वेध माझा ऑनलाइन - येथील जोतिबा मंदिर मंगळवार पेठ वाडी येथून बुधवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत जोतिबा सासन काठी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
उद्या रात्री ९ वाजता जोतिबा सासन काठी व पालखी यमाईदेवी मंदिर कन्या शाळेसमोर भेटीला येते.ही परंपरा कराडमध्ये १०० वर्षांपासून चालू आहे. यमाई देवीला मानकरी, सालकरी भेटीला येतात. तसेच कृष्णाबाई पालखीची मिरवणूक रात्री ८ वाजता भेटीस येते . त्यानंतर जोतिबा सासनकाठी व पालखीची संपूर्ण मंगळवार पेठत प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर पंढरीचा मारुती येथे रात्री ११ वाजता दर्शन घेऊन सदर सासनकाठी व पालखीची सांगता होते.
गुरूवार दि 6 रोजी सकाळी ११ वाजता यमाईदेवी मंदिरासमोर महाप्रसाद कार्यक्रम होणार असल्याची माहिती चंद्रकांत कोळी (आबा), संतोष कोळी,सुभाष कोळी,संजय जगदाळे तसेच कुंभार वाडा,कमानी मारुती मंडळ,जोतिबा मंडळ यांच्यावतीने देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment