वेध माझा ऑनलाइन ; शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेमध्ये आले आहेत. गुलाबराव पाटील पालकमंत्री असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याचे पोस्टर लागले आहेत. पाटील यांना शोधून देणाऱ्याला 51 रुपयांचं बक्षीस असा मजकूर या पोस्टरवर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आले आहेत. गुलाबराव पाटील पालकमंत्री झाल्यापासून ते केवळ दोनदा जिल्ह्यात आल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.
51 रुपयांचं बक्षीस
गुलाबराव पाटील हे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र ते पालकमंत्री झाल्यपासून जिल्ह्यात केवळ दोनदाच आले असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, शेतकरी खचून गेला तरीही पालकमंत्री जिल्ह्यात आले नाहीत असा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी संघटनेच्या वतीनं ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. पालकमंत्री बेपत्ता आहेत. त्यांना शोधून देणाऱ्यास 51 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असा मजकूर या बॅनरवर आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदारसंघात हे पोष्टर लागले आहेत.
शेतकरी अवकाळीच्या तडाख्यात सापडला आहे. मोठ्याप्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. मात्र पालकमंत्री जिल्ह्यात येत नसल्यानं स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकरी संघटनेच्या वतीनं हे अनोख अंदोलन करण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment