Tuesday, April 4, 2023

बापरे ...आज जिल्ह्यात 22 जण सापडले कोरोना बाधित ; प्रशासन अलर्ट ;

वेध माझा ऑनलाइन -  सातारा जिल्ह्यात कोरोना संकट वाढू लागले आहे. काल कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. तर मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार रुग्नांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. आज आणखी 22 रुग्ण वाढले असून बाधितांची संख्या आता 56 वर पोहोचली आहे तर सध्या 10 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज मंगळवारच्या अहवालानुसार आणखी 22 रुग्णांची वाढ झाली आहे तर  7 रुग्णांना मुक्त करण्यात आले आहे वाढत्या कोरोनाच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे

No comments:

Post a Comment