Sunday, April 9, 2023

अयोध्येत राम मंदिराला जेवढे सागवान लागेल ते महाराष्ट्र देणार ; मुख्यमंत्री शिंदे यांनी केली घोषणा

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार, मंत्र्यांसह नियोजित  अयोध्या दौऱ्यासाठी शनिवारी विशेष विमानाने लखनौमध्ये दाखल झाले.  यावेळी त्यांचे लखनाै विमानतळावर ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत भव्य स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना माेठा हार आणि गदा देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान राम मंदिराला जेवढे सागवान लागेल ते सर्व महाराष्ट्र राज्य देणार अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी यावेळी केली 

ते म्हणाले लखनऊ ते अयोध्या दरम्यानचा पूर्ण परिसर भगवामय झाला आहे. राममय झाला आहे. सर्व रामभक्त अयोध्येत आले आहेत. रवी राणा इथली माती घेऊन जाणार आहेत. तिथे ११४ फुटी हणुमानाची मूर्ती उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. माझे जे स्वागत झाले त्याबद्दल मी आभार मानतो बाळासाहेब ठाकरे, करोडो रामभक्तांचे स्वप्न होते, राम मंदिराचे निर्माण व्हावे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे सर्व खोटे ठरविले. मोदींनी त्यांच्याच काळात मंदिराचे काम सुरु केले आहे. तारीखही सांगितली आहे. जे विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले दरम्यान राम मंदिराला जेवढे सागवान लागेल ते महाराष्ट्र देणार अशी घोषणाही एकनाथ शिंदेंनी यावेळी केली 

ते पुढे म्हणाले हनुमान चालिसा वाचणाऱ्याना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले होते. हे पाप करणारे रावण की राम आहेत, हे तुम्हीच सांगा. साधुंचे हत्याकांड झाले तेव्हा हे चुप बसलेले. आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही. आम्ही त्यांचे रक्षण करणार. महाराष्ट्रात आता प्रभू रामांच्या आशिर्वादाने बनलेले सरकार काम करणार आहे, असा मी विश्वास देतो असेही एकनाथ शिंदे म्हणाले

No comments:

Post a Comment