Wednesday, April 26, 2023

" कराड रोटरी अवॉर्ड 'चे उद्या वितरण ; ; आर.जी शेंडे डॉ.मोहन राजमाने (सर) दामोदर दीक्षित एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब कराड आणि ग्रामपंचायत मान्याचीवाडी यांचा होणार सन्मान ;

वेध माझा ऑनलाइन ; रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने " कराड रोटरी अवॉर्ड ' सन्मान सोहळा उद्या गुरुवार दि २७ रोजी कराड अर्बन शताब्दी हॉल येथे सायं. 5.30 वाजता पार पडणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा रोटरी अवॉर्ड देऊन गौरव करण्यात येणार आहे 

कराडमधील उद्योजक आर.जी शेंडे यांना उद्योग विभागातून, डॉ.मोहन राजमाने (सर) यांना शिक्षण विभागातून, दामोदर दीक्षित यांना कला विभागातून, एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब कराड या संस्थेला पर्यावरण विभागातून तर ग्रामपंचायत मान्याचीवाडी यांना सामाजिक विभागातून कराड रोटरी अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. 

अमेरिका येथून अल्ट्रामॅन हा किताब पटकावून आलेल्या वेदांत अभय नांगरे यांचा कराड वासीयांतर्फे कराड खेल रत्न पुरस्काराने यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. 
या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी डॉ सुरेश भोसले, (कुलपती, कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड)हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी आपल्या मित्र परिवारासह या कराड रोटरी अवॉर्ड सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन क्लबचे कराडचे अध्यक्ष प्रबोध पुरोहित, तसेच रो चंद्रशेखर पाटील,रो डॉ राहुल फासे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment