Thursday, April 6, 2023

सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील मित्रमंडळ व बाल गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार पेठ पाण्याची टाकी तेथील काळा मारुती मंदिरात आज सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन ;

वेध माझा ऑनलाइन -  सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील मित्रमंडळ व बाल गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सोमवार पेठ पाण्याची टाकी तेथील काळा मारुती मंदिरात आज हनुमान जन्मोत्सवानिमित आज सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

सोमवार पेठ पाण्याची टाकी येथील श्री बाल गणेश मंडळाच्या माध्यमातून काही वर्षांपासून अनेकविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात  सोमवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी स्वतः लक्ष घातल्यापासून या गणेश मंडळाच्या माध्यमातून हे समाजपयोगी कार्यक्रम याठिकाणी होत आहेत सोमवार पेठ परिसरातून याबाबत दीपक पाटील यांचे नेहमीच कौतुक होत असते 

दीपक पाटील यांनी कोरोना काळात मोठं काम केलं आहे सॅनिटाइझरचे तसेच मास्कचे वाटप असे उपक्रम त्यांनी त्याकाळात राबवले आहेत 
कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासत होता त्यावेळी दीपक पाटील मित्र परिवाराने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करत आपली सामाजिक बांधिलकी जपली,  त्याच काळात त्यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देखील अनेकांनी लाभ घेतला आहे
आजही त्यांच्या या कार्याची वाहवा होत असते
आज हनुमान जन्मोत्सव साजरा होत असताना सोमवार पेठेतील काळा मारुती मंदिराच्याच ठिकाणी आज सायंकाळी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे मंदिराच्या इतिहासात आज प्रथमच हा महाप्रसाद कार्यक्रम इथे होत आहे सर्व भक्त भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन दोपक पाटील मित्र परिवार व बाल गणेश मंडळ सोमवार पेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment