Friday, April 14, 2023

प्रकाश जाधव राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित...

वेध माझा ऑनलाइन - अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने परीट समाजाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव (मेहरबान) यांना सन्मानित करण्यात आले.शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे 

अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींना आज (शुक्रवारी) मुंबई- भाईंदर येथे राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनौजिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे शानदार वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना कृष्णकुमार कनौजिया म्हणाले, आज ज्या समाज बांधवांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ती सर्व जण परीट समाजाचे राज्याचे भविष्य आहेत.त्याच्या खांद्यावर हा समाज पुढे यशस्वी वाटचाल करेल.या पुरस्कारामुळे  राज्यातील धोबी समाजात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे.याचा मला विशेष आनंद आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे म्हणाले की,  राज्यातील काना-कोपऱ्यातून आज या ठिकाणी समाज बांधव जमले व हा पुरस्कार सन्मानपुर्वक स्विकारला. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
पुरस्काराला उत्तर देताना प्रकाश जाधव (मेहरबान) म्हणाले की, आज जो पुरस्कार मिळाला आहे,तो संपूर्ण जिल्ह्याचा सन्मान आहे. हा पुरस्कार आपण परीट समाजासाठी माझ्याबरोबर अहोरात्र झटणाऱ्या माझ्या समाज बांधवांना समर्पित करतो. असे त्यांनी नमूद केले.
 
यावेळी उद्योजक व आरक्षण समिती प्रमुख आशिषभाऊ कदम ,राजेंद्रशेठ आहेर, उद्योजक मार्गदर्शक राजाराम महाडिक, ज्येष्ठ नेते शांतीलाल कारंडे, अखिल भारतीय धोबी महासंघ कोकण विभाग प्रमुख संतोष शिंदे, अरुण धोबी,उपाध्यक्ष  हसमुख पांगारकर, ज्येष्ठ नेते मुरलीधर शिंदे, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष सदाशिवराव ठाकरे, प्राध्यापक मार्गदर्शक किसनराव नार्वेकर, ज्येष्ठ नेते संतोष भालेराव,  सुषमाताई अमनकर,  डॉ.प्रा.रजनीताई लुमसे, वरिष्ठ मार्गदर्शिका सनद वाडिया, कार्याध्यक्ष रमेश लांबस्कर, रवींद्र आंबेलकर, लॉन्ड्री संघटना अध्यक्ष बळवंतराव साळुंखे यांच्यासह राज्यभरातील परीट समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता‌.

No comments:

Post a Comment