Tuesday, April 18, 2023

40 सह्या झालेल्या नाहीत आणि घेतलेल्या नाहीत. जी संभ्रमावस्था निर्माण केली जातेय, ती थांबवा. आमच्या सहनशिलता अंत होऊ देऊ नका ; जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे काम करत राहणार - अजित पवार

वेध माझा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत  जाण्याच्या चर्चेवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्क गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले. आता या गोष्टीचा तुकडा पाडा, कारण नसताना गैरसमज करु देऊ नका. 40 सह्या झालेल्या नाहीत आणि घेतलेल्या नाहीत. जी संभ्रमावस्था निर्माण केली जातेय, ती थांबवा. आमची सहनशिलता संपते, त्याचा अंत होऊ देऊ नका अशी विनंती अजित पवार यांनी केली. जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षाचे काम करत राहणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

आम्ही सर्वजण राष्ट्रवादीतच राहणार आहे. तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. मला कामासाठी आमदार भेटले. यामधून वेगळा अर्थ काढू नका. मी राष्ट्रवादीमध्ये आहे. हे प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. काळजी करु नका पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. राष्ट्रवादीत अनेक चढउतार आले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांमध्ये यथाकिंचीतही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी सांगितल

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानाने स्थापना झाली आहे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार अल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पण सध्या माझ्याबाबत एवढं प्रेम का ऊतू चाललं आहे? असा सवाल त्यांनी केला. विपर्यास करुन बातम्या दाखवल्या जात आहेत. प्रत्येकाने आपापले काम करत जावा. आपापल्या भागात महाविकास आघाडी कशी वाढत जाईल यासाठी प्रयत्न करा असेही अजित पवार यांनी म्हटले.

संजय राऊतांना टोला
इतर पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी वक्तव्ये केली जात आहेत त्यांचाही समाचार अजित पवार यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, इतर पक्षाचे प्रवक्तेसुद्धा राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत. तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनीधीत्व करता त्याबद्दल बोला. तुम्ही ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करुन काहीही बोलू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्याने घेण्याचं कारण नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला.यावेळी अजित पवारांनी संताप व्यक्त केला. 

No comments:

Post a Comment