Friday, April 21, 2023

कराडात समस्त ब्राह्मण समाजाच्यावतीने सर्वंरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन

वेध माझा ऑनलाइन - येथील समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्यावतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त शनिवार दि.22 व सोमवार दि.24 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.24 रोजी येथील लाहोटी कन्या प्रशाला येथे कृष्णा हॉस्पिटल कराड यांच्या सहयोगाने सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये हृदयविकार, डोळ्यांचे आजार, त्वचारोग, दातांचे विकार, अस्थिरोग, लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार अशा सर्व आजारांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून संपूर्णपणे मोफत केली जाणार आहे. या शिबीरात आलेल्या रुग्णांना पुढील एक महिन्यांमध्ये कृष्णा हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी व उपचारांमध्ये भरघोस सूट दिली जाणार आहे. तरी कराड व परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन ब्राह्मण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त महिला व तरुणांनी रक्तदान शिबीरातही सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment