Wednesday, April 5, 2023

साताऱ्यात कोयता गॅंग पुन्हा सक्रिय? ; शिक्षकावर कोयत्याने हल्ला ;

वेध माझा ऑनलाईन - सातारा शहरात पुन्हा कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. एकाच रात्रीत झालेल्या दाेन घटनांमध्ये गॅंगमधील एकाने शिक्षकावर तसेच ट्रक चालकावर हल्ला केला. या हल्ल्यात दाेघे जखमी झाले आहेत. पाेलिसांनी काेयता गॅंगच्या एकास ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

सातारा शहरातील शेटे चौक परिसर तसेच पोलीस मुख्यालयाच्या पासून हाकेच्या अंतरावर एका शिक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या घटनेत एका ट्रक चालकाच्या डोक्यात फरशी घालून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.
यामुळे शहरात रात्रीच्या सुमारास एकच खळबळ माजली. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या घटनेतील दोन्ही जखमींना सातारा जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी कोयता गँगचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर पाेलिसांनी एकास संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे पाेलिस कसून चाैकशी करीत आहेत.

No comments:

Post a Comment