Monday, April 3, 2023

३१ मार्च २०२३ अखेर यशवंत बँकेचा ४०५ कोटींचा एकत्रित व्यवसाय ;बँकेस २ कोटी ६८ लाखांचा ढोबळ नफा- शेखर चरेगांवकर

वेध माझा ऑनलाइन - नुकत्याच झालेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला रुपये २ कोटी ६८ लाख इतका ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय रुपये ४०५ कोटी इतका झाला असून यामध्ये रुपये २१८ कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत तर रुपये १८७ कोटींची कर्जे वितरीत केली गेली आहेत. बँकेची गुंतवणूक रुपये ४४ कोटी इतकी झाली आहे.
केवळ बँकेतच प्रत्येक ठेवीदारास मिळणारे ‘रु.५ लाखापर्यंतचे ठेव विमा संरक्षण’ ही सर्व ग्राहकांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब ठरली आहे. याचाच लाभ घेत ग्राहकांनी बँकेतील गुंतवणुकीत वाढ केल्याचे अध्यक्ष चरेगांवकर यांनी सांगितले.

सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने बँकेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरीक्षण वर्गात सातत्य राखून मागील सलग ११ वर्षे बँकेस शासकीय लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी देखील बँकेने आवश्यक ती सर्व आदर्श प्रमाणके पूर्ण केली आहेत. ठेव, कर्जे, भागभांडवल, गुंतवणूक या सर्वात वाढ करत मागील वर्षीच्या तुलनेत एनपीएचे प्रमाण कमी करण्यात बँकेस यश आले आहे.
सन २०२५ साली बँक आपला सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहे. नूतन संचालकांच्या सहकार्याने सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी बँक एक व्हिजन व मिशन समोर ठेवून नेत्रदीपक प्रगती करेल अशी खात्री यानिमित्ताने चरेगांवकर यांनी व्यक्त केली आहे.
सुवर्णमहोत्सवी वाटचाली निमित्त बँकेने १५ महिने मुदतीच्या ठेवीसाठी ८.५०% व ३ वर्षे मुदतीच्या ठेवीसाठी ९% इतका व्याजदर जाहीर केला आहे. या योजनांना ग्राहकांनी भरगोस प्रतिसाद दिला आहे.
बँकेच्या आजवरच्या वाटचालीत सहकार्य करणारे सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, बँकेचे संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, कर्मचारी वर्ग, हितचिंतक या सर्वांचे शेखर चरेगांवकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment