वेध माझा ऑनलाइन - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. नक्षलवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. या घटनेत 11 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या भू-सुरंगस्फोटामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. अरणपुरच्या जंगलामध्ये हा स्फोट माओवाद्यांनी केला असून अजूनही माओवादी आणि जवान यांच्यामध्ये त्या ठिकाणी चकमक सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी मदत पोहोचणे कठीण होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडी जिल्ह्यातील अरनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, जवानांचे एक पथक नक्षल विरोधी मोहिमेसाठी रवाना झाले होते. या मोहिमेदरम्यान अरनपूर मार्गावर IED स्फोट घडवण्यात आला. या भीषण स्फोटात 10 डीआरजी जवान आणि एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment