वेध माझा ऑनलाइन - कराडच्या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस आरोप-प्रत्यारोंचा धुरळा उडाला आहे त्यात शेतकरी विकास पॅनल हे आपल्या प्रचारातून मतदारांच्यात आपले म्हणणे लोकांपर्यंत पोचवण्यात यश मिळवत असल्याची चर्चा आहे त्यामुळेच सध्या याच पॅनेलचे पारडे जड असल्याची चर्चा आहे दरम्यान कराड तालुक्यातील बाजार समितीचे काही मतदार परगावी सहलीवर गेल्याची माहिती आहे.
सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या कराड बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे राजकीय वातारण तापलं आहे. या निवडणुकीमध्ये कराड तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ऍड उदय पाटील माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील डॉ अतुल भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कराड बाजार समितीच्या निवडणुकीतील चुरशीमुळे कराडात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. येथील बाजार समितीच्या एका पॅनेलच्या काही मतदारांना हैदराबाद, गोवा सहलीवर पाठविण्यात आले आहेत अशी माहिती आहे कराड बाजार समिती निवडणुकीत यंदा शेतकरी विकास पॅनेलचे पारडे जड असल्याचीही चर्चा आहे या पार्टीचे सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनुभवी उमेदवार तसेच नेतृत्व करणारे आ बाळासाहेब पाटील व अतुल भोसले यांचेही सहकार क्षेत्रात केलेले उत्तुंग केलेले काम या जमेच्या बाजू सध्या चर्चेत आहेत
या दोन्ही नेत्यांनी आपापल्या सहकारी संस्था नुसत्या चालवल्या नाहीत तर मोठ्या केल्या राज्यात नावारूपाला आणल्या त्यामुळे मागील यांच्याच काळात बाजार समितीत सत्ता असताना या नेत्यांनी सुचवलेले कोणतेही प्रोजेक्ट व ठोस काम सध्याच्या सत्ताधार्यांनी उभे केले नसल्याचा प्रचार शेतकरी पॅनल च्या माध्यमातून सर्वत्र जोरदार होताना दिसतोय असे अनेक मुद्दे प्रचारातून लोकांना पटवण्याकडे या पॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न होताना दिसतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून आताच्या घडीला शेतकरी विकास पॅनेलचे पारडे जड होताना दिसत आहे
No comments:
Post a Comment