वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज राज्यातच नव्हे तर देशात अत्यंत चांगले आहे असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बँकेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले.
यावेळी बँकेचे बँकेचे अध्यक्ष श्री.नितीन पाटील,उपाध्यक्ष श्री.अनिल देसाई, संचालक आ.बाळासाहेब पाटील, आ.मकरंद पाटील,श्री.राजेंद्र राजपुरे,श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर,श्री.प्रदिप विधाते,श्री.सत्यजित पाटणकर,श्री.सुनिल खत्री,श्री.रामराव लेंभे,श्री.सुरेश सावंत, श्री.लहुराज जाधव,संचालिका सौ.कांचन साळुंखे,सौ.ऋतुजा पाटील,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री.राजेंद्र गाढवे,श्री.राजेंद्र भिलारे उपस्थित होते.
याप्रसंगी अजितदादा पवार यांचा बँकेमार्फत यथोचित सत्कार करणेत आला.
यावेळी अजितदादा म्हणाले,बँकेने चांगला नावलौकिक मिळविला असून तो कायम टिकविणेसाठी सातत्य व गुणात्मक कामकाज करणे आवश्यक आहे.बँकेचे प्रशासन व व्यवस्थापन उत्तम आहे.बँकेत आर्थिक शिस्त पाळली जाते.कर्ज वाटप करताना निकष विचारात घेवूनच कर्ज वाटप केले जाते व राजकारणविरहीत कामकाज केले जाते,त्यामुळे बँक सक्षम आहे. बँकेची कर्ज वसुली चांगली आहे. एनपीए चे प्रमाण अत्यंत कमी आहे.बँकेला चालू वर्षी नफा चांगला झालेला आहे.सहकारी साखर कारखाने इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य देत आहेत.साखर कारखाने कर्ज मागणी कमी झाल्यामुळे बँकेचा कर्जपुरवठा कमी होत आहे.बँकेने उत्पन्न वाढीसाठी थेट कर्ज वाढीसाठी नवीन पर्याय शोधले पाहिजेत. बँकेने सोलर प्रोजेक्टला प्राधान्य दयावे.दुग्ध व्यवसाय,पोल्ट्री,कृषी पर्यटन,गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज इ.योजनांचे माध्यमातून चांगले काम होत असून अधिक काम करावे. बँक संलग्न विकास सेवा संस्थांमार्फत केल्या जाणारे कर्ज पुरवठ्याचा व्याजदर महाराष्ट्रात अत्यंत कमी आहे. डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लॅनमध्ये बँकेचा 70 टक्केपेक्षा अधिक वाटा आहे ही चांगली बाब आहे. बँक संलग्न ९५३ विकास सेवा संस्थांपैकी ९१५ विकास संस्था मागील वर्षी नफ्यात आलेल्या आहेत ही अत्यंत चांगली बाब आहे.बँकेने स्वनिधी वाढविणेस प्राधान्य दयावे.अमृतमहोत्सवी वर्षात बँकेने चांगले कार्यक्रमांचे आयोजन करावे.बँकेच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळाबरोबरच अधिकारी व सेवकांचे सुध्दा योगदान असलेचे सांगून पुढील वर्षाच्या कामकाजास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती दिली.सातारा जिल्हा बँकेचे कामकाज उत्कृष्ट आहे त्यामुळेच बँक देशामध्ये सहकार क्षेत्रात अव्वल स्थानी असून बँकेस नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी बँकेला गौरविले असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ‘सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक’ म्हणून या बँकेची नोंद झालेली आहे असेही ते म्हणाले
No comments:
Post a Comment