद्र फडणवीस हे काल, सोमवारीच दिल्लीला रवाना झाले होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कुटुंबातील विवाहाच्या समारंभासाठी ते दिल्लीला गेल्याचे समजते. मात्र, याच दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेबाबत त्यांची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स;

वेध माझा ऑनलाईन।
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कारण मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय दुधाणे यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याचप्रकरणी पुणे कोर्टाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स पाठवले आहेत. 


खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे  हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉपी राईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे.  चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई आणि ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून  अ‍ॅड. रविंद्र शिंदे व अ‍ॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत जातीने हजर रहाण्याचे समन्स न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ज्योती देशपांडे यांना पाठवले आहेत.
नागराज मंजुळे यांनी वर्षभरापूर्वी पोस्ट शेअर करत 'खाशाबा' सिनेमाची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी सिनेमाचं पोस्टर देखील शेअर केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
फँड्री,सैराट नंतर 'खाशाबा' हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय

एकनाथ शिंदे यांनी दिला राजीनामा ; वाचा बातमी

विष माझा ऑनलाइन।
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा सुपूर्द केला. तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. 

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो.

Monday, November 25, 2024

मनसेची मान्यता रद्द होणार ?

वेध माझा ऑनलाइन।
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आलं. मनसेची निवडणुकीत अतिशय सुमार कामगिरी पाहायला मिळाली. पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. शिवाय पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणारी पक्षाची मतांची टक्केवारी देखील मिळवता आली नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते. याबाबतची माहिती विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दिली आहे. 

एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल तर एकूण आठ टक्के मतदान पाहिजे किंवा एक जागा निवडून यायला पाहिजे. दोन जागा आणि सहा टक्के मतदान किंवा तीन जागा  मिळायला हवं, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे, असं अनंत कळसे म्हणाले. महाराष्ट्र विधासभा निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मागील विधानसभेचं चित्र पाहिलं तर त्यांचा एक आमदार निवडून आला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


अजितदादा रोहित पवारांना म्हणाले: थोडक्यात वाचलास

वेध माझा ऑनलाइन।
यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त कराडमधील प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार रोहित पवार श्रीनिवास पाटील अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाले होते. यावेळी अजित पवार तेथे पोहचले होते. यादरम्यान अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला.

अजितदादा म्हणाले: थोडक्यात वाचलास 
अजित पवार आणि रोहित समोर येताच दोघांची भेट झाली. यावेळी ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असा अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्कील टोला लगावला. यावर सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता, अशी कबुली रोहित पवारांनी दिली. अजित पवार माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे, असंही रोहित पवारांनी सांगितले

रोहित पवारांना वाकून नमस्कार करायला लावला ; काय म्हणाले अजितदादा ?

वेध माझा ऑनलाइन
राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यंदा जनतेनं सत्तेच्या चाव्या महायुतीकडे एकहाती  सोपवल्या आहेत. अशातच लोकसभेत पराभवाची चव चाखलेल्या दादांनी विधानसभेत मात्र, काकांना पछाडलं. दादांच्या राष्ट्रवादीनं यंदाच्या निवडणुकीत 41 आमदार निवडून आणले. अशातच घवघवीत यशानंतर आज  यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यावेळी अजितदादा आणि रोहित पवारांची भेट झाली. दोघांमधील संवादही चर्चेचा विषय ठरला. एवढंच काय, रोहित पवारांना दादांनी आग्रह करत खाली वाकून नमस्कार करायला लावला. त्यानंतर अजितदादांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी रोहित पवारांसोबतच्या भेटीबाबत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. 

यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार उपस्थित होते. त्यावेळी दोघेही आमने-सामने आले. दोघांमध्ये मिश्किल सवांद झाला. अजित पवारांनी अगदी काका या नात्यानं हक्कानं रोहित पवारांना खाली वाकून नमस्कार करायला लावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, "मराठी संस्कृती आहे... आम्ही लवकर आलो असतो तर, साहेबांची भेट झाली असती... आम्ही दर्शन घेतलं असतं... टायमिंग जुळलं नाही... मी डिपार्मेंटवरही चिडलो... रोहितला मी शुभेच्छा दिल्यात..."


फडणवीस होणार मुख्यमंत्री !

वेध माझा ऑनलाइन।
राज्याच्या विधानसभा निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या बाजून कौल दिला. मतदार राजानं अगदी भरभरून मतांचं दान महायुतीच्या पदरात टाकलं. अशातच आता तिढा आहे तो म्हणजे, मुख्यमंत्रीपदाचा. राज्याच्या सत्तेची चावी तर महायुतीला मिळाली, पण मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सध्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचाच असणार, अशी माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. अशातच महायुतीतला तिसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तसा ठरावही राष्ट्रवादीचे सर्व मंत्री करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे आरएसएसनंही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळत आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजप हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या पाठिंब्यासोबतच फडणवीस यांच्या नावाला महायुतीतूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आक्षेप नसल्याचं जाहीर करुन टाकलं आहे.

Sunday, November 24, 2024

शरद पवार म्हणाले...योगी आदित्यनाथांच्या 'बटेंगे तो कटेंगे', या घोषणेमुळं मतांचं ध्रुवीकरण झालं; आमचा पराभव झाला असला तरी लोकांमध्ये जाऊन पुन्हा नव्यानं उभं राहू,"

वेध माझा ऑनलाइन।
 "योगी आदित्यनाथांच्या 'बटेंगे तो कटेंगे', या घोषणेमुळं मतांचं ध्रुवीकरण झालं. आमचा पराभव झाला असला तरी लोकांमध्ये जाऊन पुन्हा नव्यानं उभं राहू," असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला दरम्यान, हा लोकांनी दिलेला निर्णय असून आम्हाला तो मान्य आहे असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार यांना जास्त जागा आल्या हे मान्य करणं गैर नाही. मी बारामतीत उमेदवार दिला नसता तर वेगळा मेसेज बाहेर गेला असता. तसंच नवखा उमेदवार आणि अनुभवी उमेदवार लढत याबाबत आम्हाला कल्पना होती. त्यामुळं अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होवू शकत नाही," असं म्हणत शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांचा झालेला पराभव मान्य केला. दरम्यान "विरोधी पक्षनेता असणं कधीही योग्य आहे. ती फिगर आमच्याकडे नाही. त्यामुळं विरोधी पक्षनेता द्यायचा की नाही हा सरकारचा निर्णय आहे," असं शरद पवार म्हणाले.

 'लाडकी बहीण योजने'बाबत शरद पवार म्हणाले की, "महायुतीनं 'लाडकी बहीण योजने'बाबतचा खोटा प्रचार केला. हे सरकार गेलं तर महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना बंद करेल, असा खोटा प्रचार महायुतीनं केला. त्यामुळं महिलांनी आमच्याविरोधात मतदान केलं असल्याचं काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं. त्यामुळं याचा फटका आम्हाला बसला असावा."
निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 'ईव्हीएम'वर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर शरद पवार म्हणाले की, "याबाबत अधिकृत माहिती नसल्यामुळं मी 'ईव्हीएम' मशीनवर भाष्य करणार नाही. अधिकृत माहिती घेवून मी याबाबत अधिक बोलेन...
"

Saturday, November 23, 2024

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...; अतुलबाबानी मतदारांच्या अपेक्षा आणि दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, माझ्या त्यांना शुभेच्छा;


वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, मतदारांनी आपला कौल दिला आहे. कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय शिरोधार्थ आहे. माझ्या सहकार्यांनी सर्व शक्तीनुसार निवडणुकीत काम केले. त्या सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद. मी कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार आहे. 
या निवडणुकीत श्री. अतुल भोसले विजयी झालेत त्यांचे अभिनंदन, ते कराडच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील व कराडच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करतील त्या कामी त्यांना माझे सहकार्य असेल. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

ते म्हणाले राज्यात श्री. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे, त्यांचे व  त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. ते राज्याच्या विकासाकरिता सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील हि अपेक्षा. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा 
ज्या प्रमाणे २०१९ मध्ये भाजपा नेतृत्वाने श्री. उद्धव ठाकरे यांना वागणूक दिली त्या प्रकारचा व्यवहार श्री. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होणार नाही अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

निवडणुकीतील विजयानंतरही अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाण यांना टोला ; काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाईन।
पृथ्वीराज चव्हाण यांनी झालेल्या निवडणूकीत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले त्यांच्या स्टेजवरून माझ्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली गेली महिलांबाबत अपशब्द वापरले गेले एवढ्या मोठ्या नेत्याच्या स्टेजवरून असे होणे हे त्या नेत्याला न शोभणारे आहे असे अतुल भोसले म्हणाले

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे त्यानंतर पत्रकारांना संबोधित करताना ते बोलत होते

ते म्हणाले कराडकर जनतेने एवढा मोठा विजय देत माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे ती मी व्यवस्थित पार पडणार आहे भागाचा विकास करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ठ असेल माझ्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येकाचा हा विजय आहे तसेच कराड दक्षिण च्या जनतेचा हा विजय असल्याचे मी मानतो असेही ते यावेळी म्हणाले

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव ; डॉ अतुल भोसले यांचा ऐतिहासिक विजय ;

वेध माझा ऑनलाईन। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला. याठिकाणी भाजपचे डॉ. अतुलबाबा भोसले यांना 1 लाख 39 हजार 505 मते मिळाली. तर विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मते मिळाली. यामध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांचा 39 हजार 355 मतांनी विजयी झाला. कराड दक्षिण हा काँग्रेसचा असलेला पारंपरिक गड नेस्तनाबूत करत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने हा निकाल राज्याच्या राजकारणात अधोरेखित झाला आहे. 

प्रारंभी, सकाळी आठ वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या फेरीत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 1590 मतांचे लीड घेतले. त्यानंतर सहाव्या आणि दहाव्या फेरीत पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर घेतलेल्या अल्प मतांचे लीड मोडीत काढत शेवटपर्यंत निर्णायक आघाडी घेतली. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असलेल्या माजी मंत्री स्व. विलासकाका पाटील - उंडाळकर यांचे पुत्र, रयत संघटनेचे नेते अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांच्या बालेकिल्ला असलेल्या उंडाळे भागात डॉ. अतुलबाबा भोसले यांना अनपेक्षित लीड मिळाले. त्यामुळे या ठिकाणाहून पृथ्वीराज चव्हाण यांना मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर कराड शहरासह मलकापूर आणि सैदापूरमधील सुज्ञ मतदार पृथ्वीराज चव्हाण यांची पाठराखण करतील, ही अपेक्षाही धुळीस मिळाली. या ठिकाणी डॉ अतुल भोसले यांनी आघाडी घेतली. त्यानंतर डॉ. अतुल भोसले यांचा बालेकिल्ला असलेल्या रेठरे बुद्रुकसह  कृष्णाकाठच्या गावांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना तब्बल 10 हजार मतांची लीड दिले. येथेच डॉ. अतुल भोसले यांचा विजय निश्चित झाला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजीस सुरुवात केली. त्यानंतर निकालाचे औपचारिकता बाकी राहिल्याने सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी काढता पाय घेतला. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना विजयी उमेदवार घोषित केले. त्यांना 1 लाख 39 हजार 505 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मते मिळाली. यामध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांचा 39 हजार 355 मतांनी विजयी झाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाचे उजळणी करत जोरदार घोषणाबाजी केली. 


यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन 

विजयी उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह विजय रॅली काढली. कार्यकर्त्यांनी गुलालाची उजळण करत फटाक्यांची आत शिवाजी करत मोठा जल्लोष केला. त्यानंतर ही रॅली कराड शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात आल्यानंतर याठिकाणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 15 हजार मतांचे निर्णय लीड घेतल्यानंतर कृष्णा हॉस्पिटल येथे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत डॉ. अतुलबाबांच्या विजयार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विजयी रॅली काढण्यात आली. यामध्ये डॉल्बी व डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. ही रॅली महामार्गावरून कराड शहरात येताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Friday, November 22, 2024

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील मतदानाच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. रम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात अतिटतीची निवणूक होत असून या ठिकाणी सकाळी निवडणूक विभाग प्रशासनाकडून उशिरा मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, वार्तांकन करण्यासाठी आलेल्या कराडातील माध्यम प्रतिनिधींना सकाळी निवडणूक प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. निवडणूक विभागाकडून प्रतिनिधींना देण्यात आलेल्या ओळपत्र असून देखील त्यांना मतमोजनीची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने माध्यम प्रतिनिधींकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदान संघाच्या मतदानाची मोजणी हि कराड येथील शासकीय धान्य गोदाममधील स्ट्रॉंगरूममधून केली जात आहे. दरम्यान, सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार होती. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे मतमोजणीस सुरुवातीला विलंब झाला. या ठिकाणी कराडातील विविध दैनिक, चॅनेलमधील पत्रकार, माध्यम प्रतिनिधी वार्तांकन करण्यासाठी आले. दरम्यान, मतमोजणीच्या अगोदर संबंधाची माध्यम प्रतिनिधींना निवडणूक प्रशासनाकडून ओळख पत्रे देखील देण्यात आली आहेत. ओळखपत्रांच्या साहाय्याने त्यांना मतमोजणीच्या केंद्रात वार्तांकन करण्यासाठी प्रवेश दिला जाईल असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सुरुवातीला सांगण्यात आले होते.
दरम्यान, प्रत्यक्ष वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनीधी, पत्रकार बांधवांना प्रशासनाकडून मतमोजणीसाठी प्रवेश नाकारण्यात आला. 

तसेच पत्रकारांना बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आली नव्हती तसेच येथील एक महिला अधिकारी पत्रकारांशी उद्दामपणे बोलल्याने निवडणूक आयोग विभागाकडून देण्यात आलेल्या या अपमानास्पद वागणुकीचा तसेच कराड दक्षिण मतदान केंद्रावर प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या भोंगळ कारभाराचा पत्रकार, माध्यम प्रतिनिधींकडून निषेध करण्यात आला आहे.

Saturday, November 16, 2024

शिवराज मोरे म्हणाले...कराड नगरपालिकेत पाच वर्षे सत्ता हातात असताना भाजपने कोणत्तीही विकासकामे केली नाहीत ; याविरोधात विधानसभा झाली की आक्रमक पवित्र घेणार :

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपालिकेत पाच वर्षे सत्ता हातात असताना भाजपने कोणतेही विकास काम केले नाही भाजपने नगरपालिका निवडणुकीत शब्द नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यामधील एकही विकासकाम केले नसल्याने त्यांच्याच आवाहन नुसार भाजप उमेदवाराला मते मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजपने पाच वर्ष सत्ता भोगली मात्र विकास कामे काहीच केलेली नाहीत. हे कशाच्या आधारे सांगत आहोत तर कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजप कडून  जो 'शब्द' नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला होता. त्याची कोणतीही अंमलबजावणी केली नाही. पाच वर्षे भाजपची सत्ता असून सुद्धा कोणतीही विकासकामे कराड शहरात केली गेली नाहीत. त्यामुळे त्यांनीच निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द नामाप्रमाणे विकास तू केला नाही शब्दही पाळला नाही, त्याच शब्दनाम्यात विकास केला नाही तर मत मागायला येणार नाही असे आश्वासन दिले होते भाजप सध्या मात्र लोकांपुढे मत मागण्यासाठी जात आहे, कराडकरांना दिलेला शब्द च ज्यांनी पाळला नाही त्यांना कोणताही कराडकरांकडे मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. असा घणाघाती आरोप प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी करत भाजपच्या पालिकेमधील पाच वर्षाचा कारभार संशयास्पद असल्यामुळे त्याचेही चौकशीचा इशारा देत त्या विरोधात विधानसभेनंतर आक्रमक पवित्र घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

श्री मोरे म्हणाले कराड नगरपालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने आम्ही शब्द देतो म्हणून लोकांना कराडच्या विकासाचे आश्वासन दिले होते मात्र त्या पाच वर्षांमध्ये त्या शब्दनाम्यामधला एकही शब्द भाजपच्या नेत्यांना पूर्ण करता आलेला नाही. २०१६ मध्ये कराडकरांनी विश्वासाने भाजपला सत्ता मिळवून दिली होती परंतु कराडकरांचा त्यांनी भ्रमनिरास केला. यामुळेच कराडकर जनता यावेळी अशा आश्वासनांची कोणतीही पूर्तता न केलेल्याना यावेळी कदापि साथ देणार नाही. 
भाजपने कृष्णामाई घाटाची सुशोभीकरणाचा शब्द दिला होता तो कृष्णा घाट अद्यापही सुशोभीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. शहरामध्ये नवीन बाग बगीचे करण्याचा शब्द दिला होता मात्र एकही बाग विकसित केली गेली नाही. पाच वर्षात झाला नाही कराडची नगरपालिका स्मार्ट होणार असे जाहीर केले होते मात्र ती नगरपालिका ही अद्यापही जुन्याच रेकॉर्डवर चालते कराड शहरातील स्वामींची बाग विकसित करणार म्हणून आश्वासन दिले होते परंतु तीही दुर्लक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभा करणार होता परंतु त्यामध्ये सुद्धा काहीच केले गेले नाही. ऐतिहासिक मनोरे दुर्लक्षित राहिले आहे
श्री मोरे म्हणले, शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचा भाजपने शब्द दिला होता मात्र एकही तसे अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारले गेले नाही याउलट उभारली गेलेली स्वच्छतागृह यांनी पाडली 
नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार होते तेही काम झाले नाही चोवीस बाय सात ही पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत
याउलट ही योजनाच आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे त्यामुळे शुद्ध पाणी देण्यात पाच वर्षात नगरपालिकेला पर्यायने भाजपला अपयश आले आहे शहराला स्ट्रीट लाईट देणे त्याचे सुशोभीकरण करणे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे या गोष्टीही भाजपला पूर्ण करता आले नाहीत
श्री मोरे म्हणाले कराड नगरपालिकेवर भाजपची सत्ता असतानाही पाच वर्षात त्यांना काही काम करता आले नाही आणि आता तेच भाजप व त्यांचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहे. शहराच्या हद्द वाढीसाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन टप्प्यांमध्ये सोळा कोटींचा निधी दिला मात्र याच भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी तो निधी परस्पर दुसऱ्या कामाकडे वळवला कराडचा जुना कोयना पूल पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्षम केला त्यामुळे महामार्गाचे काम सुरू असताना कराड करांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका झाली. 

कराड उत्तरच्या विराट सभेत आ बाळासाहेब पाटील कडाडले ; म्हणाले... संघर्ष करायची वेळ आल्यास आम्ही संघर्षाला घाबरत नाही ; शेवटपर्यंत शरद पवारांची साथ देणार ; आणखी काय म्हणाले?


वेध माझा ऑनलाइन ।
महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर माझ्यावर सहकार मंत्री पदाची जबाबदारी पवारांनी सोपवली. मात्र अडीच वर्षांत सत्तांतर झाले. राष्ट्रवादीचे सहकारी पवार साहेबांना सोडून गेले. त्या काळातही पवार साहेब स्थितप्रज्ञ राहिले. दुसऱ्या दिवशी कराडला आले. त्यावेळी त्यांचे जनतेने विशेषत: जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी मलाही फोन येत होते. परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना स्वर्गीय पी. डी पाटील यांनी साथ केली. त्याप्रमाणे मी ही शरद पवार यांना शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थित्यंतरात उत्तरचा एकही माणूस आम्हाला , पक्षाला सोडून गेला नाही. मंत्री पद असतानाही उत्तरसह जिल्ह्याचे व राज्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे असे आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले याचवेळी आम्ही शांततामय सहजीवनासाठी आग्रही आहोत मात्र संघर्ष करायची वेळ आल्यास संघर्षाला आम्ही घाबरत नसल्याचे त्यांनी विरोधकांना सुचवले 

कराड उत्तरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ  रहिमतपूर येथे शुक्रवारी विराट सभा झाली. यावेळी खासदार शरद पवार यांनी मोबाईल वरून मतदारांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, काँग्रेसचे अजितराव पाटील चिखलीकर, तालुकाध्यक्ष निवास थोरात, जितेंद्र पवार, देवराज पाटील , चंद्रकांत जाधव, संगीता साळुंखे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

यावेळी शरद पवार ऑनस्क्रीन भाषणात
 म्हणाले की, गत विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. कोवडीच्या काळामध्ये या सरकारने प्रभावी कामगिरी केली होती मात्र कोविड महामारी आटोक्यात आणण्यासाठी प्राधान्य दिल्याने विकास कामावर काही प्रमाणात मर्यादा आल्या होत्या मात्र नंतरच्या काळात मात्र मोदी शहांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आले. महायुती सत्तेवर आली मात्र राज्यातील जनतेने भाजप महायुतीच्या उमेदवारांचा पराभव केला. लोकसभेतील दारुण पराभवानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मात्र महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही महिलांना प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये देणार असून एसटी प्रवास महिलांना मोफत करणार आहोत. यावेळची निवडणूक राज्यात कोणत्या विचाराचे सरकार येणार, हे निश्चित करणारी आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करावे.

पवार सभेस्थळी पोचलेच नाहीत...
रहिमतपूरमध्ये शरद पवार यांची सातारा जिल्ह्यातील पहिली सभा होणार असल्याने कराड उत्तरच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या सभेपूर्वी पवारांच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा होत्या. पाऊस पडल्याने शरद पवारांच्या हेलिकॉप्टर प्रवासावर मर्यादा आल्या. चंदगडची सभा संपवून पवार यांनी कारने कराडच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र ते रात्री दहापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे पवार यांनी फोनवरून कार्यकर्त्यांना संबोधित केले.


Friday, November 15, 2024

हवा का रुख बदल चुका है । कराड दक्षिण मध्ये अतुलबाबांचा विजय निश्चित ; 60 वर्षात जिल्ह्यात त्यांनी कसलाच विकास केला नाही, आता या वयात त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन।
तरुण, उमदा जनतेत राहणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध असणारा असा आमदार कराड दक्षिणेला हवा आहे कोणत्याही पदावर नसताना अतुल भोसलेंनी विकासकामे मंजूर करून आणली. मात्र पृथ्वीराजबाबांनी मुख्यमंत्री असताना एक फुटकी कवडी नाही दिली, अशी टीका देवेंद्र फड णवीस यांनी 
केली.दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना थेट इशाराच दिला. कराड दक्षिणचा फैसला झालाय. कराड दक्षिणमध्ये ‘हवाओंका रूख बदल चुका है’, असं सांगत अतुलबाबाच निश्चित विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान साठ वर्षे घरात सत्ता असूनही त्यांना जिल्ह्याचा काहीच विकास करता आला नाही असा आरोप उदयनराजे भोसले यांनी यावेळी केला तरुण वयात पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी विकासात्मक काहीच केलं नाही मग या वयात त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची असेही ते यावेळी म्हणाले

महायुतीचे कराड दक्षिणमधील अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांच्या प्रचारार्थ आज कराड येथील मलकापूरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी फडणवीस यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड दक्षिणमधील अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले, डॉ. सुरेश भोसले, भारत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले कोणत्याही पदावर नाहीत. तरी देखील रस्त्यांसाठी ४७३ कोटी, ७७ कोटींच्या पाण्याच्या योजना, छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी ९६ कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं. आमच्या पेनाला कधी लकवा मारत नाही. अतुलबाबांसाठी आमचा पेन नॉनस्टॉप आहे. परंतु, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी फुटकी कवडी देखील दिली नसल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला.
काहीही झालं तरी माझ्यामुळेच झाल्याचं सांगत श्रेय घेण्याची पृथ्वीराज बाबांची प्रवृत्ती
पुणे-कोल्हापूर महामार्गाच्या विस्तारीकरण आणि हायवेवरील पुलांसाठी केंद्र सरकारने एकत्रित निधी दिलाय. परंतु, हायवेरचा चार पदरी पूल आम्ही मंजूर केल्याचे पृथ्वीराज चव्हाण सांगतात. काहीही झालं तरी माझ्यामुळेच झाल्याचं सांगून श्रेय घेण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. जो काम करतो, त्याला जनता श्रेय देत असते. मागायची गरज नसते, असंही फडणवीस म्हणाले.

साठ वर्षे घरात सत्ता असूनही त्यांना विकास करता आला नाही : उदयनराजे
लोकसभा निवडणुकीवेळीच अतुल बाबांचा निकाल लागलाय. समोर कोण आहे यापेक्षा त्याच्या माध्यमातून लोकहिताची किती कामे झाली हे पाहणे गरजेचे आहे. साठ वर्षे झाली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरात सत्ता होती. एवढी वर्षे सत्ता केंद्रे असताना देखील कराड व संपूर्ण सातारा जिल्हा त्याच्याकडून दुर्लक्षित राहिला. एन तारुण्याच्या काळात पृथ्वीराज बाबांना जे जमलं नाही ते आज त्यांच्याकडून अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. गेलेली वेळ आणि समुद्राच्या लाटा माग कोणीही असुदे कोणासाठी थांबत नसतात असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले.



उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या बॅगेची कराड विमानतळावर तपासणी ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा, साहित्याची शुक्रवारी कराड विमानतळावर तपासणी करण्यात आली.

विमानात असलेल्या पिशवीतील डबाही उघडून पाहण्यात आला. त्या डब्यात चकल्या होत्या. दरम्यान, कालच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साहित्याची तसंच त्यांच्यासाठी आलेल्या मोकळ्या विमानांची तपासणी करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कराड दौरा नियोजित होता. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचं पथक विमानतळावर तळ ठोकून होत. दुपारी विमानाने फडणवीसांचं आगमन झालं. त्यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या. तसेच विमानात जाऊन साहित्याची तपासणी केली. त्यात एका पिशवीत गाठ मारलेली प्लॅस्टिकची पिशवी होती. त्या पिशवीत डबा होता. तो डबा देखील उघडून पाहिला.

Thursday, November 14, 2024

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले ; पृथ्वीराज चव्हाण यांनी आता राजकारणातून रिटायर्ड व्हावे ; एवढ्या वर्षाच्या राजकारणात त्यांनी कराडातील युवकांसाठी कोणते उद्योग आणले नाहीत , ते काही कामाचे नाहीत; कराडकरांनो पृथ्वीराजबाबाना आता रिटायर्ड करा :

वेध माझा ऑनलाइन।
कराड दक्षिण मध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एक तरी मोठा प्रकल्प आणला का ? ते लोकांची फसवणूक करून केवळ स्वतःसाठी राजकारण करत आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांनी आता राजकारणातून रिटायर होणे गरजेचे आहे अन्यथा कराड दक्षिण च्या जनतेने त्यांना रिटायर्ड करावे. असे आवाहन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. 

कराड येथील हॉटेल फर्न येथे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित डॉक्टरांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश बाबा भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ अनघा राजगुरू, सारिका गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की भोसले कुटुंबीयांनी आतापर्यंत विविध संस्थांच्या माध्यमातून दहा हजार लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. पृथ्वीराज बाबांनी किती लोकांना नोकऱ्या दिल्या ते पण त्यांनी जाहीर करावे. कोणता मोठा प्रकल्प या भागामध्ये आणला? असा सवाल करत अतुल बाबांना आमदार करण्याचा यही समय है... असा नारा त्यांनी यावेळी दिला. 

देशामध्ये गेल्या साठ वर्षांमध्ये जो विकास झाला नाही तो विकास 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यामध्ये मेडिकल कॉलेज गेल्या साठ वर्षांमध्ये 387 होती ते मोदीजींनी 750 कॉलेज सुरू केली आहेत. 2014 पूर्वी मेट्रो फक्त तीन शहरांमध्ये धावत होत्या आज वीस पेक्षा जास्त शहरांमध्ये धावत आहेत. 2014 मध्ये मोदी सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालय सुरू केले. यामुळे 180 देशांमध्ये ही चिकित्सा पद्धती राबवली जात आहे. यामुळे आपल्या देशातील डॉक्टर इतर देशांमध्ये जाऊन प्रॅक्टिस करत आहेत. ही आपल्या देशाच्या दृष्टीने फार मोठी बाब आहे. याचबरोबर स्वच्छ भारत अभियान राबवत महात्मा गांधी यांचे नंतर हातात झाडू घेऊन देशाला संदेश देणारा पंतप्रधान कोण असेल तर ते आहेत नरेंद्र मोदी. काँग्रेसने आतापर्यंत गरिबी हटाव हा फक्त नारा दिला असून 2014 पर्यंत देशांमधील गरीबी जैसे थे.. अशीच होती. परंतु मोदी सरकारने युवाशक्ती, नारीशक्ती, किसानशक्ती व गरीब कल्याण या चार पिलर वर देशातील प्रत्येक घटकांना मदत करण्याचे काम चालू आहे.
2014 ते 2019 या काळात महायुतीने राज्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात विकास केला त्यामुळेच 2019 च्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला. परंतु शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुत्रप्रेम आडवे आले व विकासाला और काटे आणण्याचे काम त्यांनी केले. परंतु पुन्हा एकनाथ शिंदे यांनी युतीला साथ दिली त्यामुळे राज्यातील विकास चालू आहे.
डॉक्टरांचे प्रश्न डॉक्टरांनाच कळणार तसेच युवकांचे प्रश्न युवकांनाच कळणार... यासाठी आपण कराड दक्षिण मधून तरुण आमदार म्हणून डॉक्टर अतुल भोसले यांना निवडून द्यावे असे आवाहन ही सावंत यांनी यावेळी केले. 
यावेळी सुरेश बाबा भोसले यांनीही कराड दक्षिण मधून डॉ. अतुल बाबा भोसले यांना निवडून द्यावे असे आवाहन या संवाद मेळाव्यात केले.
या मेळाव्यास कराड दक्षिण मधील मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपस्थित होते.

Sunday, November 10, 2024

पृथ्वीराज चव्हाण यांना साथ द्या ; शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे कराडकरांना आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन।
कमळ हे दलदलीत उगवते. कराडचा भाग सखल असल्याने इथे कमळ कधीच उगवलेले नाही. आपल्या हितासाठी आपल्याला कराडची संस्कृती हलवू द्यायची नाही. हाताला साथ देवून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा. त्याना निवडून द्या असे शिवसेना नेेेत्या सुुुशमा अंधारे म्हणाल्या

कराड तालुका महाविकास आघाडीच्या भव्य महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. आ. पृथ्वीराज चव्हाण, सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, अर्चना पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, तालुकाध्यक्षा विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, रेठरे बुद्रुकच्या अर्चना अविनाश मोहिते यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

त्या म्हणाल्या, एकीकडे महाविकास आघाडी तुमच्या - आमच्या विकासाचे बोलत आहे. आणि दुसरीकडे महायुतीचे नेते मतदारांना धमकावत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांना धमकी दिली. याचा नीट विचार करा. महाडिक किंवा भाजपच्या नेत्यांनी बापजाद्यांची जमीन विकून महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले आहेत की, त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तापोळ्याची जमीन विकली. सरकारी योजनेवर हे कशासाठी मिरासदारी करत आहेत. महायुती महिलांना मतांचे आमिष दाखवण्यासाठी योजना राबवत आहेत का? असेच वाटत आहे.

त्या म्हणाल्या, प्रत्येक महिलेच्या लग्नाच्या मंडपात व स्वागत कमानीवर तिच्या घरच्यांनी कधी पोस्टर लावले का, आपल्या भावांनी ते केले नाही. भावाने बहिणीला दहा, पाच हजार दिले म्हणून पोस्टर लावला का, कारण तेथे त्यांना बहिणीच्या नात्याची मर्यादा कळली होती. बहिणीच्या गरीबीची टिंगल त्यांनी केली नाही. आमचा भाऊ पोस्टर लावत नाही. पण महायुती सरकारने लाडक्या बहिणीच्या १५०० रुपयांसाठी २० लाख रुपयांचे पोस्टर लावले. 

त्या म्हणाल्या, जाहिरात वाईट गोष्टींची असते. वाईट विचारांच्या लोकांना वारंवार जाहिरात करावी लागते. ओरिजनल असतात त्यांना काही बोलायची गरज लागत नाही. 

त्या म्हणाल्या, महिलांचा अपमान करण्याची परंपरा फडणवीस यांनी घालून दिली. फडणवीस यांची नजर कराडवर पडली आहे. कराडला गिळण्यासाठी त्यांनी एक कळसूत्री बाहुली उभी केली आहे. कराडला त्यांना नासवायचे. ते धार्मिक दंगली व जातीभेद करतील, हेही ओळखा.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी लाडकी बहिण योजनेचे विधानसभेतील भाषणात स्वागतचा केले होते. पण त्यामध्ये महत्वाचे बदल सुचवणे आवश्यक होते ते सुचविले आणि त्यानुसार सरकारने बदल केले त्याचा राज्यातील जनतेला फायदा झालाच. कर्नाटकातील आमच्या काँग्रेसच्या सरकारने ही योजना आधीच सुरू केली आहे. राज्यातील महायुती सरकारला लोकसभेतील पराभवानंतर लाडकी बहिण योजना आठवली. 

विनयकुमार सोरके, शारदा जाधव, अर्चना मोहिते, वैशाली जाधव यांची भाषणे झाली. विद्याताई थोरवडे यांनी प्रास्ताविक केले. गीतांजली थोरात यांनी आभार मानले.

काँग्रेस महाआघाडीचे नेते लाडकी बहीण योजना बंद पाडावी म्हणून कोर्टात गेले ; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा घणाघात ;

वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडीचे नेते खोटे पण रेटून बोलणारे चोर आणि लुटेरे आहेत. त्यांनी संविधान हटवण्यात येणार असल्याची आवई उठवली. तसेच गोरगरीब, आदिवासींचे आरक्षण काढून घेण्यात येणार असल्याची भीती घातली. मात्र, मातृशक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केलेल्या बाबासाहेबांचे संविधान सूर्य – चंद्र असेपर्यंत कोणीही हटवू शकणार नाही, असे मत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी व्यक्त केले.राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या भावांनी ‘लाडकी बहीण’सारखी कल्याणकारी योजना राबवली. परंतु, ही योजना बंद पाडण्यासाठी त्याच बहिणींचे काँग्रेस व त्यांच्या आघाडीचे सावत्र भाऊ कोर्टात गेले. तसेच महिलांना पैशांची लाच देऊ नका, अशी भाषा वापरली. आया – बहिणींचा आधार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा सावत्र भाऊ आणि बहिणींना या निवडणुकीत जागा दाखवा, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तसेच सुप्रियाताई सुळे आणि प्रणितीताई शिंदे यांच्यावर केली.

ओंड (ता. कराड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. विचारमंचावर उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तराताई भोसले (आईसाहेब), भाजप सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुरभीताई भोसले, गौरवीताई भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कविता कचरे, सारिका गावडे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

चित्रा वाघ म्हणाल्या, देशात 70 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने महिलांसाठी काय केले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच मोदींनी सार्वजनिक शौचालय, उज्वला योजना, जनधन योजना, मोफत धान्य, महिलांना 50 टक्के सवलतीत एसटी प्रवास, लखपती दीदी योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असल्याचे सांगितले.

त्या म्हणाल्या, राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या भावांनी ‘लाडकी बहीण’सारखी कल्याणकारी योजना राबवली. परंतु, ही योजना बंद पाडण्यासाठी त्याच बहिणींचे सावत्र भाऊ कोर्टात गेले. तसेच सावत्र बहिणींनीही या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे धादांत खोटे सांगत महिलांना पैशांची लाच देऊ नका, अशी भाषा वापरली. आया – बहिणींचा आधार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा सावत्र भाऊ आणि बहिणींना या निवडणुकीत जागा दाखवा, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तसेच सुप्रियाताई सुळे आणि प्रणितीताई शिंदे यांच्यावर केली.

त्या पुढे म्हणाल्या, करोना कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत जनतेला केवळ सल्ले देण्याचे काम केले. तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही याहून काही वेगळी परिस्थिती नव्हती. येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जनतेसाठी काय केले, हे पहा. याउलट डॉ. अतुलबाबा भोसले हे करोना कालावधीत लाडक्या बहिणींच्या पाठीशी भावासारखे उभे राहिले. त्यांना आधार दिला, जनतेची सेवा केली. या मतदारसंघातील दीड लाख बहिणी जर अतुलबाबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या; तर त्यांना कोणीही हरवू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या. मात्र, अडीच वर्षांत महाविकास आघाडीने महिलांसाठी एकही चांगली योजना आणली नाही. याउलट महायुतीने महिलांना सन्मान देण्याचे काम केले. लाडकी बहीण योजनेला येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीचा जुमला असल्याचे म्हटले. तसेच या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे अधिवेशनात सांगत दुसरीकडे ही योजना आमची असल्याचाही दावाही त्यांनी केला. मग ते मुख्यमंत्री असताना पावणेचार वर्षांत महिलांच्या खात्यावर एकही पैसा आला का? अशा योजनांबाबत कधी ब्र शब्दही काढला का? असा सवाल उपस्थित करत भाषणबाजी करणाऱ्यांनी महिलांसाठी काय केले, अशी टीकाही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.

रोहिणी शिंदे म्हणाल्या, डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लाडक्या बहिणींना, तसेच बांधकाम कामगारांना मोठा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे अतुलबाबांना आपण भाऊबीजेची भेट म्हणून विधानसभेत पाठवूया, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.

सुरभीताई भोसले म्हणाल्या, करोना कालावधीत कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माता – भगिनी, तसेच गोरगरीब जनतेची सेवा केली आहे, त्यांना मोलाची मदत केली. कराडला पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर, तसेच पाण्याची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्यावर डॉ. अतुलबाबा भोसले जनतेसाठी धावून आले. बांधकाम कामगार आणि लाडक्या बहिणींना मोठा लाभ मिळवून दिला. आता आपण त्यांना साथ देण्याची वेळ आली आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस, येणाऱ्या 5 वर्षांत काय करणार?

वेध माझा ऑनलाइन।
भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा सादर केला आहे. या जाहीरमान्यात भाजपाने मतदारांना मोठी आश्वासनं दिली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र'  असे दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल. 
 शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. १२,००० वरून रु. १५,०००, तसेच एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल. 

प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.

वृद्ध पेंशन धारकांना महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल.
 महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार-चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील.
 येणाऱ्या काळात २५ लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु. १०,००० विद्यावेतन देण्यात येईल.
 राज्यातील ग्रामीण भागात ४५,००० गावांत पांधण रस्ते बांधण्यात येतील.
 अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु१५,००० वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल.
 वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल.
 सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत' व्हिजन महाराष्ट्र @ २०२९० सादर करण्यात येईल.
 सन २०२८ पर्यंत महाराष्ट्राला $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविण्याचं लक्ष्य ठेवले आहे.
 महाराष्ट्राला तंत्रज्ञान, उत्पादन आणि नावीन्यपूर्ण  संकल्पना क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्यासाठी खालील पावलं उचलण्यात येतील
 'मेक इन महाराष्ट्र' धोरण राबवून, महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करण्यात येईल.  महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता राजधानी बनविण्यात येईल. त्यासाठी जागतिक फिनटेक कंपन्यांना आकर्षित करणारं वातावरण निर्माण करण्यात येईल आणि आर्थिक तंत्रज्ञानातील नवीन संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येईल. सोबतच AI संशोधन, नवकल्पना आणि विकासाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल.
 नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादन हब म्हणून विकसित करण्यात येईल.

 शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांगीण उपक्रमांद्वारे प्रयत्न करण्यात येतील

आणखी बरेच काही...

महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध ; महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार ; जाहीरनाम्यात मोठी घोषणा ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मविआच्या या जाहीरनाम्याला 'महाराष्ट्रनामा' असे नाव देण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार अशी घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने आणि देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी हा महाराष्ट्रनामा आहे. पाच गॅरंटी आधी जाहीर केलेल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वातआधी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. आताच्या सरकारला सत्तेतून हटवलं तर आम्हाला चांगलं सरकार देता येईल, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

विकास कामांना स्थगिती देऊन सरकारने राजकारण केले.- आमदार बाळासाहेब पाटील

वेध माझा ऑनलाइन।
लोकांच्या विकास कामांच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बजेटच्या माध्यमातून अनेक विकास कामांना निधी मंजूर झाला, परंतु भाजपने शिवसेना पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केले व बजेटमध्ये मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देऊन सरकारने राजकारण केले असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

 कोपर्डे(काशिळ) ता.सातारा येथील कोपरा बैठकीप्रसंगी आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते. या कार्यक्रमास भरत देशमुख, शहाजी निकम, रामचंद्र निकम, कृष्ण धोंडी कदम, हणमंत कदम, काकासो निकम, वसंत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.  

आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माझ्यावर सहकार व पणन तसेच आपल्या सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली होती, त्यामाध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली, बजेट मधून मंजूर झालेल्या 89 कोटी रुपयांच्या कामाला स्थिगिती दिली होती, त्या विरोधात मी हाय कोर्टामध्ये केस दाखल केली, त्या माध्यमातून ही स्थगिती उठली व कामे आता सुरू आहेत. आपण मला दिलेल्या संधीमुळे मी अनेक प्रकारचे विकास कामे या मतदारसंघात करू शकलो. यापुढेही अशाच आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली.

यावेळी भरत देशमुख, वसंत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विकास कदम, अरुण निकम, कृष्णत कदम, फारुक शेख, दीपक निकम, नंदकुमार कांबळे, अशोक निकम, संदीप कदम, कृष्णत निकम, सुरेश कदम, राजवर्धन निकम, महेंद्र कदम, युवराज कदम, शिवाजी मोहिते, संभाजी संकपाळ, नाथाजी निकम, संपतराव निकम व ग्रामस्थ उपस्थित होते.

Friday, November 8, 2024

उमेदवारासाठी कुटुंबीय उतरले प्रचारात; कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत रंगत वाढली;

वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात अटीतटीची लढत पहायला मिळणार आहे. कराड दक्षिण च्या आखाड्यात डॉ अतुल भोसले व आ पृथ्वीराज चव्हाण यांची  उमेदवारी असल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून प्रचारात हजेरी लावत मतदार बांधवांना मतदार करण्याचे आवाहन केले जात आहे. 

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजप महायुतीकडून डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटले आहेत. तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण आहेत. यावेळेस दोघांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार आहे. डॉ. अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील. साखर कारखाने, हॉस्पिटल, बँका, शाळा- कॉलेजेस या माध्यमातून भोसले कुटुंब थेट जनतेशी कनेक्टेड आहे. त्यामुळे यंदाही कराड दक्षिणेत काटे कि टक्कर होणार हे नक्की. डॉ. अतुल भोसलेंच्या प्रचारासाठी त्यांचे वडील डॉ. सुरेश भोसले, पत्नी गौरवी अतुल भोसले यांच्यासह कुटुंबीकडून प्रचार केला जात आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी पत्नी सत्वशीलादेवी पृथ्वीराज चव्हाण या महिलांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. 

राहुल गांधी खोटं बोलणारी फॅक्टरी आहे ; अमित शाह ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आज भाजपचे महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी
“कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगाणाच्या निवडणुकीत काँग्रेसने आश्वासनांचे पेटारे उघडले आणि निवडणुका जिंकल्या. परंतु, आश्वासनं पाळली नाहीत. आता सांभाळून आश्वासने द्या, असं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पार्टीचा अध्यक्ष असं म्हणत असेल तर ती पार्टी आश्वासनं पाळू शकते का? असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी ही खोटं बोलणारी फॅक्टरी आहे. तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा – महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विंग येथे आज केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, कृष्ण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, जिल्हाध्यक्ष श्री. धैर्यशील कदम, श्री. सुनील तात्या काटकर, श्री. विक्रम पावसकर, श्री. भारत पाटील, श्री. रविराज देसाई आणि महायुती व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित जनसमुदाय बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव यांचा जाहीर पाठिंबा

वेध माझा ऑनलाइन।
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व महाआघाडी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूर (ता. कराड) गावचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव व सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव व सर्व संचालकांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी ज्येष्ठ नेते धनाजीराव जाधव (आण्णा) व मानसिंगराव जाधव (नाना) यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सैदापूर येथे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करत सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला. स्वच्छ आणि निष्कलंक चेहरा म्हणून आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा देशभरात लौकिक आहे. त्यांना पूर्ण ताकदीने निवडून आणण्याचा निश्चय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने केला आहे. 

आ. चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कराड आणि परिसराचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या कृतिशील कार्यातून कराडला जोडणारे रस्ते केल्यामुळे विकासाला मोठी गती आली. रस्त्यांच्या जाळ्यामुळे परिसराचे नंदनवन झाले. कराड ते ओगलेवाडी व मसूर या दोन्ही रस्त्यांमुळे सैदापूर परिसराचा कायापालट झाला आहे. आ. चव्हाण यांचे हे कार्य विसरता येत नाही.

त्यामुळे सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव व त्यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आ. चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देण्याचे ठरवले. त्यानुसार गावातील प्रचार शुभारंभ कार्यक्रमात त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या हस्ते श्री हनुमान मंदिरात नारळ फोडण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकऱ्यांनी गावातील सर्व मंदिरे, मशीद तसेच बौद्ध विहार येथे जावून दर्शन घेवून प्रचार शुभारंभ केला. 

सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव, सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव, ज्येष्ठ नेते धनाजीराव जाधव (आण्णा) व मानसिंगराव जाधव (नाना) यांच्यासह कार्यकर्त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय पक्का झाल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून (स्व.) यशवंतराव मोहिते यांना अभिवादन

वेध माझा ऑनलाईन।
राज्याचे ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री (स्व.) यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर पुरोगामी आणि डावा विचार जपला. त्यांचे कार्य आणि विचार जोपासण्याचे काम त्यांची पुढील पिढी करत आहे. त्यांच्या पिढीचा आदर्श आजकालच्या राजकीय गोंधळातील परिस्थितीत महत्वाचा ठरतो. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

रेठरे बुद्रुक येथील ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या निवासस्थानी आ. चव्हाण यांनी (स्व.) यशवंतराव मोहिते यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. विश्र्वेंद्र मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे - पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, शिवाजीराव मोहिते, देवदास माने, अधिकराव गरुड, सुभाषराव पाटील, शिवराज मोहिते, रंगराव मोहिते, जगदीश मोहिते, लालासाहेब थोरात, बबन सुतार, सनी मोहिते, दिग्विजय पाटील, अभिजित सोमदे, विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी आ. चव्हाण यांनी (स्व.) मोहिते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी यशवंतराव मोहिते यांच्या आठवणींना उजाळा देत डॉ. इंद्रजित मोहिते व विश्वेंद्र मोहिते यांच्याशी चर्चा केली. 

पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराशेजारील झोपडपट्टीसह मलकापुर व स्टेडियमलगत च्या झोपडपट्टीचे पुनर्वसन करा ; डॉ अतुल भोसले यांची मंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी ; त्याठिकाणी एका वर्षात पक्की घरे बांधून देणार ; अमित शाह यांनी दिला शब्द ;

वेध माझा ऑनलाईन
आज विंग येथे केंद्रीय मंत्री अमित शाह यांची अतुलबाबांच्या प्रचारार्थ सभा पार पडली यावेळी डॉ अतुल भोसलेंनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याजवळ काही महत्वाच्या मागण्या केल्या त्यामध्ये ऊस शेती संबंधी अमित शाह यांनी रद्द केलेल्या एफ आर पी वरील इन्कम टॅक्स चा उल्लेख करत अतुलबाबांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच सिंचनाच्या प्रश्नावर देखील त्यांनी शाह यांचे लक्ष वेधले त्याच बरोबर कराडातील आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंगल्याला लागून असणाऱ्या पाटण कॉलनीतील झोपडपट्टीसह मलकापूर व स्टेडियम जवळ असणाऱ्या झोपडपट्टीचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी आग्रह धरला
यावेळी अमित शाह यांनी येत्या वर्षात या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पक्की घरे आपण या लोकांना उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले

दरम्यान पृथ्वीराज चव्हाण हे केंद्र सरकारने केलेला उड्डाणपूल मी केला म्हणून सांगतात... अहो केंद्रात भाजप ची सत्ता आहे...या सगळ्या गोष्टींशी तुमचा काय संबंध ? नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हे पूल होत आहेत... आणि तुम्ही पूल केला म्हणून काय सांगता...? तुम्हाला पाटण कॉलनी मधील तुमच्या घराला लागून असणाऱ्या झोपडपट्टी चे घरकुल करता आले नाही...तुम्ही मुख्यमंत्री होता...त्यापूर्वी केंद्रात होता... तुमच्या 3 पिढ्या 50 वर्षे सत्तेत होत्या...तरी तुम्हाला साधे घरकुल करता आले नाही...अनेकवर्षं ती झोपडपट्टी तशीच तिथे आहे...मात्र, तुमच्या घराच्या भिंतीला लागुन ती झोपडपट्टी आहे म्हणून तुम्ही स्वतःच्या घराची उंची वाढवून घेतलीत...आणि...उड्डाणपूल केला म्हणून सांगता...? असा घणाघात डॉ अतुल भोसले यांनी आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केला होता ... 

राज्यात सत्तेत संधी मिळाल्यास त्याठिकाणचे पुनर्वसन करून तिथे घरकुल उभे करण्याचे काम आपण करणार प्राधान्याने करणार असल्याचा शब्दही त्यांनी त्यावेळी दिला होता त्याचाच धागा पकडून आज आपल्या भाषणात अतुल भोसलेंनी हा विषय पुन्हा मंत्री अमित शाह यांच्या कानावर घालून तेथे झोपडपट्टीचे पुनर्वसन होऊन तेथील लोकांना पक्की घरे मिळतील असे मंत्री अमित शाह यांच्याकडून शब्द घेतला 
मलकापूर तसेच कराडच्या स्टेडियम च्या मागील राहणाऱ्या लोकांना देखील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत त्याठिकाणी पक्की घरे मिळणार आहेत असे आश्वासन देखील अतुल भोसले यांनी अमित शाह यांच्याकडून आज घेतले