Tuesday, March 23, 2021

स्वच्छ सर्वेक्षणाच्या कारभाराची चौकशी व्हावी ; भाजपाच्या नगरसेवकांची मागणी...

कराड
येथील पालिकेच्या बजेटमधील अगदी खालच्या पातळीचे आरोप प्रत्यारोप ताजे असतानाच आता भाजप च्या नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षणच्या कामाविषयी आपण अनभिज्ञ आहोत असे सांगत या सर्वेक्षणाची चौकशी व्हावी अशी मागणी लेखी स्वरूपात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

येथील बजेट च्या सभेमधून भाजप व जनशक्ती यांच्यामध्ये अगदी खालच्या पातळीवर टीका टिप्पणी झाली हे सगळेच अद्याप ताजे असताना आता भाजपच्या वतीने सत्तारूढ जनशक्तीवर आणखी एक तक्रार बॉम्ब टाकण्यात आला आहे पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये काय चाललंय?कुठपर्यंत काम आलं आहे ? कसे सुरू आहे ? या बाबत आपण व सत्तर टक्के नगरसेवक अनभिज्ञ आहोत असे भाजपने जिल्हाधिकारी यांचेकडे  तक्रार देत म्हटले आहे. या सर्वेक्षणाची आर्थिक व्यवहारासाहित सर्व चौकशी व्हावी अशीही मागणी भाजप ने केली आहे. ही तक्रार लेखी स्वरूपात दिली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाची चौकशी व्हावी याबाबत केलेल्या तक्रारीवर नगरसेवक विनायक पावसकर, सुहास जगताप,नगरसेविका विद्या पावसकर,अंजली कुंभार आदींच्या सह्या आहेत.

159 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 159  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील*सातारा 9, मंगळवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1,  सदरबझार 2, सैदापूर 2, रामाचा गोट 1, यादोगोपाळ पेठ 3, व्यंकटपुरा पेठ 1, गोडोली 4, कुपर कॉलनी 1, दौलतनगर 1, करंजे 2,  पिरवाडी 1, शाहुपुरी 1,  निनाम पाडळी 1, वनवासवाडी 1,  कोनेगाव 1, मल्याचीवाडी 1,  खोजेवाडी 1, तांबवे 1, यतेश्वर 1, सरजापूर 1, खोजेगाव 1,  निसरे 1. 

कराड तालुक्यातील* शनिवार पेठ 1, रविवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 1,  उंब्रज 1, ओंड 2, शेरे 1,  रेठरे खुर्द 2, वानखन रोड 1,  वाखन 1, वडगाव हवेली 1, भिकवाडी 1, मलकापूर 5, विद्यानगर 1, शामगाव 1, आगाशिवनगर 1, गोळेश्वर 1, सुपने 1.   

फलटण तालुक्यातील* पवार गल्ली 1, संजीवराजे नगर 1, लक्ष्मीनगर 1,  निंबळक 1, मलटण 3, निंभोरे 1,धुमाळवाडी 1, वडले 1, कोळकी 1,  जाधववाडी 2,  दुधेभावी 1, पाडेगाव 2.   
 
माण तालुक्यातील*विरली 2, शिंगणापूर 1, खुटबाव 2, गोसाव्याचीवाडी 1, दहिवडी 1.  
*खंडाळा तालुक्यातील*शिरवळ 3, पारगाव 1. 
 *वाई तालुक्यातील* रविवार पेठ 1, सह्याद्रीनगर 1, जांब 1, किकली 1, डारेवाडी 1, सोनगिरीवाडी 2, पांडेवाडी 1, सिद्धनाथवाडी 1, अभेपुरी 1.  
*जावली तालुक्यातील*कुडाळ 2.  
*खटाव तालुक्यातील* पुसेगाव 3, खादगुण 1.

कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2, वाठार किरोली 1, करंजखोप 1, राऊतवाडी 1, ल्हासुर्णे 1, तांदूळवाडी 1, वाठार स्टेशन 3, नांदवळ 2, पिंपोडे बु 1, सोनके 1.  
 *महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 1, डांगेघर 2, पाचगणी 2. 
*पाटण तालुक्यातील* पाटण 2, तारळे 1, निसले 1, ढेबेवाडी 1, गुढे 1, अडुळ 1, वरेकरवाडी 1.    
*इतर*6, काटवडी बु 1, आसनी 3, महाते 1, बोपर्डी 1, वाजेगाव 1, तितली 1. 

बाहेरील जिल्ह्यातील* पुणे 1, 
*एकूण नमुने -387388*
*एकूण बाधित -62585* 
 *घरी सोडण्यात आलेले -58366*  
*मृत्यू -1887* 
*उपचारार्थ रुग्ण-2332* 
0000

Monday, March 22, 2021

फडणवीसांच्या निवासस्थानासमोर मोठा पोलिस बंदोबस्त...


महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीच्या कथित टार्गेटच्या आरोपामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्थानिक निवासस्थानासमोर पोलिसांनी मोठी सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वादग्रस्त एपीआय सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये वसुलीचे महिन्याला टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आयपीएस अधिकारी परमबिर सिंग यांनी लावला. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षात यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. रविवारी राज्यभरात या संबंधाने भाजपाने नारे निदर्शनेही केली. तर नागपुरात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या बंगल्याकडे धाव घेतली होती. या वेळेपासून गृहमंत्री देशमुख यांच्या बंगल्यावरच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही नागपुरात प्रत्युत्तर देत तसेच आंदोलन केले आहे. निर्माण झालेली एकूणच राजकीय परिस्थिती लक्षात घेत पोलिसांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. त्यांच्या निवासस्थानासमोरच्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले असून सशस्त्र जवानही तैनात करण्यात आले आहेत. त्रिकोणी पार्क जवळ शीघ्र कृती दलाचे एक पथकही तैनात करण्यात आले आहे.

लेटरबॉम्ब नंतर दोन दिवसांनी गृहमंत्री घराबाहेर पडले...थेट सह्याद्री अतिथी गृहावर पोहोचले...

होमगार्ड प्रमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकल्यानंतर दोन दिवसांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज आपल्या शासकीय निवसास्थानातून बाहेर पडले. अनिल देशमुख आपल्या ज्ञानेश्वरी या शासकीय निसास्थानाहून बाहेर पडले आणि सह्याद्री अतिथीगृहावर आले. देशमुख आज रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास सह्याद्रीवर आले. जवळपास तीन तास ते सह्याद्री अतिथीगृहात होते. सह्याद्री अतिथिगृहावर देशमुख यांच्या आधी कोण गेलं याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, तिथे काहीतरी महत्त्वाची चर्चा किंवा खलबतं झाल्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान अनिल देशमुख यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तिथे देखील अनिल देशमुख त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जाऊ शकले असते. मात्र, असं नेमकं काय कारण असेल की त्यांना सह्याद्री अतिथीगृहावर येणं भाग पडलं. सह्याद्री अतिथीगृहाबाहेर त्यांची मर्सिडीज गाडी उभी होती. सह्याद्री अतिथीगृहात देशमुख यांच्यासोबत नेमकं कोण होतं, यावरुन विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत अनिल देशमुख यांची तक्रार केली. अनिल देशमुख यांनी पोलीस सहायक यांना 100 कोटी रुपये वसूल करायला सांगितले, असा आरोप त्यांनी पत्रात केला. हा बाब उघड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधक महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले. या दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीत महत्त्वाचे दुवा ठरलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील सत्ताधाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आलीय, असं म्हटलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढला. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुखांचा राजीनामा मागितला.
एकीकडे विरोधकांकडून घणाघात सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींना वेग आला होता. सुरुवातीला राष्ट्रवादीचा एक बडा नेता आता गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार, अशी चर्चा सुरु होती. तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं म्हणत राजीनाम्याच्या चेंडू मुख्यमंत्र्याकडे टाकला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवार दिल्लीला गेले. तिथे शरद पवार यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हटलं. त्यानंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची पाठराखण केली.

लॉक डाऊनबाबत दोन दिवसांत निर्णय... ना राजेश टोपे यांचे मोठे विधान...


राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ही रुग्णसंख्येत सातत्याने वाढत गेली, तर काही शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच दोन दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
       
याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढणे, ही चिंतेची बाब आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि लॉकडाउन लावायचा का, लावला तर कुठे लावायचा, याबाबत निर्णय घेतला जाईल. पण, घाबरण्याचे कारण नाही, लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही. पण, यातही लॉकडाऊन टाळायचा असेल तर जनतेने नियमांचे पालन करायला हवे, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले.

प्रसिद्ध गायक महेश काळे करोना पॉझिटिव्ह, म्हणाले- 'लस आणि काळजी घेऊनही झाली लागण


प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांना करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांनी करोनाची लसही घेतली होती. पण त्यानंतरही लागण झाल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारन्टीन करून घेतलं आहे.
बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांमध्ये करोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रसिद्ध गायक महेश काळे यांना करोनाची लागण झाली आहे. स्वतः महेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती चाहत्यांना दिली.

महेश यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'अतिशय काटेकोर पद्धतीने सर्व नियमांचं पालन करून आणि अत्यंत काळजी घेऊन मला करोनाची लागण झाली. विशेष म्हणजे मी करोनाचं लसीकरणंही केलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अगदी अल्पप्रमाणात करोनाची लागण झाली आहे. तरीही मी स्वतःला क्वारन्टीन करून घेतलं आहे. जोवर डॉक्टर मला मी पूर्णपणे बरा झाल्याचं सांगत नाहीत तोवर मी क्वारन्टीनच राहीन. तुम्हा सर्वांच्या प्राथनेसाठी मनापासून आभार.'
महेश काळे 'सुर नवा ध्यास नवा.. आशा उद्याची' या गायनाच्या रिअॅलिशी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या ५ एप्रिलपासून हा शो कर्लस मराठीवर दाखवण्यात येईल. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. सलग दोन दिवस २५ हजारावर नवीन बाधितांची नोंद झाली आहे.

133 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु

सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 133 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 


*सातारा तालुक्यातील* सातारा 6, बुधवार पेठ 1, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, भोसले मळा 1, दौलतनगर 1,सदरबझार 1,मल्हार पेठ 1, संभाजीनगर 2, गोडोली 3, सैदापूर 2,केसरकर कॉलनी 1, करंजे 2, पाडगाव 1, कुसुर 1, आरफळ 2, एमआयडीसी सातारा 1, कांबळेश्वर 1, नागठाणे 4, येळेवाडी 1.

कराड तालुक्यातील* शनिवार पेठ 1,वाखन रोड 2, उंब्रज 1. 

फलटण तालुक्यातील* फलटण 5, मारवाड पेठ 1, पवार गल्ली 1, विद्यानगर 2, जाधववाडी 1,संजीवराजे नगर 1,  शुक्रवार पेठ 4, लक्ष्मीनगर 6, वाखरी 1, झीरपवाडी 1, पाडेगाव 1, ढवळ 1, ठाकुरकी 1, शिंदेवाडी 1,आरुड 1.
 *माण तालुक्यातील*पळशी 1, मोही 1.

खंडाळा तालुक्यातील*बोरी 2, लोणंद 5, शिरवळ 2, अंधोरी 1, नायगाव 2.
 *वाई तालुक्यातील*वाई 1.
*जावली तालुक्यातील* प्रभुचीवाडी 1, केसकरवाडी 1,कुडाळ 1. 

खटाव तालुक्यातील* कलेढोण 1, येरळवाडी 1, विखळे 1, मांडवे 1, बेलेवाडी 1, औंध 2, सिद्धेश्वर कुरोली 2, वडूज 2, लाडेगाव 1.
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1,आरबवाडी 21, न्हावी बु 1.
 
महाबळेश्वर तालुक्यातील*महाबळेश्वर 1.
*पाटण तालुक्यातील*ढेबेवाडी 1. 
*इतर*2,शिरंबे 1, जळगाव 1, वाघोशी 1.
*बाहेरील जिल्ह्यातील*पुणे 6.

4 बाधितांचा मृत्यु*
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे खुबी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, चिकलगुठन जि. सांगली येथील 70 वर्षीय पुरुष, वाडी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष व फलटण येथील 47 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 कोविड बांधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 

*एकूण नमुने -386258*
*एकूण बाधित -62439* 
 *घरी सोडण्यात आलेले -58189*  
*मृत्यू -1887* 
*उपचारार्थ रुग्ण-2363* 
0000