वेध माझा ऑनलाइन ; शंभूराज देसाई याना शिवसेना कळली नाही, कळणारही नाही त्यांनी कधीही शिवसेनेशी इमानदारी दाखवली नाही त्यामुळे आता त्यांच्या तोंडात स्वाभिमान असले शब्द शोभत नाहीत अशा शब्दांत शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी आज हल्लाबोल केला
उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटायला सिल्व्हर ओक वर गेले त्यावर शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर टीका केली त्याचा समाचार हर्षद कदम यांनी नुकताच घेतला
कदम म्हणाले ज्यांनी कधीही शिवसेनेशी इमान राखला नाही नेहमीच पक्ष विरोधी काम केले अशांनी उद्धव ठाकरे शरद पवारांना सिल्व्हर ओक वर भेटायला गेले म्हणून टीका करतात मग हे जेव्हा महाविकास आघाडीत होते तेव्हा पवारांकडे लॉबिंग करायला का गेले होते?असा सवाल करत त्यांनी शंभूराज देसाई यांनी फक्त आपल्या मतदार संघातच लक्ष घालावे असा सल्लाही देसाई याना दिला आहे
No comments:
Post a Comment