Friday, August 23, 2024

आता शेतकऱ्यांसाठी लढा उभा करणार ; मनोज जरांगे पाटील

वेध माझा ऑनलाईन ।
राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं, पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे दिवसेंदिवस मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. अशात मनोज जरांगेंनी मोठी घोषणा केली आहे.

जरांगेंची मोठी घोषणा
मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलं आहे.
मतदार संघानिहाय बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment