वेध माझा ऑनलाइन।
मनोज जरांगे यांनी पाटलांच्या सभांचा नाशिकमध्ये समारोप झाला. समारोप यात्रा मंत्री भुजबळांच्याच नाशिकमध्ये असल्यानं जरांगेंच्या टार्गेटवर पुन्हा भुजबळ आले. निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशाराच जरांगेंनी पुन्हा एकदा दिला आहे.
सांगलीतील ओबीसींच्या एल्गार सभेतून भुजबळांनी जरांगेंना 288 जागा लढण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यावरुन आधी नाशिकमधून अजित पवारांच्याच राष्ट्रवादीच्या जागा निवडून येतात का ?, ते बघ असं प्रतिआव्हान जरांगेंनी दिलं आहे.
जरांगेंचा महाराष्ट्राचा दौरा आता संपला आहे. 29 तारखेला निवडणूक लढायची की, आमदारांना पाडायचं याचा फैसला जरांगे करणार आहेत.
मराठा समाजाला ओबीसीतून आणि तेही सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे. मात्र, ते शक्य नाही अशी भूमिका सरकारची आहे. त्यामुळं जरांगेनी आता निवडणुकीत पाडापाडीची तयारी पूर्ण केल्याचं दिसतंय.
No comments:
Post a Comment