Friday, April 7, 2023

कराड शहरातील शिवजयंती विविध उपक्रमांनी होणार साजरी ; शिवजयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना तसेच दरबार मिरवणुकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा ; विक्रम पावसकरांचे कराडकरांना आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन - प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी शहरातील शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी होणार असल्याची माहिती हिंदु एकता आंदोलनाचे सातारा जिल्ह्याध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली शिवजयंती निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती देखील त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली 

ते म्हणाले, येत्या 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता प्रीतिसंगम कृष्णा घाट येथे प्रखर हिंदुत्ववादी वक्ते व अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे 
21 एप्रिलला शहरातील चावडी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल 22 एप्रिल रोजी शहर व तालुक्यातील मंडळांच्या शिवछत्रपतींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल याच दिवशी सायंकाळी 4 वाजता महिलांची टू व्हीलरची रॅली येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतून निघेल आणि कृष्णा घाट येथे या रॅलीची सांगता होईल नंतर त्याठिकाणी छत्रपतींची महाआरती होईल 
दिनाक 23 रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपतींची भव्य दरबार मिरवणूक पार पडणार आहे या मिरवणूकीची सुरुवात येथील पंढरीचा मारुती चौकातून होईल आणि दत्त चौक येथे या भव्य मिरवणुकीची सांगता होईल 
शिवजयंती निमित्त होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांना तसेच दरबार मिरवणुकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन देखील विक्रम पावसकर यांनी यावेळी केले

माजी नगरसेवक अण्णा पावसकर तसेच रुपेश मुळे अजय पावसकर  चंद्रकांत जिरंगे कलबुर्गी काका यांच्यासह हिंदू एकताचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

No comments:

Post a Comment