वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अडकल्याची माहिती समोर येतेय. अनेक मंत्र्यांचे विभागाचे काही निर्णय असेल किंवा आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांच्या अनेक फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार प्रमाणेच महायुतीमध्येही वादाची ठिणगी पडताना पाहायला मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनीधी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी धडपड करत असतात. सत्तेत पुन्हा एकदा तीन पक्ष आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा निधी वाटप, विभागाच्या फाइल्स यावरून वादाला तोंड फुटलंय.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांच्या आणि मंत्राच्या अनेक फाईल मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची माहिती समोर येते. शिवभोजन थाळीचा वाढीव प्रस्ताव यासारख्या 18 ते 20 महत्त्वाच्या फाईल अडकल्याची माहिती आहे. मात्र यावरती उघडपणे वाच्यता न करता खासगीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री बोलताना पाहायला मिळत आहेत.
No comments:
Post a Comment