वेध माझा ऑनलाइन - महामार्ग रुंदीकरण करताना व सहापदरीकरणाचा पुल उभा करीत असताना स्थानिक नागरिकांच्या भावनांचा विचार व्हावा, लोणावळ्या सारखी स्थिती कराड शहराची होऊ नये तसेच कराड शहराची ओळख कायम रहावी यासाठी डी.पी.जैन कंपनीच्या अधिकार्यांना सुचना दिलेल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांसमवेत लवकरच बैठक आयोजित करून कराडकरांच्या भावना पोहोचवून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खा.उदयनराजे भोसले यांनी दिली.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावरील सध्याचा उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी सहापदरीकरणासाठी दुहेरी वाहतूकीचा एकच नवीन पुल पाडण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी व स्थानिकांना येणार्या अडचणी याबाबत चर्चा करण्यासाठी आज (सोमवारी) खा.उदयनराजे भोसले यांनी पुलाच्या कामाची पाहणी करून सहापदरीकरण कामाचे कंत्राटदार डी.पी.जैन तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, डॉ.अतुल भोसले, माजी आ.आनंदराव पाटील, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, माजी बांधकाम सभापती हणमंतराव पवार, सुनिल काटकर, माजी नगरसेविका सौ.स्मिता हुलवान, नितीन काशिद, आर.टी.स्वामी, गजेंद्र कांबळे, निशांत ढेकळे, शिवसेनेच्या सुलोचना पवार, प्रदीप जैन, वाहतूक अधिकारी सरोजिनी पाटील, प्राधिकरणाचे अधिकारी व नागरिक यांची उपस्थिती होती.
सध्या सुरू असणार्या पुलाच्या कामाबाबतचा नक्की आराखडा काय आहे? याबाबत जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. याबाबी राजेंद्रसिंह यादव यांनी खा.उदयनराजे भोसले यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यामुळे खा.उदयनराजे भोसले यांनी याबाबत संबंधित अधिकार्यांशी बैठक घेऊन संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या. तसेच हा प्लॅन नक्की काय आहे? तसेच या महामार्ग कामांमध्ये भूसंपादीत केलेल्या जागा याबाबत ही चर्चा करण्यात आली. सातारावरून कोल्हापूरकडे जाताना अन्नपूर्णा हॉटेलजवळ पॉईंट आहे. तसेच लोटस फर्निचर येथे दुसरा पॉईंट आहे. या ठिकाणी जर एखादा नवखा वाहनधारक वाहतूक करत असेल आणि जर चुकून तो पुढे गेला तर त्याला मागे कराड शहरात येण्यासाठी सुमारे चार किलोमीटरचा टप्पा पार पाडावा लागणार आहे. हा टप्पा पार पाडावा लागू नये यासाठी यु टर्नची गरज असल्याचे अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले.तसेच हा पूल करत असताना यामध्ये अनेक नागरिकांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्या नागरिकांना अद्यापही मोबदला दिला गेला नाही. याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी पुढील आठवड्यामध्ये मीटिंग आयोजित केली आहे. त्यावेळी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. या महामार्गाला कोणत्याही नागरिकाचा विरोध नाही. परंतु नागरिकांचे व्यवसाय बंद पडू नये व भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा याबाबत चर्चा करण्यात आली. महामार्ग रुंदीकरण करताना या सर्व बाबींचा विचार व्हावा , लोणावळ्या सारखी स्थिती कराड शहराची होऊ नये तसेच कराड शहराची ओळख कायम रहावी यासाठी अधिकार्यांना खा.उदयनराजे भोसले यांनी सूचना दिल्या. तसेच महामार्गाचे काम व्यवस्थित करा, लोकांना त्रास होता कामा नये ही अधिकार्यांची जबाबदारी आहे. याबाबतही खा.उदयनराजे भोसले यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या. यावेळी शहरातील नागरिकांनी आपल्या समस्या या बैठकीत मांडल्या
No comments:
Post a Comment