वेध माझा ऑनलाइन ; नाशिकचे आमदार सत्यजित तांबे आज कराडमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोडवे गात सर्वानाच आसचर्य चकित केले ते म्हणाले फडणवीस यांनी माझ्या उमेदवारी साठी मोठा आग्रह धरला होता माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही मी त्यांचे राजकारण खूप जवळून अनुभवत आलो आहे निवडणुकीच्या काळात मी त्यांचे भाषणातुन वारंवार कौतुक केले आहे अशा शब्दात तांबे यांनी आज कराडमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांचे गोडवे गायले इतर राजकीय पक्षांनी देखील आपल्याला विरोध केला नाही हेही ते म्हणाले दरम्यान काँग्रेस नेते व आ. तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांचा आपल्या विजयात मोठा वाटा आहे असेही ते म्हणाले मात्र शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना काँग्रेसने निलंबित केलं आहे यामुळे तांबे अजूनही नाराज असल्याचे दिसून आले माझे कोणाशी मतभेद नाहीत. त्यामुळे ते दूर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझी नाराजी तेव्हाच दूर होईल जेव्हा मला कोण चर्चेला बोलवेल अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद बाहेर काढली
आ. सत्यजित तांबे यांनी आज कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले ठराविक लोकांनी जे गैरसमज निर्माण केले. त्याच्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली. आणि पक्षाने मला बाहेर काढलं. परंतु शेवटी आम्ही पिढ्यानपिढ्या काँग्रेस पक्षात काम करणारी लोक आहोत. शंभर वर्षे आमच्या कुटूंबाला काँग्रेसमध्ये होत आहेत. माझी देखील 10 ते 20 वर्षे हे विद्यार्थी ते युवक चळवळीपासून काँग्रेसमध्ये गेली आहेत. आणि त्यामुळे आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांकडून झाला. त्याच्या विरुद्ध आमची लढाई होती
सध्याच्या राज्यसरकार बाबत भाष्य करताना त्यांनी सावध प्रतिक्रिया देत दोन प्रकारची सरकारे असतात असे सांगितले... त्यापैकी एक डोकी मोजणारे म्हणजे संख्याबळाचे असते... तर दुसरे नीतिमत्तेचे राजकारण करणारे असते... तुम्हाला यापैकी हे सरकार कोणते वाटते असे विचारले असता,... ते म्हणाले... ते नंतर सांगेन... पत्रकारांना शब्दात सापडायचे नसते असे म्हणत त्यांनी हा संवाद थांबवला
No comments:
Post a Comment