Tuesday, April 18, 2023

कराडात शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन व तिकीट विक्री शुभारंभ

वेध माझा ऑनलाइन - कृष्णाई क्रिएटीव्हज, कराड या समुहच्या माध्यमातून जगदंब क्रिएशन निर्मित श्री. महेंद्र वसंतराव महाडिक दिग्दशित व डॉ. अमोल कोल्हे याच्यासह २५० हून अधिक दिग्गज कलाकाराच्या कलेतून साकारलेले व शिवपुत्र संभाजी महाराजाचा पराक्रम आणि ख्याती सांगणारे " शिवपुत्र संभाजी" हे महानाट्य आपल्या यशवंतनगरी - कराड मध्ये कल्याणी ग्राउंड बैल बाजार येथे दि. २८ एप्रिल ते ३ मे २०२३ रोज सायंकाळी ६ वाजता सादर होणार आहे.सदर महानाट्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन खासदार व प्रसिद्ध कलाकार डॉ. अमोल कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले.  तिकीट विक्रीचा शुभारंभ सुनील बामणे व श्री आण्णा सावंत यांना पहिले मानाचे तिकीट देवून करण्यात आले आहे.
 
मंगळवार दिनांक १८ एप्रिल २०२३ पासून कराड मध्ये १) सेंटर ऑफिस, साईनाथ वडापाव शेजारी, २) सई फोटो स्टुडिओ, मंगळवार पेठ, ३) कृष्णाई प्ले पार्क, प्रितीसंगम कृष्णामाई संगम, ४) साई पूजा कम्प्युटर महा ई सेवा केद्रा नाडे - नवा रस्ता, ५) गीतांजली मोबाइल शॉपी, कार्वे नाका कराड. या ठिकाणी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत तिकीट उपलब्ध आहेत. ऑनलाइन तिकीट विक्री बुक माय शो या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विद्यार्थीसाठी पहिले २ दिवस दिनाक २८ व २९ एप्रिल २०२३ रोजी विशेष २० % सवलत देण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमास डॉ. अमोल कोल्हे, श्री महेंद्र महाडीक, श्री घनश्याम राव, श्री ओंकार केंडे, श्री वासू पाटील, श्री दिपक शिंदे, श्री प्रसाद देशपांडे, श्री विनायक कवडे आणि तमाम शिवप्रेमी उपस्थित होते. तरी सर्वांनी संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास जाणून घेण्यासाठी एक वेळ अवश्य शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पहावे. असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे आणि संयोजक कृष्णाई क्रिएटीव्हज ग्रुप कराड यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment