वेध माझा ऑनलाइन ; पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड कोयना पूल आता दहा लेनचा होणार आहे नवीन कोयना पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे बांधकाम होत आहे कोयना नदीवर आणखी दोन पुलाची उभारणी होणार असल्याची माहिती आहे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडून नव्याने युनिक पुलाची उभारणी होणार असून याच्या जोडीला कोयना नदीवर असलेला पूलही आता दहा लेनचा होणार आहे महामार्गावरील कोयना नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाला नुकताच प्रारंभ झाला.. डीपी जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप जैन प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र वर्मा सीनियर इंजिनिअर शशांक तिवारी अर्जित बिस्वा अस्लम खान धीरेंद्र यादव व इतर तंत्रज्ञांच्या उपस्थितीत या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली एकूण दहा लेनचा पूल कोयना नदीवर उभारण्यात येणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने या पुलाची बांधणी करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा सज्ज झाली आहे
No comments:
Post a Comment