Wednesday, April 5, 2023

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल (Maharashtra Political Crisis) येत्या 10 दिवसांत येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याचे, सूत्रांकडून समजते. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रखडला असून येत्या 10 दिवसांत सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाची (Shinde Group) बाजू ज्येष्ठ वकील निरज कौल (Senior Adv. Niraj Kaul) आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे (Senior Adv. Harish Salve) बाजू मांडत आहेत. तर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Senior Adv. Kapil Sibal) आणि अभिषेक मनु सिंघवी  बाजू मांडत आहेत.






दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद
करण्यात आला. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
हा निकाल येत्या 10 दिवसांत येण्याची शक्यता आहे. या निकालानंतरच राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या (State Government) लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर
टीका केली आहे. सरकार स्थापन होऊन सात महिने झाले, परंतु या कालावधीत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
एका मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की सरकारमधील असंतोष उफाळून येईल.
या असंतोषाला तोंड देणं अवघड जाईल यासाठी मंत्रिमंडळ विस्तार केला जात नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.


No comments:

Post a Comment