Sunday, August 11, 2024

शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली ; शरद पवार काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाईन।
यांची गाडी मराठा आंदोलकांनी  रोखली. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार  यांच्या गाडीच्या समोर येऊन काही मराठा आंदोलक घोषणा देत होते. शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. या वेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली होती. 

शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत.  टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली आहे.  शरद पवार यांची गाडी कुर्डूवाडी जवळ अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. दुपारी 4 पर्यंत पवार बार्शीत आहेत.   संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्यालाही ते उपस्थित राहतील.  
  
शरद पवार म्हणाले...

मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली होती.  मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले.  त्यानंतर पवारांनी यावेळी माझा पाठींबा आहे, असे म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या.

No comments:

Post a Comment