Tuesday, April 4, 2023

कृष्णा रन मॅरेथॉनला आबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद

वेध माझा ऑनलाइन -  कृष्णा महोत्सवाअंतर्गंत कराड शहरात घेण्यात आलेल्या कृष्णा रन मॅरेथॉनमध्ये कराडसह परजिल्ह्यातून व परराज्यातून सुमारे १००० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत १० वर्षांच्या चिमुकल्यांपासून ७४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचा विशेषत: महिला, युवतींचा सहभाग लक्षणीय होता.
 
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात कृष्णा रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अतुल भोसले, धनंजय खोत, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, घनश्याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर, कृष्णा विश्व विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे, महादेव पवार, रमेश मोहिते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

२१ किलोमीटरमध्ये ५१ वर्षांहून अधिक वयाच्या महिला गटात डॉ. नीलिमा वनारसे यांनी विजेतेपद पटकाविले. तर याच गटात पुरुषांमध्ये पांडुरंग पाटील, जॉर्ज थॉमस आणि रवींद्र जगदाळे यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकाविले. ४१ ते ५० वर्षे महिला गटात डॉ. पल्लवी मूग व अल्मास मुलाणी यांनी अनुक्रमे दोन क्रमांक मिळविले; तर पुरुष गटात परशुराम भोईल, मारुती चाळके व विजय लिगाडे यांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळविले. ३१ ते ४० वर्षे महिला गटात अवनी चिवटे प्रथम आल्या. तर पुरुष गटात विशाल कांबिरे, अभी माने, अमित देशमुख यांनी यांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळविले. २१ ते ३० वर्षे महिला गटात भक्ती पोटे प्रथम आल्या. तर पुरुष गटात ओंकार बाईकर, इंद्रजीत कांबळे, अवधूत शिवणीकर यांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळविले. १५ ते २० वर्षे महिला गटात पायल जांभळे, मानसी लोखंडे, भाग्यश्री फल्ले यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकाविले. तर पुरुष गटात अमोल अमुने, किरण बर्गे, मनोज मोरे यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकाविले. 

१० किलोमीटरमध्ये ५१ वर्षांहून अधिक वयाच्या महिला गटात संगीता उबाळे, विद्या चव्हाण, माधुरी पंचरिया, पुरुष गटात पांडुरंग, कैलास माने, लक्ष्मण यादव, ४१ ते ५० वर्षे महिला गटात सुजाता माळी, राजश्री पाटील, प्रमिला यादव, पुरुष गटात सुनील शिवने, सचिन निकम, विजय भिलारे, ३१ ते ४० वर्षे महिला गटात तृप्ती वीर, शलाका देशमुख, प्राजक्ता पाटील, पुरुष गटात प्रदीप गरुड, प्रशांत अलदूर, मिथुन गावित, २१ ते ३० वर्षे महिला गटात सुनीता ठाकूर, सम्राज्ञी पवार, पुरुष गटात राहुल सूर्यवंशी, दिगंबर कुंभार, आदित्य रासकर, १५ ते २० वर्षे महिला गटात प्राची देवकर, सानिका नलवडे, कनिष्का पंचरिया, पुरुष गटात शिवराज, अथर्व ताटे, जीवन जाधव, १४ वर्षाखाली मुलींच्या गटात श्रावणी लिबे, अनुष्का निकम, अनुश्री काळे, मुलांच्या गटात वेदांत कांबणे, सत्यम मदने, राजसिंह डुबल यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकाविले.

५ किलोमीटरमध्ये ५१ वर्षांहून अधिक वयाच्या महिला गटात डॉ. आकांक्षा राजगुरु, अमिता गोखले, डॉ. प्रीति ओसवाल, वैशाली सावंत, नीता शेवाळे, पुरुष गटात पृथ्वीराज भोसले, प्रदीपकुमार यादव, संभाजी मदने, आनंदराव खोबरे, दिपक चव्हाण, ४१ ते ५० वर्षे महिला गटात अश्विनी देशपांडे, सविता देवकर, तस्नीम सय्यद, सारिका दुधाने, वैशाली इंगवले, पुरुष गटात शशिकांत पाटील, सचिन पाटील, अतुल माने, सयाजी कुंभार, दादासो माने, ३१ ते ४० वर्षे महिला गटात महेश सचदेव, निकीता दरक, पद्मावती शिंदे, सुवर्णा पाटील, ज्योती आदमाने, पुरुष गटात निवास हंजे, अण्णा पाटील, विजयकुमार धुमाळ, प्रशांत मोहिते, बी. एस. कांबळे, २१ ते ३० वर्षे महिला गटात ऐश्वर्या बादल, साक्षी हंबरे, साची ओसवाल, चैत्राली चेंडके, नीलम जाधव, पुरुष गटात विराज सगरे, अतिश फारकांडे, ओंकार कुंभार, तीर्थ शाह, उत्कर्ष पाटील, १५ ते २० वर्षे महिला गटात निकिता पवार, मृदुला मोहिते, निधी तलरेजा, गौरी मोरे, देशना शाह, पुरुष गटात सोहम साळुंखे, अश्विन मर्ढेकर, पंढरीनाथ वडार, प्रशांत नाईक, देवराज पाटील, १४ वर्षाखालील मुलींच्या गटात अबोली वास्के, चशुका लादे, सान्वी पाटील, मृण्मयी चव्हाण, श्रावणी किरपेकर, मुलांच्या गटात कार्तिक साळुंखे, शौर्य शिंगण, आदित्य लांडे, राजवर्धन खबाले व अवधूत शिंदे यांनी अनुक्रम पाच क्रमांक पटकाविले. विजेत्यांना मान्यवरांचनया हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सतीश चव्हाण, प्रा. डॉ. विशाल साळुंखे, ओंकार ढेरे, अतुल पाटील, कैलास माने, अमरजीत पुजारी आदींनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment