Monday, April 10, 2023

शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील रस्त्यांच्या कामांना प्रारंभ ; रणजितनाना पाटील यांच्या प्रयत्नाने हायटेक रस्ते


शिवाजी सोसायटीच्या रहिवाश्यांनी रणजित पाटील यांचा सत्कार केला


वेध माझा ऑनलाइन ; 
येथील शिंदे गटाचे युवा नेते रणजितनाना पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून कराड शहरासाठी कोटय़वधी रूपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीअंतर्गत शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील बहुतांश रस्ते कारपेट आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सोसायटीतील राम मंदिरसमोर मान्यवरांच्या हस्ते झाले.

मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके,शिवसेना जिल्हा प्रमुख. जयवंत शेलार(माऊली) रणजितनाना पाटील, माजी नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर,बाबासो शिंदे मदन भोसले. बंडा मोहीते.रमेश जाधव, सुधीर शिराळकर,भावेश शहा.सुनिल निगडीकर.विजय देसाई.माजी नगरसेवक. घन:श्याम पेंढारकर,रविराज शिंदे प्रकाश शिंदे, शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र माने, काकासाहेब जाधव, सुलोचन पवार, शंभूराज रैनाक. गुलाब पाटील. यांच्यासह सोसायटीतील नागरिक यावेळी उपस्थित होते.

रणजितनाना पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे शहरास निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी वैशिष्टय़पूर्ण योजना, दलित वस्ती सुधार, जिल्हा नियोजन या माध्यमातून सुमारे 25 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून शहरातील विविध रस्ते होणार आहेत. शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील बहुतांश रस्ते हायटेक रस्ते होणार आहेत. सोसायटीतील सर्व रस्ते मोठे असून हे रस्ते हायटेक होणार आहेत. याबरोबरच वाखाण शिवारातील रस्तेही होणार आहेत. सोलर पथदिवेही बसवणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी 8 कोटींचा निधी दिला आहे. त्याची लोकवर्गणीही माफ केली आहे. या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून शहरासाठी भरीव निधी उपलब्ध झाला असून टप्प्याटप्प्याने सर्व कामे मार्गी लागणार आहेत.
सोसायटीतील रस्ते नव्याने होणार असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. निधीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल रणजितनाना पाटील यांचा सत्कार रहिवाशांच्या वतीने करण्यात आला. तसेच मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment