वेध माझा ऑनलाइन - तुम्ही राष्ट्रवादी मधूनच निवडणूक लढवणार का ? मोदींनी तुमचं सभागृहात कौतुक केलं याकडे पत्रकारांनी अमोल कोल्हे यांचे लक्ष वेधले असता पंतप्रधान मोदींनी माझं सभागृहात कौतुक केलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अशा शब्दात पंतप्रधान मोदींचे अमोल कोल्हेनी आभार मानले. पण खोदून खोदून विचारले तरी मी राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढणार... असे मात्र त्यांनी स्पष्ट आणि ठामपणे सांगितलेच नाही. सध्या ते राष्ट्रवादी चे खासदार असले तरी भाजपशी त्यांचे सूत जुलळ्याची राज्यभर चर्चा आहे त्याच धर्तीवर त्यांना छेडले असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले
कराड येथे २८ एप्रिल ते ३ मे दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी दिपक शिंदे, वासू पाटील, प्रसाद देशपांडे, विनायक कवडे आदींची उपस्थिती होती.
कोल्हे म्हणाले मी शेतकऱ्याचा पोरगा आहे अगोदर आभाळ बघायचं, वारं बघायचं मग नंतर नांगरायचं... असं म्हणत लोकसभा निवडणूक लढवायची मात्र ते वारं बघून ठरवायचं... असं सूचक विधान करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी करत राष्ट्रवादी कडूनच आपण निवडणूक लढणार आहोत असे ठामपणे सांगितलेच नाही त्यामुळे सध्या ते राष्ट्रवादी चे खासदार असले तरी काही दिवसांपासून त्यांच्या भाजपशी जवळीक वाढल्याच्या चर्चेला यामुळे एकप्रकारे दुजोराच मिळाला आहे अशी चर्चा आहे
राष्ट्रवादी मध्ये तुम्ही समाधानी आहात का? या प्रश्नवर त्यांनी फक्त हसणे च पसंत केले... तर औरंगजेबच्या कबरीवर कोण माथा टेकत असेल तर ते चूकच आहे असे सांगून कोल्हेनी औरंगजेब कधीही आमचा नव्हता त्यामुळे त्याच्या कबरीवर डोकं टेकण्याचे समर्थन होऊ शकत नाही अस स्पष्टपणे सांगितले
काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मधल्या काळात महापुरुषांच्या बदनामी करण्याच्या कृत्यावर बोलताना कोल्हे यांनी सावध पवित्रा घेत यावर कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही तर संभाजी महाराजांबद्दल याच राजकीय नेत्यांनी धर्मवीर की स्वराज्य रक्षक असा सवाल खडा केला होता त्यावर मत विचारले असता याविषयी
आपल्या मताने काय फरक पडतो... असे गुळगुळीत उत्तर देऊन वेळ मारून नेली एकूणच या पत्रकार परिषदेत अमोल कोल्हे यांच्यामध्ये अभिनेत्यापेक्षा एक कसलेला राजकीय नेताच अधिक झळकत होता असे दिसून आले
दरम्यान त्यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे शेकडो हुन अधिक शो करून संपूर्ण देशात वाहवा मिळवली आहे 28 एप्रिल ते 3 मे या कालावधीत याच नाटकाचे कराडमध्ये शो होणार आहेत त्याचीच माहिती देण्यासाठी कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करत आपली राजकीय भूमिका देखील मांडली
No comments:
Post a Comment