नुकतेच मलकापुर येथील हौसाई विद्यालय येथे इनरव्हील क्लब ऑफ कराड यांच्या वतीने,"ती उमलताना"या विषयावर प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सौ शैलजा कुलकर्णी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी डॉ सौ कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना स्पर्श या विषयावरील माहिती दिली "चांगला आणि वाईट स्पर्श" या मधील फरक अतिशय सोप्या भाषेत त्यानी समजून सांगितला. तसेच वयात येताना घ्यावयाची काळजी, याचेही मार्गदर्शन त्यांनी केले.
तसेच यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जीवन पवार यांनी "व्यवसायाच्या वाटा"याविषयीचे मार्गदर्शन केले तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भातदेखील त्यांनी मार्गदर्शन केले
याप्रसंगी प्राचार्य जीवन फुके, मुख्याध्यापक सुरेश वेदपाठक, प्राचार्य जोशी मॅडम, कल्याण कुलकर्णी, पद्मावती पाटील, अंजना जानुगडे, ऋषिकेश पोटे, वीरभद्र खुरपे, रघुनाथ पाटील, विकास शिंगाडे, किरण कुंभार, महिंद्रा आंबवडे, साठे मामा आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment