कराड येथील मधुपर्व प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा 'भला माणूस' पुरस्कार सनबिंम शिक्षण संस्थेचे डायरेक्टर श्री प्रशांत लाड यांना नुकताच प्रदान करण्यात आला
सदर प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री भानुदास वास्के व प्राचार्य घाटगे सर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
नोकरी व्यवसाय सांभाळून जे लोक सामाजिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवतात अशा लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो
दरम्यान पूरस्कार मिळाल्याबद्दल श्री लाड यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे
दरम्यान मागील वर्षाचा हा पुरस्कार शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे कॉलेज कराडचे प्राचार्य डॉक्टर सतीश घाटगे सर यांना देण्यात आला होता
यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री लाड म्हणाले...
सनबीम इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम करता आले. सनबीम एज्युकेशन ट्रस्ट व श्रीनिवास पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभाग घेता आला. सुंदर हस्ताक्षराच्या छंदातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले.हा पुरस्कार संपूर्ण सनबीम परिवाराचा बहुमान आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझा झालेला हा सन्मान माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे
No comments:
Post a Comment