वेध माझा ऑनलाइन - विलासकाकांच्या पश्चात ही निवडणूक होत असून, संघटनेच्या माध्यमातून आपण सभासदांसमोर जाणार आहोत. समविचारी लोकांची मोट बांधून ही निवडणूक लढवली जाईल. व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रस्थापित लोकं सर्वसामान्यांच्या हक्कावर टाच आणत आहेत. समाजावरील अतिक्रमण थोपवणे गरजेचे आहे. तसेच पुरोगामी विचारांची पाठराखण व्हावी हेही तितकेच गरजेचे असल्याचे स्पष्ट मत ऍड उदयसिह पाटील यांनी आज रयत संघटनेच्या वतीने पाचवड फाटा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केलं
ते म्हणाले, विलासकाकांनी सर्वसामान्यांना ताकद देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. मध्यंतरी सत्तेत आलेल्या मंडळींनी बाजार समितीवर सुमारे पन्नास कोटी रुपये कर्ज केले. पण काकांनी पुन्हा बाजार समितीची सत्ता घेतली. आणि आज हीच बाजार समिती आता तीन कोटी रुपयांची ठेव बाळगून आहे. आता त्याच मंडळींना सत्ता हवी आहे. विरोधी एकत्र आलेल्या मंडळींनी त्यांचा मूळ विचार बाजूला ठेवला आहे. विरोधकांना लोकांना गुलाम करून स्वतःची सत्ता राखण्यासाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे.
ते म्हणाले रयत सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त झाला आहे. हे विलासकाकांच्या मार्गदर्शनाखाली घडले. याच कारखान्याच्या विस्तारवाढीला विरोधकांनी अडथळा आणला आहे. काकांनी सर्वसामान्यांना सत्ता दिली. हेच सूत्र घेवून बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे केले आहेत. वैचारिक परिवर्तन घडवण्याची गरज ओळखून सर्वजण एकत्र काम करणे गरजेचे आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बाजार समिती स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झाली. राज्यात सक्षम असणारी ही संस्था आहे. विलास काकांनी ही संस्था जोपासली आणि वाढवली.
यावेळी बाजार समितीवर बिनविरोध निवडून आलेल्या गणपत पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अशोकराव पाटील, जयवंतराव जगताप, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील - चिखलीकर, भानुदास माळी यांचे भाषणे झाली. अशोकराव पाटील - पोतलेकर यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment