वेध माझा ऑनलाइन -ज्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब पाटील उतरतील तिथे यांच्या विरोधात आम्ही असणार...अशी कराड उत्तरच्या सर्व भाजप नेत्यांची भूमिका प्रत्येक निवडणुकीत घेण्याचे ठरले आहे... अँटी बाळासाहेब...हीच आमची भूमिका कायम राहील...असे स्पष्ट मत कराड उत्तर चे भाजप चे नेते मनोज घोरपडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं
कराड बाजार समितीच्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कराड उत्तरच्या भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस नेते उदय पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता उपस्थिती लावली होती त्यावेळी घोरपडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला
एकीकडे कराड दक्षिणचे भाजप नेते डॉ अतुलबाबा भोसले व आ बाळासाहेब पाटील यांचे एकत्रीकरण या निवडणुकीत पहायला मिळतय तर दुसरीकडे काँग्रेस नेते ऍड उदय पाटील यांना कराड उत्तर च्या सर्व भाजप नेत्यांनी या निवडणुकीत आपला पाठिंबा दर्शवला आहे याविषयी बोलताना घोरपडे पुढे म्हणाले ही निवडणूक पक्ष चिन्हावर होत नाहीये त्यामुळे अतुल भोसलेंनी त्यांच्या सोयीची भूमिका घेतली आहे तर आम्ही पण आमची अँटी बाळासाहेब ही भूमिका सर्वांसमोर आणली आहे शेवटपर्यंत आमचा बाळासाहेब पाटील यांना विरोधच राहील दरम्यान आमच्यात आणि अतुल भोसले यांच्यात कोणताही विसंवाद नाही असे देखील घोरपडे सांगायला विसरले नाहीत बाळासाहेब पाटील यांना प्रत्येक निवडणुकीत आमचा विरोधच असणार आहे अशी भूमिका घोरपडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली
No comments:
Post a Comment