Thursday, April 27, 2023

कराडच्या आस्था सामाजिक विकास संस्थेच्या वतीने 16 शेतकऱ्यांना आस्था कृषिभूषण पुरस्कार देऊन करणार सन्मानित ; अध्यक्षा सौ स्वाती पिसाळ यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन - कराड येथील आस्था सामाजिक विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि 1 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला असून त्याच दिवशी एकूण 16 प्रगतशील शेतकऱ्यांना आस्था कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ स्वाती पिसाळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली  

या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यापूर्वी सन्मान देखील करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमास खासदार श्री छ उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्यात आली यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ विद्या मोरे व सहसचिव सौ सुनीता पवार उपस्थित होत्या

सदर  कार्यक्रमास कृषितज्ञ ज्ञानेश्वर बोडके तसेच हमंतजी धुमाळ, विलासराव शिंदे तृप्ती घनवट डॉ राजेंद्र सारकाळे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत 

दरम्यान हा शेतकरी सन्मान सोहळा 1 मे रोजी वेणूताई चव्हाण सभागृह येथे दुपारी 3 वाजता सम्पन्न होणार आहे तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आले 

No comments:

Post a Comment