वेध माझा ऑनलाइन - यशवन्त आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव तसेच त्यांचे बंधू विजय यादव संजय यादव प्रशांत यादव व भाचे संग्राम सणस यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी उद्या 18 एप्रिल रोजी साजरा होणार आहे अशी माहिती विजय यादव यांनी दिली तरी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन यादव बंधूनी समस्त भक्त भाविकांना केले आहे
दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन याठिकाणी यादव बंधूंकडून होत असते यावेळी शहर व परिसरातील भाविक याठिकाणी प्रसादाचा लाभ घेत असतात विविध क्षेत्रातील अनेकांची या सोहळ्यास मोठी उपस्थिती असते याहीवर्षी हा सोहळा उद्या 18 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत येथील अर्बन बँक तळभाग शाखेसमोर सम्पन्न होणार आहे भाविकांनी यावेळी उपस्थित राहून स्वामींची पूजा, आरती व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यादव बंधूंच्या वतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment