वेध माझा ऑनलाइन - पारंपरिक लोककलांद्वारे लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘भूपाळी ते भैरवी’ कार्यक्रमाने कराडकर रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘कृष्णा महोत्सव’अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला रसिकांची भरभरुन दाद मिळाली.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथील प्रीतिसंगम घाटावर आयोजित ‘कृष्णा महोत्सव’अंतर्गत ‘भूपाळी ते भैरवी’ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
भव्य रंगमंचावर दोन तास रंगलेल्या या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडविण्यात आले. गण, नमन, भूपाळी, जात्यावरील ओवी, पहाटेच्या वेळी हातात कंदील घेऊन गल्लीत येणारा पिंगळा, रामप्रहरी वातावरण प्रसन्न करीत जीवनाचं तत्वज्ञान सांगणारा वासुदेव, घराघरांतील वास्तव चित्र उभा करणारा पोतराज, अध्यात्म आणि मनोरंजनातून प्रबोधन करणारे भारुड, जिजाऊंचे गौरवगीत, शेतकरी नृत्य, कोळी नृत्य, दिंडी, साडेतीन शक्तीपीठांचा गोंधळ, लावणी आणि शेवटी सादर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या अप्रतिम सादरीकरणाने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
यावेळी डॉ. भोसले यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक सुहास जगताप, घनशाम पेंढारकर, उमेश शिंदे, धनंजय खोत, प्रमोद शिंदे, मुकुंद चरेगावकर, प्रशांत कुलकर्णी, नितीन वास्के, रुपेश मुळे, शैलेंद्र गोंदकर, विनायक घेवदे, विश्वनाथ फुटाणे, अभिषेक भोसले, रुपेंद्र कदम, शशांक होगाडे, विशाल कुलकर्णी, ओकांर कर्णिक, नितीन शहा, सुहास चक्के, कृष्णा चौगुले, सीमा घार्गे, स्वाती पिसाळ, धनश्री रोकडे, मंजिरी कुलकर्णी, नम्रता कुलकर्णी, रमेश मोहिते, किरण मुळे, समाधान चव्हाण आदी मान्यवरांसह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment