वेध माझा ऑनलाइन ; शहरातील सूर्यवंशी मळा येथील कु. राजवीर राहुल ओहळ हा तीन वर्षाचा मुलगा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना २७ जून २०२२ रोजी घडली होती. या घटनेने कराड शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली होती. या घटनेची नोंद घेऊन या मुलाच्या कुटुंबीयास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून मृताच्या कुटुंबीयास एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली असून ते मंजुरीचे पत्र माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कुटुंबीयास वितरित करण्यात आले. यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहुल चव्हाण, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, गजानन आवळकर आदी उपस्थित होते.
सदर मंजूर अर्थसहाय्य रक्कम रु. एक लाख मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा इथून आपल्या नावे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रतापगंज शाखेतील बँक खात्यावर परस्पर वर्ग करण्यात आले आहेत. या शाखेतून हि रक्कम मृतांच्या वारसास प्रमाणपत्र सहित दिली जाईल.
No comments:
Post a Comment